Home विदेश india china tension: चीनचा भारताला धोका; युरोपमधील अमेरिकेच्या फौजा आशियाकडे रवानाः पॉम्पिओ...

india china tension: चीनचा भारताला धोका; युरोपमधील अमेरिकेच्या फौजा आशियाकडे रवानाः पॉम्पिओ – threat from chinese communist party to india says us secy of state mike pompeo


वॉशिंग्टनः पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर (LAC) भारत-चीनमध्ये तणाव सुरू आहे. दुसरीकडे दक्षिण चीन समुद्रात चीनने आक्रमक पवित्रा घेतला आहे. करोना व्हायरसमुळेही चीनला जगाभरातील तीव्र टीकेचा सामना करावा लागतोय. चीनच्या अलिकडच्या हालचाली पाहता अमेरिकेने धोक्याचा इशारा दिला आहे. अमेरिकेने युरोपमधील आपले सैन्य हटवून आशियात तैनात करण्यास सुरुवात केलीय.

युरोपमधून हटवण्यात आले अमेरिकी सैन्य

भारत आणि दक्षिण पूर्व आशियाला चीनचा मोठा धोका निर्माण झाला आहे. यामुळे अमेरिकेने युरोपमधील आपले सैन्य कमी केले आहे, असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी सांगितलं. जर्मनीतील अमेरिकेचे सैन्य का कमी करण्यात आले? असा प्रश्न पॉम्पिओ यांना करण्यात आला. तेथील सैन्याच्या तुकड्या या दुसरीकडे तैनात करण्यात येत आहे, असं पॉम्पिओ यांनी स्पष्ट केलं.

चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचा धोका

चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या कारवाईने भारत, व्हिएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स आणि दक्षिण चीन समुद्राला धोका आहे. आव्हानांचा सामना करण्यासाठी अमेरिकेच्या सैन्याला योग्य ठिकाणी तैनात करण्यात येत आहे, असं पॉम्पिओ म्हणाले.

लडाख: चीनकडून ‘अशी’ सुरू आहे घुसखोरी; सॅटेलाइट फोटोतून खुलासा

जगाला करावा लागतोय चीनचा सामना

फक्त अमेरिकाच नाही तर संपूर्ण जगाला चीनचा सामना करावा लागतोय. आपण या महिन्यात युरोपियन युनियनमधील परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केलीय आणि चीनच्या कम्युनिस्ट पार्टीबाबत बरीचशी माहिती घेतली. यात चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीकडून चिथावणीच्या घटनांचे तथ्य आहे. तसंच दक्षिण चीन समुद्रातील चीनची आक्रमकता, भारताशी घातक संघर्ष आणि शांतताप्रिय शेजाऱ्यांना धोका, अशा मुद्दांचा समावेश होता, असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी सांगितलं.

पोलंडमध्ये अमेरिकन सैन्य तैनात होणार; रशियासोबत तणाव वाढणार!Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

india add 40 new billionaires in pandemic: billionaires in india अब्जाधीश वाढले ; ‘लॉकडाउन’मध्ये सामान्यांची परवड तर धनदांडग्यांची बक्कळ कमाई – india add 40...

हायलाइट्स:हुरुन ग्लोबल रिच लिस्टमध्ये देशभरातील अब्जाधीशांच्या संपत्तीचा आढावागेल्या वर्षभरात ४० नवे अब्जाधीश बनलेभारतात एकूण १७७ अब्जाधीश मुंबई : करोनाने सर्वसामान्यांच्या आयुष्यावर विपरीत परिणाम...

aarogya vibhag bharti 2021: … तर आरोग्य विभाग भरतीसाठी झालेली परीक्षा रद्द होणार – aarogya vibhag bharti 2021 health department recruitment exam will be...

हायलाइट्स:गैरव्यवहार आढळल्यास आरोग्य विभाग भरतीसाठी झालेली परीक्षा रद्द होणारउपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानपरिषदेत आश्वासन२८ फेब्रुवारी रोजी झाली होती लेखी परीक्षात्यात करोनाच्या पार्श्वभूमीवरील नियोजन,...

Recent Comments