Home विदेश india china tension: लडाख तणाव: 'या' कारणांमुळे चीनने दोन किमी घेतली माघार!

india china tension: लडाख तणाव: ‘या’ कारणांमुळे चीनने दोन किमी घेतली माघार!


बीजिंग: लडाखमधील सीमा भागातून चीनने दोन किमी माघार घेतली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनने सैन्याची मोठी जमवाजमव केली होती. त्याच्या प्रत्युत्तरात भारतानेही सैन्याची कुमक वाढवली. त्यानंतर आता चीनच्या फौजांनी दोन किमी माघार घेतली आहे. आक्रमक पवित्रा घेणाऱ्या चीनने अचानक माघार घेण्यामागे अनेक शक्यता वर्तवल्या जात आहे.

भारत आणि चीनमधील सीमा प्रश्न हा तणावाचा राहिला आहे. १९६२ च्या युद्धानंतर चीनसोबत डोकलामच्या मुद्यावर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर आता लडाखमध्येही तणावाची परिस्थिती निर्माण झाली. आंतरराष्ट्रीय राजकीय विश्लेषक कमर आगा यांनी सांगतिले की, चीनच्या माघारीची मुख्यत: तीन कारणे आहेत. एक म्हणजे चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याने ताबडतोब हालचाली सुरू केल्या. लडाखमध्ये मागील महिन्याच्या पाच तारखेला आणि सिक्किममध्ये ९ मे रोजी भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली असल्याचे समोर आले होते. त्यानंतर सिक्कीममधील तणाव निवळला. मात्र, लडाखमधील गलवान आणि प्योंगयांग सरोवराजवळ चीनने आक्रमकता दाखवली आणि भारतावर दबाब वाढवण्यासाठी सैनिकांची कुमक वाढवण्यास सुरुवात केली.

वाचा: ‘भारत-चीन सीमेवरील स्थिती स्थिर; ट्रम्प यांची मध्यस्थी नकोच’

भारतानेही चीनच्या या आक्रमकतेला जोरदार प्रत्युत्तर देत सैन्याची कुमक वाढवली. त्याशिवाय चीन इतकेच रणगाडे. तोफा, शस्त्र जमवाजमव करण्यास सुरुवात केली. त्याच बरोबरीने भारताने संयमी भूमिका दाखवत चर्चेचा मार्ग खुला ठेवला. त्यानंतर आता दोन्ही देशांमध्ये ६ जून रोजी लेफ्टिनेट जनरल रँकच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होणार आहे. वाद कमी करण्यासाठी आतापर्यंत १० वेळेस चर्चा झाल्या आहेत.

वाचा: अमेरिकेने चिनी विमानांवर घातली बंदी

चीनसोबत एखाद्या देशाने मवाळ भूमिका घेतल्यास चीन अधिक आक्रमक होतो. मात्र, त्यांच्या तोडीस तोड भूमिका घेतल्यास चीन माघार घेत असल्याचे आगा यांनी सांगितले. चीन आपली विस्तारवादी भूमिका कायम ठेवत आहे. भारतासोबत ज्या पद्धतीने चीन वागत आहे. त्याच प्रकारे त्यांनी याआधी जपान, तैवान आणि व्हिएतनामसारख्या शेजारी देशांसोबत वर्तवणूक केली आहे.

वाचा: लडाख म्हणजे डोकलाम नाही, आम्ही युद्धाला तयार; चीनची धमकी

चीनमध्ये करोनाच्या संसर्गानंतर अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. चीनमधून निर्यात कमी होत असल्यामुळे मंदीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये बेरोजगारी आणि असंतोष वाढत आहे. या रोषाला दाबण्यासाठी चीन आता राष्ट्रवादाचे कार्ड काढत असल्याचे आगा यांनी सांगितले. चीनवर आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाब वाढत असल्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दक्षिण चीन समुद्र, करोना आणि व्यापाराच्या मुद्यावर अमेरिकेसोबत चीनचा वाद सुरू आहे. जी-७ राष्ट्रांच्या बैठकीत ट्रम्प यांनी चीनविरोधी देशांना आमंत्रित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. चीनच्या आक्रमक विस्तारवादी भूमिकेला शेजारी देशांनीही विरोध दाखवला आहे. त्यामुळे चीन सध्या भारतासोबत युद्ध करण्याच्या मनस्थितीत नसल्याचेही आगा यांनी सांगितले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

corona test of air passengers: विमानात चढण्याआधी होणार करोना चाचणी – air passengers able to corona test before boarding the plane for going out...

म. टा. प्रतिनिधी, मुंबईमुंबईहून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांना आता विमानात चढण्याआधीच करोना चाचणी करता येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही सुविधा उभी...

लाल सोने नजरकैदेत!

टीम मटा केंद्र सरकारने घाऊक व्यापाऱ्यांना २५ टन व किरकोळ व्यापाऱ्यांना दोन टनाची मर्यादा ठरवून दिल्याने व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे...

Recent Comments