Home विदेश india china tension: India China चीनसोबत तणाव: इस्राएलकडून भारताला मिळणार सुरक्षाकवच! -...

india china tension: India China चीनसोबत तणाव: इस्राएलकडून भारताला मिळणार सुरक्षाकवच! – india will buy barak 8 missile defense system from israel


लडाखमध्ये भारत-चीन दरम्यानच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर मागील महिनाभरापासून तणाव सुरू आहे. भारत-चीनच्या सैन्यामध्ये १५ जून रोजी झालेल्या हिंसक संघर्षानंतर दोन्ही देशांतील तणाव आणखीच वाढला आहे. त्यातच चीनकडून गलवान खोरेसह लडाखमधील इतर भागातही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव निर्माण झाला आहे. चीनने लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सैन्याची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे. भारतीय लष्करानेदेखील चीनच्या या आगळीकीला प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू केली आहे.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चिनी हवाई दलाची हालचाल पाहता भारताने स्वदेशी आकाश मिसाइल डिफेन्स सिस्टम तैनात करण्यात आली आहे. चिनी हवाई दलानेभारतीय हद्दीत प्रवेश केल्यास भारताकडून जोरदार प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. त्याच वेळेस भारताचा मित्र असलेल्या इस्राएलकडून एक मोठे सुरक्षा कवच मिळणार आहे. इस्राएलकडून भारत तातडीने एअर डिफेन्स सिस्टिम खरेदी करण्याची शक्यता आहे. भारत इस्राएलकडून ‘बराक-८ एलआरएस’ खरेदी करणार असल्याची चर्चा आहे.

‘बराक-८ एलआरएस’ खरेदी करणार!

चीनच्या आगळीकीचे उत्तर देण्यासाठी भारत इस्राएलकडून ‘बराक-८ एलआरएस’ डिफेन्स सिस्टीम खरेदी करणार आहे. याबाबतची चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून सुरू आहे. भारत-इस्राएलमध्ये नेव्ही व्हर्जन खरेदी करण्याबाबत वर्ष २०१८ मध्ये एक करार करण्यात आला आहे. सध्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनकडून सुरू असलेल्या हालचाली पाहता भारताने आता जमिनीवरून मारा करण्यात येणाऱ्या एअर लाँच व्हर्जन खरेदी करण्याबाबतची प्रक्रिया वेगवान केली आहे. इस्राएल एअरोस्पेस इंडस्ट्रीजने (आयएआय) २०१८ मध्ये सांगितले होते की, भारताने जवळपास ५६८७ कोटी रुपयांच्या ‘बराक-८’ मिसाइल डिफेन्स सिस्टीमचा करार केला आहे.

एलआरएस काय आहे?

maharashtra times

‘बराक-८’ मिसाइल एलआरएसएएम या श्रेणीत काम करतात. काही क्षेपणास्त्र जमिनीवरून हवेत मारा करण्यास सक्षम असतात, काही क्षेपणास्त्र हवेतून हवेत मारा करण्यास सक्षम असतात. त्यामध्ये मध्यम पल्ला, लांब आणि लहान अंतरावर मारा करण्यास सक्षम अससतात. इस्राएलकडून येणारी सुरक्षा प्रणाली ही लांब पल्ल्यावरील अंतरावर जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. ‘एलआरएसएएम’चा अर्थ लाँग रेंज सरफेस टू एअर मिसाइल असा आहे. २०१८ मध्ये झालेल्या करारानुसार केंद्र सरकारची कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड ही मुख्य कंत्राटदार म्हणून काम करणार आहे.

चीनसाठी घातक आहे ही प्रणाली

maharashtra times

‘बराक-८’ लांब पल्ल्यावर मात करणारी जमिनीवरून हवेत मारा करणारी यंत्रणा आहे. शस्त्राशस्त्रे आणि तांत्रिक रचना, अल्टा सिस्टीम आणि अन्य बाबींच्या विकासासाठी इस्राएल जबाबदार असणार आहे. भारत डायनेमिक्स लिमिडेट (बीडीएल) क्षेपणास्त्रांचे उत्पादन करणार आहे. ही यंत्रणा युद्ध नौकांच्या संरक्षणासाठी ही यंत्रणा महत्त्वाची आहे. हिंदी महासागरात चीनच्या नौदलाची हालचाल वाढली आहे. त्यादृष्टीने ‘बराक-८’ भारतासाठी अतिशय महत्त्वाचे आहे.

भारताची पसंती ‘बराक-८’ ला का?

maharashtra times

कोणतेही शस्त्र, संरक्षणा यंत्रणा खरेदी करणे आणि पूर्णपणे कॉम्बॅक्ट भूमिकेत उतरवण्यासाठी वेळ लागतो. यामध्ये शस्त्रांची चाचणी, देखभाल आणि तैनात करण्यासाठी अनेक तयारी केली जाते. कोणत्याही इतर देशाची सुरक्षा यंत्रणा, क्षेपणास्त्र यंत्रणा उदाहरणार्थ अमेरिकेची धाड, पॅट्रियॉट, रशियाची एस-४०० या यंत्रणा तातडीने तैनात करता येऊ शकत नाहीत. मात्र, ‘बराक-८’ या अपवाद आहे. त्याशिवाय भारतीय लष्कर बराक श्रेणीतील अनेक क्षेपणास्त्रे पूर्वीपासूनच हाताळत आहे. भारत आणि इस्राएलमध्ये २०१७ मध्ये झालेल्या करारात या क्षेपणास्त्र यंत्रणेच्या खरेदीचा समावेश असल्याची चर्चा आहे.

बराक-८ कुठं तैनात करणार?

maharashtra times

‘एलआरएसएएम’चा आयएनएस विक्रांत आणि नौदलाच्या कोलकाता-क्लास डेस्ट्रॉयर्सवर लागू करण्यात येणार आहे. अमेरिका आणि रशियानंतर इस्राएल हा भारताला सर्वाधिक शस्त्र पुरवठा करणारा देश आहे. जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या ‘बराक-८’ ला चीनच्या सीमेवर तैनात करण्यात येणार आहे. त्यामुळे भारताची बाजू अधिक भक्कम होणार आहे.

भारताच्या ताफ्यात लवकरच ‘एस-४००’

maharashtra times

याआधी भारताने रशियासोबत एस-४०० डिफेन्स मिसाइल सिस्टम खरेदी करण्याबाबतचा करार केला होता. यामुळे होस्टाइल, जेट, बॉम्ब, ड्रोन आणि क्षेपणास्त्रांपासून बचाव करता येणे शक्य आहे. भारत ‘एस-४००’ ला पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर तैनात करणार आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या भारत दौऱ्यादरम्यान हा करार अंतिम करण्यात आला होता. एस-४०० एकाच वेळी ३६ ठिकाणी लक्ष्य भेदू शकतो. त्याशिवाय एकाचवेळी ७२ क्षेपणास्त्रे लाँच करू शकतात.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Shirdi Saibaba Temple: Saibaba Temple: साईचरणी ९ दिवसांत कोट्यवधींचे दान; सहा देशांचे चलनही तिजोरीत! – saibaba temple gets rs 3 crore donations in 9...

नगर: राज्य सरकारच्या आदेशाने शिर्डीचे श्री साईबाबा समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आल्या पासून (१६ नोव्हेंबर) ते काल, मंगळवारपर्यंत सुमारे ४८ हजार...

aurangabad News : वीज बिल फाडून मनसेचे आंदोलन – mns agitation by tearing up electricity bill

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादवाढीव वीज बिलाबाबत महावितरण विभागाकडून नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी काही उपाय योजना केली जात नाहीत, असा आरोप करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

LIVE : पुन्हा राजकीय ठिणगी पेटणार, उद्धव ठाकरेंची मुलाखत लवकरच होणार प्रसारित

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स Source link

Recent Comments