Home विदेश india nepal dispute: भारताशी वाकडं घेणारे नेपाळचे पंतप्रधान राजकीय संकटात! - nepal...

india nepal dispute: भारताशी वाकडं घेणारे नेपाळचे पंतप्रधान राजकीय संकटात! – nepal pm oli visits sheetal niwas to meet president bhandari


काठमांडू: भारताच्या भूभागावर दावा ठोकणारे नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली आता राजकीय संकटात सापडले असल्याचे स्पष्ट झाले आहे. सत्ताधारी नेपाळ कम्युनिस्ट पक्षातून त्यांच्याविरोधात सूर उमटल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. पंतप्रधान ओली यांनी सकाळी राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांची भेट घेतली.

राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांची भेट घेतल्यानंतर आपात्कालीन परिस्थितीमध्ये बोलवण्यात आलेल्या कॅबिनेट बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशन रद्द करण्यात आले आहे. पंतप्रधान केपी शर्मा ओली देशासा उद्देशून भाषण करण्याची शक्यता आहे. नेपाळमध्ये मागील काही दिवसांपासून राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. सत्ताधारी नेपाळ कम्युनिस्ट पक्षाची बैठक झाल्यानंतर या घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, बुधवारी, सायंकाळी छातीत दुखत असल्याच्या कारणास्तव पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असल्याचे वृ्त्त होते. त्यानंतर आज सकाळी त्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली.

वाचा: भारताविरुद्ध काड्या करणाऱ्या नेपाळच्या पंतप्रधानांना घरातूनच आव्हान

भारत आणि नेपाळचे चांगले संबंध असताना लिपुलेखा मार्गाच्या बांधकामावरून नेपाळ सरकारने भारतविरोधी भूमिका घेतली. त्यानंतर संविधान दुरुस्ती करत नेपाळने भारताच्या भूभागावरही दावा ठोकला. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये कधी नव्हे तो तणाव निर्माण झाला. भारत-नेपाळ वाद आणि चीनने नेपाळचा काही भूभाग ताब्यात घेतले असल्याचे समोर आल्यानंतर पंतप्रधान ओली यांच्याविरोधात वातावरण निर्माण होण्यास सुरुवात झाली.

वाचा: भारताचा माझं सरकार पाडण्याचा डाव; दिल्लीत बैठका : केपी शर्मा ओली

नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीत दिग्गज कम्युनिस्ट नेते प्रचंड यांनीदेखील ओली शर्मा यांच्यावर भारतविरोधी भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत नाराजी व्यक्त केली. नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या स्थायी समितीच्या बैठकीत पुष्पा कमल दहल प्रचंड, माधव कुमार नेपाळ आणि झलनाथ खनल यांच्यासह माजी उपपंतप्रधान बामदेव गौतम यांनी ओली यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. स्थानिक नेत्यांच्या मदतीने भारताकडून माझं सरकार पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप पंतप्रधान ओली शर्मा यांनी केला होता.

वाचा: नेपाळचा नवा नकाशा; भारताच्या भूभागावर केला दावा

दरम्यान, भारताविरोधात ओली यांचे आरोप अत्यंत चुकीचे आहेत. भारत नव्हे, तर मी स्वतः तुमचा राजीनामा मागत आहे. या बेजबाबदार वक्तव्यासाठी अगोदर पुरावे सादर करा, अशी मागणी पुष्पा कमल प्रचंड यांनी पक्ष बैठकीत केली. स्थायी समिती सदस्यांच्या मते, खनल, माधव नेपाळ आणि गौतम यांनी ओलींवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आणि मित्र देशाविरोधात चुकीचं आणि बेजबाबदार वक्तव्य केल्याचा आरोप केला. भारताविरोधात केलेल्या आरोपांवर ओली यांनी तातडीने पुरावे सादर करावेत, अशी मागणी नेपाळचे माजी पंतप्रधान बाबुराम भट्टाराय यांनी केली. भारतीय दुतावास सरकार पाडण्याचं नियोजन करत आहे, तर मग तुम्ही राजदुताला काढून का टाकत नाही, असा सवालही त्यांनी केला.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Made in India Metro: पहिलीच स्वदेशी मेट्रो २७ जानेवारीला मुंबईत – first india made metro will be in mumbai on 27 january

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईलाखो मुंबईकरांना प्रतीक्षा असलेल्या मेट्रो दोन अ आणि सात या मार्गावरील, स्वदेशी बनावटीच्या पहिल्याच मेट्रो ट्रेनच्या (रोलिंग स्टॉक) निर्मितीचे...

LIVE : गडचिरोलीत दुसऱ्या टप्प्यातील 150 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स Source link

Recent Comments