Home देश india news News : किटकनाशक कंपनीत स्फोट; पाच जणांचा मृत्यू - blast...

india news News : किटकनाशक कंपनीत स्फोट; पाच जणांचा मृत्यू – blast in dahej pesticide company in bharuch district of gujarat many died and injured


भरुच, गुजरात : गुजरातच्या भरुच जिल्ह्यातील ‘दहेज स्पेशल इकॉनॉमिक झोन’ (SEZ) मधल्या एका किटकनाशक बनवणाऱ्या कंपनी आज स्फोटानं हादरली. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झालाय तर जवळपास ३२ जण गंभीर जखमी झालेत. स्फोटाचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘यशस्वी रसायन प्रायव्हेट लिमिटेड’ या किटकनाशक बनवणाऱ्या कंपनीच्या स्टोअरेज भागात दुपारी १२ वाजल्याच्या आसपास आग लागली. स्फोटाचा आवाज जवळपास २० किलोमीटर अंतरावरूनही स्पष्ट ऐकू आल्याचं स्थानिकांनी म्हटलंय. यामुळे, आवाज इतका जोरात होता की आजूबाजूच्या परिसरात इतर कंपन्यांच्या काचेच्या खिडक्याही फुटल्या.

या घटनेची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या जवळपास १५ गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. आग लागल्यानंतर संपूर्ण भावनगर धुरानं भरून गेलं होतं.

जखमींना भरुचच्या वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल करण्यात आलंय. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.

खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनानं या भागातील लुवारा आणि लखिगाम गाव तसंच अदानी पोर्ट, पेट्रोनेट एलएनजी यांसारख्या कंपन्यांच्या कार्यालयांना रिकामं केलंय.

‘वर्ल्ड सायकल डे’च्या दिवशीच ‘अॅटलस’चं उत्पादन बंद!
करोना लॉकडाऊन : ‘ती’नं संकटातही अशी शोधली संधी!Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments