Home देश india news News : ...जेव्हा भाजपचे आमदार सोनू सूदकडे मदतीची मागणी करतात!...

india news News : …जेव्हा भाजपचे आमदार सोनू सूदकडे मदतीची मागणी करतात! – bjp mla rajendra shukla seeks help from sonu sood alka lamba lashes out on twitter


नवी दिल्ली : मध्य प्रदेशच्या रीवा जिल्ह्यातील भाजपचे आमदार राजेंद्र शुक्ला यांनी श्रमिकांना आपल्या राज्यात परत आणण्यासाठी बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याच्याकडे मदत मागितलीय. यावरूनच काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी आमदार महाशयांवर आणि भाजपवर जोरदार टीका केलीय.

भाजप आमदार राजेंद्र शुक्ला यांनी मुंबईत अडकून पडलेल्या मध्य प्रदेशच्या रीवा आणि सतना जिल्ह्यातील रहिवाशांची एक यादी बनवून ट्विट केलीय. या ट्विटमध्ये त्यांनी अभिनेता सोनू सूद यांच्याकडे मदतीची मागणी केलीय. यावर अलका लांबा यांनी ‘देशात आणि राज्यात यांच्याच पक्षाचं सरकार असूनही हे सोनू सूदकडे मदतीची मागणी करत आहेत’ असं म्हणत टीका केलीय. इतकंच नाही तर राजीनामा देऊन टाकण्याचा सल्लाही अलका लांबा यांनी आमदार महाशयांना देऊन टाकलाय.

श्रमिकांना विलगीकरण बंधनकारक नाहीआधार कार्ड दाखवा, मगच केस कापणार; सलॉनसाठी बंधनकारक
ट्विटचा एक स्क्रीनशॉट शेअर करत अलका लांबा यांनी लिहिलंय ‘डोळ्यांवर विश्वास बसत नाही. जे स्वत: आमदार आहेत आणि माजी मंत्रीही राहिलेत, मध्य प्रदेशात आणि देशात यांचंच सरकार आहे, मुख्यमंत्री / पंतप्रधान यांच्याच पक्षाचे आहेत, महाराष्ट्रातही यांचे खासदार आणि आमदार आहेत. तरीदेखील हे मदत सोनू सूदकडे मागत आहेत. थोडी लाज उरली असेल तर राजीनामा देऊन घरी बसा, चांगलं होईल’.
भाजप आमदार राजेंद्र शुक्ला यांनी आपल्या ट्विटमध्ये सोनू सूदकडे मदत मागताना ‘मध्यप्रदेशातील रीवा आणि सतना रहिवासी गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत अडकलेले आहेत आणि अजूनही आपल्या घरी पपरतू शकलेले नाहीत. कृपया यांना पोहचवण्यासाठी आमची मदत करा’ असं म्हटलं होतं. यावर सोनूनंही शुक्ला यांना मदतीचं आश्वासन दिलंय.

मनोज तिवारींना धक्का; दिल्ली भाजप अध्यक्षपदावरून केली उचलबांगडी
राज्यसभा निवडणूक : भाजपकडून ज्योतिरादित्य तर काँग्रेसकडून दिग्विजय मैदानातSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

ind vs aus first ODI: टीम इंडियासाठी अलर्ट; पहिल्या वनडेत ऑस्ट्रेलियाचे पारडे जड, जाणून घ्या कारण – ind vs aus first odi australia can...

नवी दिल्ली: भारतीय संघ आठ महिन्यांच्या मोठ्या कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. उद्यापासून म्हणजेच २७ नोव्हेंबरपासून भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. भारताच्या दौऱ्याची...

Recent Comments