Home देश india news News : ...तेव्हाच LAC वर तणाव संपुष्टात येईल, भारताची चीनला...

india news News : …तेव्हाच LAC वर तणाव संपुष्टात येईल, भारताची चीनला समज! – indian envoy to china vikram misri says standoff at lac will be resolved only when china stops erecting new structures


नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये भारतीय सेनेसोबत हिंसक झडपेनंतर गलवान खोऱ्यावर दावा करणाऱ्या चीनला भारतानं कडक शब्दांत समज दिलीय. चीनच्या या घुसखोरीच्या प्रयत्नांमुळे दोन्ही देशाच्या संबंधांवर वाईट परिणाम होऊ शकतो. भारत आणि चीन दरम्यान एलएसीवर तणाव तेव्हाच संपुष्टात येईल जेव्हा चीन सीमेवर नवे बांधकाम थांबवेल, असं चीनमध्ये भारताचे राजदूत विक्रम मिस्त्री (Indian envoy to China Vikram Misri) यांनी स्पष्ट केलंय.

उल्लेखनीय म्हणजे भारतातील चीनच्या राजदूतांनी शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी भारताची असल्याचं सांगत हात झटकण्याचा प्रयत्न केला होता.

वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) सैन्यातील तणाव कमी करायचा असेल तर एकमेव मार्ग आहे आणि तो म्हणजे चीननं एलएसीवर नवी बांधकामं उभारणं तत्काळ थांबवावं, असं मिस्त्री यांनी शुक्रवारी म्हटलंय.

चीनच्या गलवान खोऱ्यावरच्या दाव्याचं कधीही समर्थन कलं जाणार नाही. कुरापती काढत असे दावे करण्याचा कोणताही फायदा होणार नाही. वास्तविक स्थिती बदलण्याचे चीनचे प्रयत्न जमिनीवर उभयदेशांतील द्विपक्षीय संबंधांवर परिणाम करणारे ठरतील, या शब्दांत मिस्त्री यांनी चीनला चेतावणी दिलीय.

वाचा :india-china clash: चीनची कुरघोडी सुरूच; ‘वाय’ नाल्याचा मार्ग केला ब्लॉक
वाचा :सीमेवरील तणाव आणि गलवान हिंसेला चीन जबाबदार, भारताने सुनावले
वाचा :हॉटेल, गेस्ट हाऊसमध्ये चिनी नागरिकांना प्रवेश नाही!

द्विपक्षीय संबंधांच्या विकासासाठी सीमेवर शांतता स्थापित करणं गरजेचं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

१५ जून रोजी गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या हिंसक हाणामारीत भारताचे २० जवान शहीद झाले होते. त्यानंतर दोन्ही देशांदरम्यान वेगवेगळ्या स्तरावर चर्चा झाली. आणि दोन्ही देशांच्या सेनेनं मागे हटण्यावर सहमती दर्शवली. परंतु, त्यानंतरही समोर आलेल्या सॅटलाईट फोटोंमधून चीनच्या सेनेनं मागे हटणं तर दूरच परंतु, आणखी भागांत आपला कब्जा करण्याची तयारी केल्याचं स्पष्टपणे दिसतंय.

पँगाँग सरोवरच्या किनाऱ्यावर, कोंगका आणि हॉट स्प्रिंग्सच्या भागात तसंच १५ जून रोजी ज्या भागात हिंसा घडवून आणण्यात आली त्याच्या खालच्या भागांतही नवीन बांधकामं-रचना दिसून येत आहेत.

वाचा :शहिदांच्या कुटुंबाचं दु:ख अनुभवातून चांगलंच समजू शकते : प्रियांका गांधी
वाचा :एक नाही तर तीन ठिकाणी चीननं भारतीय जमीन बळकावली : राहुल गांधी
वाचा :चीनने घुसखोरी केली की नाही?; सोनिया गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोलSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

sex with chicken: विकृतीचा कहर! कोंबड्यांसोबत करायचा सेक्स, पत्नी काढायची व्हिडिओ – 37 years old perverted person jailed three years for having sex with...

लंडन: लैंगिक वासना शमण्यासाठी विविध मार्गांचा वापर काहीजण करत असतात. मात्र, काहीजण विकृत आणि किळसवाणा मार्गाचा अवलंब करतात. असाच एक प्रकार समोर आला...

aurangabad News : नवीन वर्षात उघडणार ‘संत एकनाथ’चा पडदा – the curtain of ‘sant eknath’ will open in the new year

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादगेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेले संत एकनाथ रंगमंदिराच्या नूतनीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात पोचले आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात...

Recent Comments