Home देश india news News : 'निसर्ग'च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा, मदतीचं आश्वासन -...

india news News : ‘निसर्ग’च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा, मदतीचं आश्वासन – nisarg cyclone : pm narendra modi has spoken to cm thackeray, cm vijay rupani and prafull patel


नवी दिल्ली : देश करोना संकटाशी झगडत असतानाच किनारपट्टीवरच्या राज्यांना चक्रीवादळाला तोंड द्यावं लागतंय. ‘निसर्ग’ चक्रीवादळ आता महाराष्ट्र, गुजरात, दीव-दमन, दादरा नगर हवेलीला धडक देण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याशी फोनवरून चर्चा केलीय. सोबतच दीव-दमन आणि दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांच्याशीही पंतप्रधानांनी संपर्क साधला. अचानक उद्भवलेल्या या संकटाला तोंड देण्यासाठी केंद्र सरकार हरएक पद्धतीनं मदतीसाठी सरकारच्या पाठिशी उभं असल्याचं आश्वासन यावेळी पंतप्रधान मोदींनी दिलंय. पंतप्रधान कार्यालयाकडून एका ट्विटद्वारे याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.
Cyclone Nisarga: कोकण किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग वाढला!
Nisarga Cyclone: चक्रीवादळ घोंगावतेय… पण घाबरू नका, अशी काळजी घ्या!

‘बांगलादेश’नं नामकरण केलेलं ‘निसर्ग’ चक्रीवादळ आज दुपारी अलिबागला धडकण्याची शक्यता आहे. ताशी १३ किलोमीटर वेगानं हे वादळ पुढे सरकतंय. हे चक्रीवादळ किनाऱ्याला धडकताना त्याचा वेग ताशी १०० ते १२० किलोमीटर असू शकेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय.

महाराष्ट्र, गुजरात तसंच दोन्ही केंद्रशासित प्रदेशांमध्ये एनडीआरएफच्या एकूण ४० तुकड्या तैनात करण्यात आल्यात. मच्छिमारांच्या सुरक्षेसाठी कोस्ट गार्डचे जहाजही तैनात करण्यात आलेत. लष्कराच्या बचाव आणि मदत दलासोबच, नौदलाची जहाजं आणि हवाईदलाचे विमानंही मदतीसाठी सज्ज आहेत.

नागरिकांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्रात एनडीआरएफच्या २० तुकड्या वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. एका तुकडीत ४५ जवानांचा समावेश आहे.

‘निसर्ग’शी लढा: नौदलाच्या युद्धनौका अरबी समुद्रात तैनात
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने मुंबईकरांना केले ‘हे’ आवाहन

महाराष्ट्राला करोनानं घातलेला विळखा

दरम्यान, महाराष्ट्राला करोनानं घातलेला विळखा अजूनही सैल झालेला नाही. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात आत्तापर्यंत सापडलेल्या रुग्णांची संख्या ७२,३०० वर पोहचलीय. यात केवळ मुंबईमधील ४२,२१६ रुग्णांचा समावेश आहे. यातील ३१,३३३ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलीय. तर एव्हाना २,४६५ जणांचा मृत्यू झालाय.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

yeola st depot employees: एसटीचे कर्मचारी पुन्हा करोना बाधित – nashik corona update : 3 yeola st depot employees found corona positive

म. टा. वृत्तसेवा, येवलाएकीकडे येवला तालुक्यातील करोना बाधितांची संख्या आटोक्यात येत असताना, दुसरीकडे मुंबई येथील बेस्ट सेवेसाठी आपले कर्तव्य बजावून परतलेल्या एसटीच्या येवला...

Bank employees strike: संपामुळे सातशे कोटींचे व्यवहार ठप्प – 700 crore transactions stalled due to strike

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकेंद्र सरकार बँकांचेही खासगीकरण करू पाहत आहे. पीएमसी, एस बँकेच्या ठेवीदारांना वाऱ्यावर सोडले. आता तेच लक्ष्मी विलास बँकेचे होऊ पाहत...

Adam Gilchrist: भारतीय खेळाडूबाबत गिलख्रिस्टने केली मोठी चूक; सोशल मीडियावर चाहते भडकले – adam gilchrist made a big mistake about indian players; fans erupted...

नवी दिल्ली: कधी कधी अनावधानाने चूकीची गोष्टी बोलली जाते पण त्यामुळे मोठा गोंधळ उडतो आणि नाराजी निर्माण होतो. सध्या सोशल मीडियाच्या काळात तर...

Recent Comments