Home देश india news News : भारताने १२० देशांना औषधे पुरवली; मोदींची माहिती -...

india news News : भारताने १२० देशांना औषधे पुरवली; मोदींची माहिती – india supplies medicines to 120 countries says pm modi


वृत्तसंस्था, नवी दिल्ली

करोना विषाणूच्या साथरोगाशी भारताने दिलेला लढा हा, लोकशाही, शिस्त आणि दृढनिश्चय एकत्र आल्यावर त्याला लोकांच्या लढ्याचे कसे रूप येते, हे दाखवून देतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ‘नाम’ देशांच्या परिषदेदरम्यान केले. मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या परिषदेत सहभागी झाले होते. दरम्यान, भारताने जगातील १२० देशांना औषधे पुरवली असल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली.

‘सध्या मानवतावाद गेल्या काही दशकांमध्ये आला नव्हता तेवढा संघर्षात सापडला आहे. अशा काळात नाम आंतरराष्ट्रीय एकता कायम राखण्यासाठी काम करू शकते. नामने नेहमीच जगाचा नैतिक आवाज बनण्याचे काम केले आहे. ही भूमिका कायम ठेवण्यासाठी नामने सर्वंकष होणे आवश्यक आहे,’ असे मोदी म्हणाले. भारतीय समाज हा संपूर्ण जगाला एक कुटुंब मानतो. आम्ही जसे आमच्या नागरिकांची काळजी करतो, तसेच अन्य देशांनाही मदत करतो, असे सांगून त्यांनी भारताला ‘जगाचे औषधालय’ असे संबोधले. भारताने १२० पेक्षाही अधिक देशांना औषधे पाठवली असून, भारताचा औषध आणि लशीच्या संशोधनातही सहभाग आहे, असे ते म्हणाले.

भारताकडून करोना साथरोगाशी लढण्यासाठी भारताच्या शेजारी देशांना मदतीचा हात दिला आहे, भारतीय वैद्यकतज्ज्ञांकडून इतरांनाही ऑनलाइन प्रशिक्षण दिले आहे, याकडेही मोदी यांनी लक्ष वेधले. काही देश मात्र ‘विषाणू दहशतवाद’ पसरवत आहेत, असे ते म्हणाले. जग करोनाशी लढत आहे, तर काही जण समाज आणि देशादेशांना एकमेकांपासून विलग करण्यासाठी दहशतवाद, खोट्या बातम्या आणि बनावट व्हिडिओ पसरवत आहे, असे ते म्हणाले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Bharatiya Kisan Sabha: ‘शेतकऱ्यांचं संपूर्ण थकीत वीज बिल माफ व्हायला हवं होतं’ – bharatiya kisan sabha leader ajit navale welcome state budget but expect...

हायलाइट्स:अजित पवारांनी मांडला महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्पशेतकऱ्यांना थकीत वीज बिलात ३३ टक्के सूटभारतीय किसान सभेनं केलं अर्थसंकल्पाचं स्वागत, पण व्यक्त केली अपेक्षाअहमदनगर:...

covid 19 vaccine: करोना लसः रजिस्ट्रेशन करताना ‘या’ चुका करू नका – covid 19 vaccine online 5 things to be careful about while registering

हायलाइट्स:करोना लस देशात उपलब्ध असून ती अनेकांनी घेतली आहे लवकरच सर्वसामान्यांसाठी उपलब्ध केली जाणार आहे या लस संबंधी कोणीही काहीही मागितले तर त्यावर...

Kunkeshwar Fair: करोनाचा धसका! श्री क्षेत्र कुणकेश्वरची यात्रा पहिल्यांदाच अशा पद्धतीनं साजरी होणार – sindhudurg: kunkeshwar fair of devgad cancelled due to coronavirus

हायलाइट्स:राज्यात करोनानं पुन्हा खाल्ली उचलधार्मिक कार्यक्रम, यात्रांवर निर्बंधकोकणातील श्री क्षेत्र कुणकेश्वरची यात्राही रद्दसुरेश कौलगेकर । सिंधुदुर्गदक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र...

Recent Comments