Home शहरं बीड india news News : लडाखमध्ये भारतीय पेट्रोलिंग भागाचा चीनी सैन्यानं घेतला ताबा...

india news News : लडाखमध्ये भारतीय पेट्रोलिंग भागाचा चीनी सैन्यानं घेतला ताबा – china pla tibet command executes mock war drill at night amid ladakh border tension


लडाख : लडाखमध्ये भारत आणि चीनच्या सैन्यादरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून तणावाचं वातावरण आहे. आता लडाखमध्ये भागात चीननं घुसखोरी केल्याचं समोर आलं आहे. सेनेच्या काही जवानांना करोना संक्रमणानं ग्रासल्यानंतर भारतानं वास्तविक नियंत्रण रेषेजवळ (LAC) मार्च महिन्याच्या सुरुवातील होणारा आपला अभ्यास काही वेळेसाठी पुढे ढकलला आहे. याचाच फायदा घेत चीनी सैन्यानं रणनीतीच्यादृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या भारतीय सेनेच्या पेट्रोलिंग भागात आपली पोझिशन घेतलीय. त्यामुळे पुन्हा एकदा भारत – चीन सैन्य समोरा-समोर आलंय. चीनची चलाखी लक्षात आल्यानंतर भारतानं सर्व कोविड १९ प्रोटोकॉल तोडताना लेह भागात आपल्या सैनिकांना परत पाठवलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गलवान भागात चीनचे जवळपास ३४०० सैनिक तैनात आहेत. तर पँगाँग सरोवराजवळ चीनचे जवळपास ३६०० सैनिक आहेत.

‘इकॉनॉमिक टाईम्स’नं सरकारी सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या बातमीनुसार, सेना आणि भारतीय तिबेटीयन सीमा पोलिसांच्या सब सेक्टर नॉर्थ (SSN) मध्ये मार्चमध्ये युद्धाभ्यास होणार होता. हा अभ्यास करोना संक्रमणामुळे पुढे ढकलण्यात आला. चीनकडूनही आपला अभ्यास एका महिन्यासाठी पुढे ढकललाय. परंतु, चीनकडून गलवान आणि पँगाँग सरोवराच्या जवळच्या भागावर सैनिकांना तैनात केलंय. चीनच्या या धूर्तपणामुळे दौलद बेग ओलिड आणि कारकोरम पास ते लेहपर्यंत जाणाऱ्या रस्त्याशी संपर्क तुटण्याचा धोका निर्माण झाला आहे.

चीनकडून तिबेटमध्ये रात्रीच्या अंधारात युद्धाचं ‘मॉक ड्रील’

चीन सेंट्रल टेलिव्हिजन (CCTV) नं दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री १ वाजता PLA च्या स्काऊट युनिटनं तांगुला या टेकडीकडे वाटचाल सुरू केली. या मार्चदरम्यान गाड्यांच्या लाईट बंद ठेवण्यात आल्या होत्या. तसंच भारताच्या ड्रोनपासून वाचण्यासाठी ‘नाईट व्हिजन डिव्हाइस‘ची मदत घेतली गेली. रस्त्यात येणारे अडथळे पार करण्यासाठी ड्रोनच्या मदतीनं बॉम्बस्फोट करण्यात आले. टार्गेटच्या जवळ पोहचल्यानंतर कॉम्बॅट टेस्टही करण्यात आली. यासाठी स्नायपर युनिट पुढे पाठवण्यात आलं होतं. फायर स्ट्राईक टीमनं एक हलक्या हत्यारांची गाडी अँटी टँक रॉकेटनं उडवून दिली.

यानंतर कमांडर्सनं गाडीवर लावण्यात आलेल्या इन्फ्रारेड सैन्य परिक्षण सिस्टमच्या मदतीनं सेनेच्या तुकडीला पुढच्या लढाईसाठी टार्गेटपर्यंत पोहचवण्यात मदत केी. या युद्धाभ्यासादरम्यान जवळपास २००० मोर्टार शेल, रायफल ग्रेनेड आणि रॉकेटसचा वापर करण्यात आला. यामुळे नव्या हत्यारं आणि उपकरणांसोबत लढाईसाठी सेनेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.

भारत आणि चीनची सीमा उंचावर आहे. दोन्ही देशांच्या लष्करात तणाव निर्माण करणाऱ्या काही घटना घडल्यानंतर दोन्ही बाजुंना सैन्य तैनात करण्यात आलंय. त्यामुळेच तयारी म्हणून चीननं हे पाऊल उचलल्याचं समोर येतंय. उल्लेखनीय म्हणजे, अमेरिकेनंही भारत-चीन तणावासंबंधी चिंता व्यक्त केली होती.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Raghu: India vs Australia: भारतीय संघातील एक सदस्य झाला ‘गायब’? करोनाच्या चुकीच्या रिपोर्टमुळे झाला घोळ… – team india’s throw down specialist raghu’s corona test...

सिडनी, India vs Australia : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाचा सराव सुरु झाला आहे. पण या दौऱ्यात भारतीय संघातील एक सदस्य अजूनही सरावाला आलेला...

Shahrukh Khan Snapped Near Gateway Of India In Mumbai – तो बघ शाहरुख! बदललेल्या लुकमुळे किंग खान बाजूने चालत गेल्याचंं कोणाला कळलंच नाही

मुंबई- बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानचे चाहते तो मोठ्या स्क्रीनवर परतण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आयपीएलमध्ये त्याचा नवीन लुक समोर आल्यानंतर चाहते...

Vanchit Bahujan Aghadi: रेशनकार्डसाठी बायको द्या, तहसिलदारांसमोर युवकाचे अनोखे आंदोलन – vanchit bahujan aghadi protest for ration card in ahmednagar

अहमदनगर: सरकारी कार्यालयातून मागण्या मान्य करून घेण्यासाठी अनेकदा अनोखी आंदोलने केली जातात. बीड जिल्ह्यातील पाटोदा तहसिदार कार्यालयासमोरही एका युवकाने असेच वेगळे आंदोलन केले....

Recent Comments