Home देश india news News : 'वर्ल्ड सायकल डे'च्या दिवशीच 'अॅटलस'चं उत्पादन बंद! -...

india news News : ‘वर्ल्ड सायकल डे’च्या दिवशीच ‘अॅटलस’चं उत्पादन बंद! – production stopped in atlas cycle factory ghaziabad more than 450 workers unemployed


गाझियाबाद, उत्तर प्रदेश : आज जागतिक सायकल दिन (World Bicycle Day)… करोना संकटाच्या या काळात अनेक जण सध्या लोकांना सायकल चालवण्याचं प्रोत्साहन देत आहेत. सायकलमुळे आपोआपच सोशल डिस्टन्सिंग राखलं जात असल्यामुळे सरकारकडूनही सायकलिंगला प्रोत्साहन मिळतंय. पण, आज सायकल दिनाच्या दिवशीच आपल्याला प्रत्येकाच्याच ओळखीच्या असलेल्या ‘अॅटलस’ सायकलचं उत्पादन मात्र बंद झालंय.

अॅटलस सायकल’ हा ब्रॅन्ड जवळपास प्रत्येकाच्याच ओळखीचा आहे. परंतु, हीच सायकल बनवणारी कंपनी सध्या आर्थिक संकटाचा सामना करतेय. त्यामुळे कंपनीनं उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधला साहिबाबाद स्थित आपला कारखाना चालवण्यात असमर्थता दर्शवली आहे.

कंपनी बंद झाल्यानं कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसलाय. यामुळे जवळपास ४५० कर्मचाऱ्यांवर थेट बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. तर याचा जवळपास ७०० कर्मचाऱ्यांना अप्रत्यक्षरित्या परिणाम होणार आहे.

कंपनीकडून आपल्या कर्मचाऱ्यांना एक नोटीस देण्यात आलीय. या नोटिशीत ‘कारखान्याच्या मालकांकडे हे काम सुरू ठेवण्यासाठी पुरेशी रक्कम नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी ३ जूनपर्यंत एक बैठक घ्यावी’ असं म्हटलं गेलंय.

गेल्या काही वर्षांत कंपनी मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करतेय. कंपनीजवळ असलेला सगळा पैसा एव्हाना खर्च झालाय. आता परिस्थिती अशी आलीय की कंपनीकडे उत्पन्नाचं कोणतंही साधन नाही. दैनंदिन खर्चही भागवणं आता कंपनीला शक्य होत नाही. जेव्हापर्यंत पैशांची सोय होत नाही तेव्हापर्यंत कारखान्यात कच्चा माल येऊ शकणार नाही. अशा वेळी कारखाना सुरू ठेवता येणार नाही, असंही या नोटिशीत म्हटलं गेलंय.

७४ कर्मचारी झाले करोडपती; CEOचे पॅकेज ३९ टक्क्यांनी वाढले!
करोना लॉकडाऊन : ‘ती’नं संकटातही अशी शोधली संधी!Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

jameel shaikh murder: Jameel Shaikh Murder: मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येला गंभीर वळण; ठाण्यातील ‘तो’ नगरसेवक कोण? – jameel shaikh death complaint against thane corporator

महेश गायकवाड । ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राबोडी प्रभाग अध्यक्ष जमील शेख यांचे मारेकरी २४ तासानंतरही सापडलेले नसून मारेकऱ्यांना अटक करण्याचे पोलिसांचे युद्धपातळीवर...

Recent Comments