Home देश india news News : Corona : सत्येंद्र जैन 'निगेटिव्ह' तर अभिषेक मनु...

india news News : Corona : सत्येंद्र जैन ‘निगेटिव्ह’ तर अभिषेक मनु सिंघवी ‘पॉझिटिव्ह’! – delhi minister satyendar jain recovers from covid, am singhvi tested positive


नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत करोना संक्रमणाचा फैलाव वाढतच चाललेला दिसतोय. याच दरम्यान प्लाज्मा थेरपीनंतर दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांचा करोना रिपोर्ट ‘निगेटिव्ह’ आलाय तर दुसरीकडे काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी हे करोना ‘पॉझिटिव्ह’ आढळलेत.

सत्येंद्र जैन यांची करोनावर मात

करोना व्हायरस संक्रमित दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांच्या आरोग्याच्या बाबतीत आता सुधारणा दिसून येतेय. सत्येंद्र जैन यांना मॅक्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दोन वेळा कोविड १९ टेस्ट केल्यानंतर सत्येंद्र जैन करोना संक्रमित असल्याचं समोर आलं होतं. तब्येत बिघडल्यानंतर त्यांना राजीव गांधी सुपर स्पेशालिटी रुग्णालायात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना मॅक्स रुग्णालयात हलवण्यात आलं. इथं त्यांना प्लाझ्मा थेरपी देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या आरोग्यात सुधारणा झाल्याचं दिसून आलं. सत्येंद्र जैन यांची करोना चाचणी आता निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलीय.

वाचा :करोनावरील औषधाची पहिली खेप महाराष्ट्रासह ५ राज्यांना रवाना
वाचा :पतंजलीने ‘असं’ करायला नको होतं, सरकारने सुनावलं

अभिषेक मनु सिंघवी यांच्यावर उपचार सुरू

दुसरीकडे, काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आलेत. सिंघवी यांच्या ऑफीस स्टाफची मात्र करोना चाचणी निगेटिव्ह आलीय. सिंघवी यांच्यात करोनाची सौम्य लक्षणं दिसून आल्यानंतर त्यांना ९ जुलैपर्यंत होम आयसोलेशनमध्ये राहण्यास सांगण्यात आलंय. सिंघवी यांना २३ जून रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एका सुनावणीत सहभागी झालेलं पाहण्यात आलं होतं.

यापूर्वी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्र हेदेखील करोना संक्रमित आढळले होते. काही दिवस रुग्णालयात उपचार पार पडल्यानंतर त्यांचा करोना रिपोर्ट नेगेटिव्ह आला. त्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तसंच भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासहीत त्यांच्या आईचाही करोना रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ आला होता.

दिल्लीची करोना आकडेवारी

राजधानी दिल्लीत प्रत्येक दिवशी करोना संक्रमितांच्या संख्येत वाढ होताना दिसतेय. करोना संक्रमण रोखण्यासाठी केंद्र सरकारनंही कंबर कसलीय. दिल्लीतील करोना आकडेवारीवर लक्ष टाकलं तर इथं आत्तापर्यंत ७३,७८० रुग्ण करोना संक्रमित आढळले आहेत. यातील ४४,७५६ रुग्णांवर उपचार यशस्वी ठरलेत. तर जवळपास २४२९ रुग्णांना कोविड १९ मुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. अद्याप २६,५८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत .

वाचा :मोदींच्या हस्ते ‘या’ नव्या योजनेची सुरुवात; ५ लाख रोजगार मिळणार
वाचा :१२ ऑगस्टपर्यंत रेग्युलर ट्रेन धावणार नाहीत, १०० टक्के रिफंड मिळणारSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

मराठवाड्याची रुग्णसंख्या पाचशेच्या खाली

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद मराठवाड्यात एका दिवसात आढळणाऱ्या बाधितांची संख्या सातत्याने घटत आहे. विभागात सोमवारी (२६ ऑक्टोबर) ४३३ नवीन बाधित आढळले. विविध रुग्णालया...

fine to covid norms beaker: ७१ दोषींना ३८ हजारांचा दंड – nashik district court recovered 38000 rupees fine from who break covid 19 norms

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकलॉकडाऊन काळातील नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या ७१ दोषी नागरिकांना सोमवारी (दि. २६) कोर्टाने शिक्षा ठोठावली. या नागरिकांकडून ३८ हजार रुपयांचा...

WhatsApp: व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढल्याने ‘त्यांनी’ केला अॅडमिनवर हल्ला – whatsapp group admin attacked by two men after removing member

नागपूर : व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढून टाकल्याने अॅडमिनवर हल्ला करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चंद्रमणी यादव (५०, सिंधी कॉलनी, वैशालीनगर) आणि छत्रपती...

Recent Comments