Home देश india news News : Galwan valley : ज्याचं नावच भारतीय, तिथे चीनचा...

india news News : Galwan valley : ज्याचं नावच भारतीय, तिथे चीनचा दावा कसा? – how was galwan valley named explained by explorers grandson


नवी दिल्ली : विस्तारवादी चीनने भारतीय जवानांवर जीवघेणा हल्ला केल्यानंतर पूर्ण गलवान खोऱ्यावरच दावा केला आहे. चीनचा हा दावा भारताने फेटाळून लावला असला तरी चीनने अनेकदा गलवान व्हॅलीवर दावा केला आहे. पण या गलवान व्हॅलीच्या नावालाही एक इतिहास आहे. एका भारतीयाच्या नावावरुन या नदीला गलवान खोरे नाव देण्यात आलं होतं. स्थानिक गुलाम रसूल गलवान यांच्या शौर्यावर खुश होऊन ब्रिटीशांनी गलवान हे नाव दिलं होतं.

रसूल यांचे नातू मोहम्मद अमिन गलवान यांनी चीनला खडेबोल सुनावले आहेत. १८९५ ला ब्रिटीशांसोबत ट्रेकिंग करताना माझ्या आजोबांनी पहिल्यांदाच गलवान व्हॅली ओलांडली होती, असं ते म्हणाले. ट्रेकिंग करताना वातावरण अचानक खराब झालं. मृत्यू सर्वांच्याच डोळ्यासमोर उभा होता. रसूल गलवान यांनी आपलं शौर्य दाखवत सर्वांना सुरक्षितपणे वाचवलं, अशी माहिती मोहम्मद अमिन यांनी आयएएनएसला दिली. हे अभूतपूर्व शौर्य पाहून ब्रिटीश खुश झाले आणि त्यांनी काय बक्षिस पाहिजे, अशी विचारणा केली. मला काहीही नको, पण या नाल्याला माझं नाव द्यावं, अशी मागणी त्यांनी केली होती आणि तेव्हापासूनच गलवान व्हॅली अशी ओळख झाली.

ब्रिटीशांच्या काळात या भागाला गलवान रसूल किंवा गलवान नाला म्हणून ओळखलं जात होतं, असंही मोहम्मद अमिन म्हणाले. १५ जून रोजी झालेल्या हिंसक झटापटीत भारताचे २० जवान याच भागात शहीद झआले. चीनच्या सैन्याकडून सीमेवर सातत्याने एकतर्फी बदल केला जाण्याचा प्रयत्न केला जात आहे. याला उत्तर देताना भारतीय जवान शहीद झाले.

गलवान व्हॅलीत आपलं बलिदान दिलेल्या जवानांनाही मोहम्मद अमिन यांनी सलाम केला. १९६२ च्या युद्धात चीनने गलवान खोऱ्यात घुसखोरी केली होती. पण आपल्या जवानांनी चीनला पिटाळून लावलं होतं. सध्याही या भागात अनेक घटना घडत आहेत. आपले जवान देशाचं संरक्षण करत आहेत. हा भाग गेल्या २०० वर्षांपासून भारताचा आहे आणि कायम भारताचाच राहिल, असंही ते म्हणाले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

television news News : कपिल शर्मानं मौन सोडलं;पडद्यावरच्या ‘भीष्म पितामह’यांना दिलं ‘हे’ उत्तर – kapil sharma finally responds to mukesh khanna’s attack on his...

मुंबई: कॉमेडी किंग कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये अश्लिल भाषेचा वापर करत हुल्लडबाजी सुरु असते , अशी टीका अभिनेते मुकेश खन्ना यांनी...

Rishabh Pant Is Recover From Injury And He Will Be Play In Todays Match Against Kings Eleven Punjab – IPL2020: दिल्लीसाठी गूड न्यूज, पंजाबविरुद्धचा...

दुबई : पंजाबबरोबरचा सामना सुरु होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला एक आनंदाची बातमी मिळाली आहे. दिल्लीच्या संघात एका धडाकेबाज खेळाडूचे आज पुनरागमन होऊ शकते,...

Recent Comments