Home देश पैसा पैसा INDIA REVIVAL MISSION: भारत नवसंजीवनी मिशन ; राष्ट्राची क्षमता खुली करतानाची आव्हाने...

INDIA REVIVAL MISSION: भारत नवसंजीवनी मिशन ; राष्ट्राची क्षमता खुली करतानाची आव्हाने – india’s mission begin with new opportunities in pandemic


एस. एन. सुब्र्हमण्यम , मुंबई : आर्थिक पॅकेजचे तपशील आता स्पष्ट झाले आहेत, आर्थिक मंत्र्यांनी समजावून दिलेले २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज ही निश्चितपणे भारताचे पुनर्चलनीकरण करण्याची नांदी आहे. ४५ लाख एमएसएमईजसाठी तारण मुक्त कर्ज योजना, त्याला ३ लाख कोटी रुपयांच्या क्रेडिट गॅरंटी फंडाची जोड आणि २०,००० कोटी रुपयांचे दुय्यम कर्ज आणि १०,००० रुपयांचे इक्विटी फंड यांसारख्या उपायांमुळे यंत्रणेतील प्रवाहीपणाला नक्की साथ मिळेल.

ईपीएफ कॉन्ट्रीब्युटर्ससाठी २,५०० कोटी लिक्विडीची जोड देण्याची योजना, एमएसएमई, एचएफसीज आणि एफएफआयच्याच्या डेट इन्स्ट्रुमेंट्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या एनबीएफसीसाठी ३०,००० कोटी रुपयांपर्यंत क्रेडिट गॅरंटी, उर्जा निर्मिती करणाऱ्या कंपन्या व डिस्कॉम्ससाठी लिक्विडीटी तसेच इतर फायदे पुरवणे हे रोखीपासून वंचित झालेल्या भारताचे पुनर्चलनीकरण करण्यासाठी उचलण्यात आलेले महत्त्वाचे पाऊल आहे. हा आपल्या इतिहासातील खऱ्या अर्थाने निर्णायक क्षण आहे, जो १९२९ ची आर्थिक महामंदी, दुसरे महायुद्ध आणि २००८ च्या जागतिक आर्थिक संकटासारख्या घटनांनाही मागे टाकणारा आहे. जगाचा जीडीपी वेगाने खाली येत असून भारताची स्थितीही वेगळी नसेल. आपल्या अर्थव्यवस्थेतील काही क्षेत्रांनी यापूर्वीच त्यांच्या नेहमीच्या आकारमानात ६० ते ८० टक्के घट नोंदवली आहे. आपली दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ, तेलावर अवलंबून असलेल्या मध्यपूर्वेला कच्च्या तेलाच्या किंमती खूप घसरल्यामुळे मोठ्या आव्हानाला तोंड द्यावे लागत आहे.

वाचा : भारताने कंबर कसली; चीनमधील या वस्तुंच्या आयातीला चाप लावणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजमध्ये यापूर्वी लॉकडाउनचे फटके बसलेल्या अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या उपाययोजनांचाही समावेश असून त्याशिवाय छोट्या व्यवसायांसाठी करसवलत तसेच देशांतर्गत उत्पादनासाठी सवलती देण्यावर त्यात लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. हे एकत्रित पॅकेज जीडीपीच्या अंदाजे १० टक्के असून अमेरिकेने आपल्या जीडीपीच्या १३ टक्क्यांचे पॅकेज, तर जपानने आपल्या जीडीपीच्या २१ टक्क्यांचे पॅकेज जाहीर केल्याचे लक्षात घेता आपले पॅकेज भरीव आहे.

बहुतेक देशांप्रमाणे व्यवसायांना वित्तपुरवठा करणे हा या आर्थिक पाठिंब्याचा सर्वात मोठा घटक आहे. या पॅकेजचा एक भाग सुधारणा करण्यासाठी, एक भाग कर
सवलतीसाठी आणि बहुतेक भाग कंपन्या आणि व्यक्तींना नवी मागणी आणि गुंतवणुकीद्वारे चालना देण्याऐवजी तत्काळ येणाऱ्या संकटाची तीव्रता कमी होईपर्यंत
तगवण्यावर लक्ष केंद्रित करेल. आर्थिक मंत्र्यांचे हे दान प्रामुख्याने एमएसएमई क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणारे असले, तरी मला आशा आहे, की शेअर बाजारात नवे वातावरण तयार झाल्यावर ‘ट्रिकल डाउन इफेक्ट’ अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रांवर प्रभाव पाडेल. मात्र, सुरक्षा सर्वात पहिली आणि महत्त्वाची. एल अँड टी मध्ये आम्ही आमच्या सर्व कर्मचाऱ्याच्या विशेषतः कामगार आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देत आहोत. काही पॉझिटिव्ह केसेस आणि क्वारंटाइननंतर आम्ही आमच्या सर्व ठिकाणच्या कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय आणि आरोग्यसेवेबद्दल जास्त जागरूक झालो आहोत. ज्या प्रकारे आम्ही या परिस्थितीला हाताळले आहे, ते पाहून काही राज्य सरकारांनी आमचे व्यक्तीशः आभार मानले. आम्ही वर्क फ्रॉम होमच्या नव्या युगातही प्रवेश केला आहे.

वाचा : चीनचा बाजारपेठेवर कब्जा; बहिष्काराची गोष्टी सोपी नाही!
मात्र, आमची कंपनी प्रकल्पानुसार काम करते आणि साइटचे काम घरी बसून होऊ शकत नाही. यानिमित्ताने आम्हाला तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्याची संधी मिळाली. आम्ही आमची यंत्रे व उपकरणे रिमोट सर्व्हरवरून डिजिटली जोडण्यासाठी आयओटीचा वापर करत आहोत. कामकाज आधीपेक्षा जास्त प्रभावी झाले असून पुढील आठवड्यांत बरंच काम करायचं आहे. लिक्विडीटी ही आमच्या समोरची सर्वात महत्त्वाची समस्या असून पुढील काही महिन्यांतही ती कायम राहील. मी आशा करतो, की हे आर्थिक पॅकेज सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील आमच्या ग्राहकांना आमची थकबाकी लवकरात लवकर फेडण्यासाठी आवश्यक चालना देईल. आम्हाला वर्षाच्या सुरुवातीच्या भागात लिक्विडीच्या मोठ्या आव्हानाला तोंड द्यावे लागणार आहे आणि कदातिच आमच्या कामकाजाच्या प्रत्येक पैलूशी संबंधित खर्चात कपात करण्याचे विवेकी तसेच कठीण काम हाती घेऊन धाडसाने या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. उच्चपदस्थ तसेच कामगारांशी संबंधित व्यवस्थापनांना येत्या काही काळात त्यागही करावे लागणार आहेत.

धोरणांत काही बदल, प्रवासावर निर्बंध, पुरवठा साखळीच्या गरजांमध्ये परत एकदा वाटाघाटी इत्यादी बाबी या कोव्हिड-१९ काळाच्या खेळाचा भाग असतील. अर्थातच यापुढील वर्षाचा अदमास घेतल्यास व्यवसायाची संभाव्यता खूप कमी आहे. आणि तरीही आमच्यासारख्या कंपन्या हळूहळू पुढे जात राहातील. राज्यांवर बराच ताण असेल, केंद्रीय सरकारच्या सूचना पालनावर देखरेख करावी लागेल आणि भविष्याकडे पाहाता कदाचित बहुपक्षीय अनुदानीत रोजगार ही नित्याची बाब असेल.

सर्व कंपन्या त्यांच्या ग्राहकांमुळे यशस्वी होतात. लॉकडाउननंतरच्या या अवघड काळावर मात करण्यासाठी आम्हाला आमच्या ग्राहकांची मदत लागेल. अडचणीत
असलेल्या काही ग्राहकांची आपल्याला मदत करावी लागेल, तर सध्याच्या निसरड्या वाटेवरून पुढे जाण्यासाठी काही ग्राहकांना जलद अंमलबजावणीची गरज लागेल. सध्याच्या परिस्थितीत आमच्या पुरवठादार यंत्रणेला सर्वाधिक मदतीची गरज आहे, कारण ते आमचा कणा आहेत. प्रत्येक संकटात एक संधी दडलेली असते. यंत्रणेत आलेल्या व्यतत्यामुळे कित्येकदा संकट संपल्यानंतर निर्माण होणाऱ्या संधींचा लाभ घेण्यासाठी यंत्रणा तसेच प्रक्रियेला आवश्यक चालना मिळते. स्पष्ट ध्येयावर लक्ष केंद्रित करणाऱ्या कंपन्या दीर्घकाळात यशस्वी होतील. आमची कंपनी अतिशय सकारात्मक, आक्रमक आणि कामगिरीवर भर देणारी आहे. हा मूलभूत सिद्धांत कोणत्याही कंपनीला या अनपेक्षित साथीमुळे उद्भवलेल्या संकटावर यशस्वी मात करण्यासाठी मदत करेल. कोव्हिड-१९ सारख्या साथीमुळे अनपेक्षित समोर आलेल्या परिस्थितीला प्राक्तन म्हणतात. मात्र, या प्राक्तनाला आपण कसा आकार देतो यावरून आपले भाग्य ठरते. विकसित देशांतील बहुतेक देशांच्या तुलनेत भारताचे भाग्य जास्त उजळ दिसत आहे. आर्थिक पॅकेजसह लॉकडाउन उठवणे हे अर्धा अब्ज नोकरदार लोकसंख्येच्या मदतीने नव्या भविष्याला आकार देण्यासाठी आपली क्षमता खुली करण्याच्या दिशेने उचललेले पहिले पाऊल आहे.

(एस. एन. सुब्र्हमण्यम हे लार्सन अँड टुब्रो या अभियांत्रिकी क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. ही त्यांची वैयक्तिक मते आहेत.)Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

it raid: anurag kashyap : अनुराग कश्यप, तापसी पन्नूसह इतरांनी कोट्यवधींची संपत्ती दडवली! – it raid on two production houses anurag kashyap and taapsee...

नवी दिल्लीः दिग्दर्शक अनुराग कश्यप ( anurag kashyap ), अभिनेत्री तापसी पन्नू ( taapsee pannu ) आणि इतर काही जणांच्या ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाने...

Recent Comments