Home देश indian air force deployment: India-China: पाकिस्तानला हादरवणारं विमान लडाखमध्ये तैनात - indian...

indian air force deployment: India-China: पाकिस्तानला हादरवणारं विमान लडाखमध्ये तैनात – indian air force chief rakesh kumar bhadauria visits leh and srinagar air base to review preparedness


श्रीनगर : भारतीय हवाई दलाचे प्रमुख राकेश कुमार सिंग भदोरिया यांनी लेह आणि श्रीनगर येथील वायू दल तळांना भेट दिली आणि तयारीचा आढावा घेतला. भारत आणि चीन यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर हवाई दल हाय अलर्टवर आहे. चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत आणि लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्यासोबतच्या सुरक्षा बैठकीनंतर भदोरिया यांनी त्यांचा लेह आणि श्रीनगर दौरा सुरू केला. हवाई दलाचे शक्तीशाली लढाऊ विमाने लडाख आणि परिसरात तैनात आहेत.

LAC stand-Off: चीनच्या ताब्यात होते १० भारतीय जवान; चर्चेनंतर सोडले

हवाई दल प्रमुख लेह आणि श्रीनगरला दोन दिवसांच्या दौऱ्यावर गेले होते. बुधवारी या दौऱ्याची सुरुवात झाली. चीन सीमेवरील प्रत्येक गरज पूर्ण करण्यासाठी या दोन तळांवर आघाडीचे लढाऊ विमाने तैनात करण्यात आली आहेत, अशी माहिती वरिष्ठ सरकारी सूत्रांनी एका वाहिनीला दिली. चीनच्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली होती.

अक्साई चीन परत मिळवणं कठीण, पण अशक्य नाही : जामयांग नामग्याल

एअर स्ट्राईक केलेलं विमानही तैनात

या तणावानंतर भारतीय सैन्य आणि हवाई दल हाय अलर्टवर आहे. दररम्यान, हवाई दलाने बालाकोट एअर स्ट्राईकसाठी वापरलेलं आघाडीचं लढाऊ विमान मिराग २००० लडाखजवळील तळावर तैनात केलं आहे, जिथून पँगोंग त्सो आणि इतर ठिकाणी काही मिनिटात उड्डाण घेता येईल.

india-china clash: चीनी हल्ला पूर्वनियोजित होता; सरकार झोपेत होते- राहुल गांधी

पूर्व लडाखमध्ये भारतीय सैन्याला सहाय्य करण्यासाठी आपाचे अटॅक हेलिकॉप्टर आणि चिनूक चॉपरही जवळच्या भागात तैनात करण्यात आलं आहे. अति उंचीवरील क्षेत्रात लढण्यासाठी सज्ज असणारे ट्विन इंजिन लढाऊ विमानेही लेहच्या तळावर हजर आहेत. मोठ्या लांबीचा मारा करण्याची क्षमता असलेल्या विमानांची हालचाल श्रीनगर, अंबाला, अदमपूर आणि हलवारा तळांवरही दिसून आली आहे.

चिन्यांवर गोळीबार करण्याचे आदेश का दिले नाही? अमरिंदर सिंग यांचा सवाल

तिबेट क्षेत्रासाठीही पूर्व तयारी

तिबेट भागातील ऑपरेशन्ससाठी बरेलीमधील हवाई तळही हाय अलर्टवर आहे. चीनच्या सैन्याकडून उचललं जाणारं प्रत्येक पाऊल रोखण्यासाठी हवाई दलाने आपले इशान्य भारतातील तळही सक्रिय केले आहेत. दरम्यान, दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीही सीमेवरील परिस्थितीवर सर्वपक्षीय बैठकीला संबोधित करणार आहेत.

पाकची नवी चाल, लडाख तणावाचा फायदा घेण्याचा प्रयत्न

हवाई दलाकडून विमान खरेदीचा प्रस्ताव

भारत-चीनदरम्यान पूर्व लडाखमध्ये तणाव असताना हवाई दलाने केंद्र सरकारने महत्त्वाचा प्रस्ताव ठेवला आहे. हवाई दलाने रशियाकडून २१ नवे मिग-२९ आणि १२ Su-30MKI ही लढाऊ विमानं खरेदीचा प्रस्ताव दिला आहे. हवाई दलाकडून गेल्या काही कालावधीपासून यावर काम सुरू होते. पण आता या प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. याशिवाय ६ हजार कोटींच्या अतिरिक्त संरक्षण सामग्री खरेदीचे प्रस्ताव पुढच्या आठवड्यात संरक्षण मंत्रालयासमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

it raid: anurag kashyap : अनुराग कश्यप, तापसी पन्नूसह इतरांनी कोट्यवधींची संपत्ती दडवली! – it raid on two production houses anurag kashyap and taapsee...

नवी दिल्लीः दिग्दर्शक अनुराग कश्यप ( anurag kashyap ), अभिनेत्री तापसी पन्नू ( taapsee pannu ) आणि इतर काही जणांच्या ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाने...

Recent Comments