Home देश Indian Army: सीमेवर पाकच्या चौक्या उद्ध्वस्त, भारतीय लष्कराचा दणका - indian army...

Indian Army: सीमेवर पाकच्या चौक्या उद्ध्वस्त, भारतीय लष्कराचा दणका – indian army carried out accurate and effective firing and caused heavy damage to pakistan army posts in the rajouri sector


नवी दिल्लीः सीमेवर पाकिस्तानकडून सतत होत असल्याचा गोळीबाराला भारतीय लष्कराने सणसणीत उत्तर दिले आहे. पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी रात्री जम्मू-काश्मीरमध्ये राजौरी आणि पुंछ येथील सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला होता. त्यात भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला होता. यानंतर भारतीय लष्कराने राजौरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर केलेल्या कारवाईत पाक चौक्या उद्ध्वस्त झाल्या आहेत, लष्करातील सूत्रांच्या माहितीवरून एएनआयने हे वृत्त दिल्ं आहे.

घुसखोरी रोखल्याने पाकचा जळफळाट

भारतीय सीमेत दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी पाकिस्तानकडून सतत प्रयत्न केले जात आहेत. पण त्यात पाक तोंडावर आपटत आहे. यासह काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत अनेक दहशतवादी ठार झालेत. यामुळे पाकचा जळफळाट होतोय, असं लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं. जानेवारीपासून आतापर्तंय ९८ दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आलं आहे. तर गेल्या वर्षाच्या तुलनेत पाकने सीमेवर शस्त्रसंधीचे जास्त वेळा उल्लंघन केले आहे. या महिन्यात १० दिवसांत पाकने ११४ वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय.

शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार वाढला

पाकिस्तानने २०१९मध्ये सीमेवर गोळीबार करत १६ वर्षात सर्वात जास्त शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं. आता या वर्षी पाकिस्तान हा रेकॉर्ड मोडण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसतंय. पाकिस्तानने २०१९ मध्ये ३१६८ गोळीबाराचं उल्लंघन केलंय. या वर्षात अजून ६ महिनेही पूर्ण झाले नाहीएत. पण पाकिस्तानने आतापर्यंत २०२७ वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. पाकने गेल्या वर्षी जानेवारी ते मे दरम्यान ११४० वेळा गोळीबार करत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं. या वर्षी मेपर्यंत १९१३ केला गोळीबार केला होता.

मागच्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसने मध्य प्रदेश गमावलं; आता राजस्थान रडारवर?

सीमेवर अनेक ठिकाणी गोळीबार

पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर बुधवारी रात्री अनेक ठिकाणी गोळीबार करत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. मंजाकोट सेक्टरमध्ये रात्री १०.२० मिनिटांनी, १०.४० ला केरी सेक्टरमध्ये गोळीबार केला. राजौरी सेक्टरमध्येही गोळीबार केला. यात भारतीय लष्करातील नायक गुरुचरण सिंग शहीद झाले होते. ते पंजाबच्या गुरदारपूरचे होते. त्याआधी मंगळवारी पाकने मनकोटे सेक्टरमध्ये गोळीबार केला होता. पाककडून केरन, रामपूर आणि उरी सेक्टरमध्येही गोळीबा करण्यात आला होता.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Nitish Kumar rally: प्रचारसभेत ‘लालू यादव जिंदाबाद’च्या घोषणा; संतापलेले नितीशकुमार म्हणाले… – bihar election lalu yadav jindabad a group of people raising slogans in...

पाटणाः राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या सभांना मोठी गर्दी होत आहे. तेजस्वी यादव १० लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन देतात त्यावेळी जोरदार...

rcb vs kkr highlights: Royal Challengers Bangalore Beat Kolkata Knight Riders By 8 Wickets – IPL2020: विराट कोहलीच्या आरसीबीने मिळवला केकेआरवर मोठा विजय

अबुधाबी: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आरबीसीच्या संघाने आजच्या सामन्यात केकेआरवर सहजपणे मोठा विजय मिळवला. केकेआरच्या फलंदाजांनी यावेळी आरसीबीच्या गोलंदाजीपुढे लोटांगण घातल्याचे पाहायला मिळाले होते....

Recent Comments