Home आपलं जग करियर indian army bharti 2020: भारतीय लष्करात भरती; कोणत्या राज्यात कधी रॅली? वाचा...

indian army bharti 2020: भारतीय लष्करात भरती; कोणत्या राज्यात कधी रॅली? वाचा – indian army bharti 2020 jobs for 8th to 12th pass in indian army


Indian Army Bharti 2020: भारतीय लष्कर पुन्हा एकदा तरुणांना देशाची सेवा करण्याची संधी देत आहे. सैन्याने अनेक वेगवेगळ्या जागांवर नोकर भरती केली आहे. या पदांसाठी आठवी उत्तीर्ण, दहावी उत्तीर्णांपासून ते बारावी उत्तीर्णांपर्यंत उमदेवार अर्ज करू शकतात.

या नोकरभरतीसाठी सैन्य दलामार्फत रॅली काढण्यात येणार आहे. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या तारखांना हा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या सर्वांसाठी नोंदणी प्रक्रियाही सुरू आहे.

कोणत्या पदांसाठी भरती होईल, कोणत्या राज्यात रॅली कधी होईल, कधीपर्यंत तुम्हाला नोंदणी करावी लागेल…याची माहिती या बातमीत पुढे दिली जात आहे. त्याशिवाय प्रत्येक राज्यात घेण्यात येणाऱ्या सैन्य भरती रॅलीची स्वतंत्र अधिसूचना आणि नोंदणीच्या लिंक्सही पुढे दिल्या जात आहेत.

पदांची माहिती

सोल्जर जनरल ड्यूटी
सोल्जर टेक्निकल
सोल्जर नर्सिंग असिस्टेंट
सोल्जर क्लर्क / स्टोर कीपर टेक्निकल
शिपाई
सोल्जर ट्रेड्समन (दहावी पास)
सोल्जर ट्रेड्समन (आठवी पास)

लष्कराने अद्याप कोणत्या पदाच्या किती जागा रिक्त आहेत याची माहिती दिलेली नाही.

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा (पोस्ट्सनुसार)

सैनिक जनरल ड्युटी – दहावी पास (वय – १७ वर्षे ६ महिने ते २१ वर्षे)
सैनिक तांत्रिक – विज्ञान (पीसीएम) ते १२ वी पास (वय – १७ वर्षे ६ महिने ते २३ वर्षे)
सैनिक नर्सिंग सहाय्यक – विज्ञान (पीसीबी) ते १२ वी पास (वय – १७ वर्षे ६ महिने ते २३ वर्षे)
सैनिक लिपिक / स्टोअर कीपर टेक्निकल – कोणत्याही शाखेतील १२ वी पास (वय – १७ वर्षे ६ महिने ते २३ वर्षे)
शिपाई – १२ वी पास आणि फार्मामध्ये डिप्लोमा (वयोमर्यादा – १९ ते २५ वर्षे)
सैनिक ट्रेड्समन – दहावी पास (वय – १७ वर्षे ६ महिने ते २३ वर्षे)
सैनिक ट्रेड्समन – आठवी पास (वय – १७ वर्षे ६ महिने ते २३ वर्षे)

निवड प्रक्रिया – सैन्यात भरतीसाठी उमेदवारांची निवड वैद्यकीय चाचणीच्या आधारे केली जाईल. पुढील सूचनेवरून सविस्तर माहिती घेता येईल.

रॅली व अर्जाची माहिती

१. पंजाब – एआरओ पटियाला रॅली (ARO Patiala Rally 2020)
नोंदणी / अर्जाची तारीख – २ जून २०२० ते १६ जुलै २०२० पर्यंत
प्रवेशपत्रांची तारीख – १७ जुलै २०२० ते २६ जुलै २०२० पर्यंत डाऊनलोड करता येईल.
रॅलीची तारीख – १ ऑगस्ट २०२० ते १६ पर्यंत

२. हरयाणा – एआरओ चरखी दादरी रॅली (ARO Charkhi Dadri Rally 2020)
नोंदणी / अर्जाची तारीख –
प्रवेशपत्रांची तारीख २ मे २०२० ते १५ जून २०२०
अॅडमिट कार्ड – १६ जून २०२० ते ३० जुलै २०२०

रॅली – १ जुलै २०२० ते १४ जुलै २०२०

३. श्रीनगर – एआरओ श्रीनगर रॅली (ARO Srinagar Rally 2020)
नोंदणी / अर्ज करण्याची तारीख – २७ एप्रिल २०२० ते १० जून २०२०
रॅलीची तारीख – २६ जून २०२० ते ३० जून २०२० पर्यंत

प्रत्येकासाठी, नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण करावी लागेल. अर्ज शुल्क नाही.

नोंदणी व अधिसूचनांच्या लिंक्स

१. पंजाब सेना भर्ती रॅली (Punjab Sena Bharti Rally 2020)
नोंदणीसाठी लिंक
अधिसूचनेची लिंक

२. हरयाणा सेना भरती रॅली (Haryana Sena Bharti Rally 2020)
नोंदणीसाठी लिंक
अधिसूचनेची लिंक

३. श्रीनगर सेना भरती रॅली (Srinagar Sena Bharti Rally 2020)
नोंदणीसाठी लिंक
अधिसूचनेची लिंकSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Anil Parab: ‘सुपारी घेतल्याशिवाय मनसे हा पक्ष कामच करू शकत नाही’ – shivsena leader and maharashtra minister anil parab attacks on mns party over...

म. टा. प्रतिनिधी, मुंबई'मनसे भाजपबरोबर जाणार ही बदलत्या राजकारणाची नांदी आहे की नाही हे मला माहीत नाही. मात्र, मनसे सुपारी घेतल्याशिवाय काम करू...

municipal corporation election in maharashtra: पालिकेत आवाज वार्डांचा ! – municipal corporation election in maharashtra and political party

जितेंद्र अष्टेकरस्थानिक स्वराज्य संस्थांच्या गेल्या निवडणुकीत प्रभागरचना करताना भारतीय जनता पक्षाने सत्तेचा गैरवापर केला. आता मात्र तसे काही होणार नाही, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री...

Recent Comments