Home देश indian china news: चीनने S-400 मिसाईल तैनात केल्यास भारताकडे पर्याय काय? -...

indian china news: चीनने S-400 मिसाईल तैनात केल्यास भारताकडे पर्याय काय? – What Are The Options For India Against S400 Missile System


नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यात तणाव कमी करण्यासाठी चर्चा सुरूच आहे. पण चीनकडून कधीही विश्वासघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच भारत सर्व तयारी करत आहे. पण भारताच्या शत्रूकडे जगातील सर्वात शक्तीशाली हवाई संरक्षण करणारं क्षेपणास्त्र आहे. रशियन बनावटीचं एस-४०० हे क्षेपणास्त्र चीनने भारताच्या अगोदरच घेतलं आहे, ज्यासाठी २०१४ मध्ये चीन-रशिया यांच्यात करार झाला होता. या परिस्थितीत चीनने एस-४०० आपल्या बाजूने तैनात केल्यास भारताकडे काय पर्याय आहे हाही प्रश्न पडतो. भारताने याचीही तयारी केली आहे.

India China रशियाने भारताला शस्रास्त्र देऊ नये, चीनचा खोडा घालण्याचा प्रयत्न

चीनसोबतचा तणाव पाहता भारतीय सैन्याने लडाखमध्ये हवाई संरक्षण क्षेपणास्त्र तैनात केलं आहे. काही वृत्तांनुसार, भारतीय सैन्याने चीनच्या वायू सेनेचा धोका टाळण्यासाठी जमीन ते आकाश असा मारा करणारं क्षेपणास्त्र तैनात केलं आहे. भारतीय हवाई दलाने यापूर्वीच आपली लढाऊ विमाने सज्ज ठेवली आहेत. पण चीनकडे जगातील सर्वात शक्तीशाली क्षेपणास्त्र आहे याची जाणीवही भारताला आहे. त्यामुळे भारताने पूर्व तयारी केली आहे.

क्षेपणास्त्र, दारुगोळा लवकर पाठवा; भारताची रशियाला विनंती

काय आहे एस-४०० क्षेपणास्त्र?

एकाचवेळी ३६ वार करण्याची क्षमता असणारी एस ४०० मिसाइल सिस्टीम भारताने तब्बल ४०,००० कोटी रुपये देऊन रशियाकडून विकत घेतली आहे. ही सिस्टीम आतापर्यंतची सर्वात आधुनिक मिसाइल सिस्टीम असून पाकिस्तान आणि चीनचा मुकाबला करताना भारताला याचा भरपूर फायदा होणार आहे.

राजनाथ सिंह रशिया दौऱ्यावर; लडाख तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताला हवं ‘ब्रह्मास्र’!

एस-४०० क्षेपणास्त्र

अमेरिकेचे फायटर प्लेन,युद्ध बेस संपवण्यासाठी १९६७मध्ये रशियाने एस२०० मिसाइल सिस्टीम विकसित केली. कालांतराने तिचं रुपांतर एस ३०० आणि २००७ रोजी एस ४००मध्ये झालं. एस ४०० मिसाइलला अत्ंयत लांबलचक ४०० किमीची रेन्ज आहे. या मिसाइल सिस्टीममध्ये एकूण १२ लाँचर आहेत . यातील एक लाँचर एकवेळी तीन मिसाइल्स लाँच करू शकतं. भारताची भौगोलिक परिस्थिती पाहता या मिसाइलचं महत्त्व अधिकचं अधोरेखित होतं. या एका मिसाइलचा विध्वंस होऊन काही कारणाने राख झाली तर त्यातूनही चार नव्या मिसाइल्स बनवल्या जाऊ शकतात.

मोदींसाठी पुतिन यांनी रिसेप्शन टाळलं

भारताकडून लवकर डेलिव्हरी देण्याची विनंती

क्षेपणास्त्र, दारुगोळा आणि असॉल्ट रायफलची डेलिव्हरी लवकरात लवकर करण्यात यावी, अशी विनंती भारताने रशियाला केली आहे. आपत्कालीन खरेदी मार्गाद्वारे ही डेलिव्हरी करावी, अशी मागणी रशियाची राजधानी मॉस्कोला गेलेल्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्त्वातील शिष्टमंडळाने केली. भारतीय सैन्याला अधिक मजबूत करणारा दारुगोळा लवकर देण्याबाबत रशियाने सकारात्मकता दाखवल्याची माहिती आहे. चीनसोबत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाची सकारात्मकता अत्यंत महत्त्वाची बाब मानली जाते.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Kangana Ranaut: कंगनाला २२ मार्चपर्यंत अटक करू नका; हायकोर्टाचे निर्देश – kangana ranout and rangoli chandel maintained interim protection from arrest

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईअभिनेत्री कंगना रणौट व तिची बहीण रंगोली चंडेल यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी नोंदवलेल्या देशद्रोहाच्या गुन्ह्याच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी...

Iqbal Mirchi: मुंबई : मिर्चीचे कुटुंबीयही ‘परागंदा आर्थिक गुन्हेगार’ – court declares iqbal mirchi’s family members fugitive economic offenders

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा दिवंगत निकटवर्तीय व कुख्यात गँगस्टर इक्बाल मेमन उर्फ इक्बाल मिर्ची याची पत्नी हाजरा तसेच मुले आसिफ व...

Recent Comments