Home क्रीडा indian karate federation: भारतीय कराटे फेडरेशनची मान्यता रद्द - recognition of indian...

indian karate federation: भारतीय कराटे फेडरेशनची मान्यता रद्द – recognition of indian karate federation canceled


नवी दिल्लीः जागतिक संघटनेच्या घटनेचा भंग केल्याप्रकरणी जागतिक कराटे फेडरेशनने भारतीय कराटे फेडरेशनची मान्यता रद्द केली आहे. जागतिक संघटनेने यासंदर्भात केलेल्या चौकशीनंतर हा निर्णय घेतला आहे.

जागतिक कराटे फेडरेशनचे प्रमुख अँटोनिओ एस्पिनोस यांनी भारतीय कराटे फेडरेशनचे अध्यक्ष हरीप्रसाद पट्टनायक यांना पत्र लिहून या निर्णयाबद्दल कळविले आहे. त्यात लिहिले आहे की, जागतिक फेडरेशनने केलेल्या चौकशीनंतर भारतीय कराटे फेडरेशनची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय संघटनेत जे सतत वादविवाद सुरू आहेत, त्यामुळे आम्ही नाराज आहोत.

भारतीय कराटे फेडरेशनने अंतर्गत वादविवादांमुळे आपली प्रतिष्ठा गमावली आहे. लिखा तारा यांच्या नेतृत्वाखालील एक गट विद्यमान पदाधिकारी गैरमार्गाने निवडून आल्याचे म्हणत असून एक गट आपलेच या संघटनेवर नियंत्रण असल्याचे म्हणत आहे. तसेच एक गट भरत शर्मा यांना उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करा अशी मागणी करत आहे. ही मान्यता रद्द करण्यात आली असली तरी फेडरेशनला याविरोधात दाद मागण्याची संधी आहे. जागतिक संघटनेच्या शिस्तपालन समितीकडे पुढील २१ दिवसांत ही दाद मागता येणार आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments