Home क्रीडा Indian Olympic Association: धमकीप्रकरण; ४८ तासात बिनशर्त माफी मागा! - karate association...

Indian Olympic Association: धमकीप्रकरण; ४८ तासात बिनशर्त माफी मागा! – karate association batra charged with intimidation


वृत्तसंस्था, नवी दिल्ली

कराटे असोसिएशनचे सचिव आंबेडकर गुप्ता यांना धमकी दिल्याप्रकरणी भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष नरिंदर बात्रा यांना कराटे असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष भरत शर्मा यांनी नोटीस बजावली आहे. धमकीप्रकरणी ४८ तासात बिनशर्त माफी मागण्यास सांगितले आहे.

कराटे असोसिएशनचे सचिव गुप्ता यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नोटिशीत ठेवण्यात आला आहे. बात्रा यांना पाठविलेल्या या नोटिशीत म्हटले आहे की, तुमच्या वर्चस्वाविरुद्ध आणि धोरणांविरुद्ध गुप्ता यांनी आवाज उठविला. पण तुम्ही त्यांची कारकीर्द संपुष्टात आणण्याची धमकी दिली. शिवाय, कराटे असोसिएशनला भविष्यात कुणीही मान्यता देणार नाही, असे सुनावण्यात आले.

गेल्या काही दिवसांत भारतीय ऑलिम्पिक संघटनेतील वादविवाद चव्हाट्यावर आले आहेत. राजीव मेहता, सुधांशू मित्तल यांचे बात्रा यांच्याशी बिनसले आहे. दोन्ही बाजूंनी पत्रांच्या माध्यमातून एकमेकांवर चिखलफेक झाली आहे. त्यातून संघटनेची प्रतिष्ठाच धुळीस मिळाली आहे.

मित्तल यांनी तर बात्रा यांच्या चौकशीची मागणी आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन व आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडे केली होती. पण त्या संघटनांनी बात्रा यांना क्लिन चीट दिली. आता कराटे असोसिएशनच्या या नव्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा बात्रा हे चर्चेत आले आहेत.

गुप्ता यांनी असा आरोप केला होता की, बात्रा यांना आयओएमध्ये इतरांचा हस्तक्षेप चालत नाही, पण ते इतर राष्ट्रीय क्रीडा संघटनांत हस्तक्षेप करतात. कराटे संघटनेच्या अध्यक्षांशी माझे विवाद असतील पण तो आमच्या संघटनेचा प्रश्न आहे. हे प्रकरण बात्रा यांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी मला फोन करून धमकी दिली. भारतातून कराटे हद्दपार करण्याची धमकीही त्यांनी दिली.

गुप्ता यांनी यासंदर्भात आयओएचे सचिव राजीव मेहता आणि क्रीडा मंत्रालयाकडे तक्रार केल्याचे म्हटले आहे.

बात्रा यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावताना गुप्ता यांच्याशी झालेल्या फोनवरील संवादाच्या रेकॉर्डिंगमध्ये गडबड करण्यात आल्याचे म्हटले आहे. माझी बदनामी करण्याचा हा प्रयत्न असल्याचेही बात्रा यांचे म्हणणे आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Nitish Kumar rally: प्रचारसभेत ‘लालू यादव जिंदाबाद’च्या घोषणा; संतापलेले नितीशकुमार म्हणाले… – bihar election lalu yadav jindabad a group of people raising slogans in...

पाटणाः राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या सभांना मोठी गर्दी होत आहे. तेजस्वी यादव १० लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन देतात त्यावेळी जोरदार...

rcb vs kkr highlights: Royal Challengers Bangalore Beat Kolkata Knight Riders By 8 Wickets – IPL2020: विराट कोहलीच्या आरसीबीने मिळवला केकेआरवर मोठा विजय

अबुधाबी: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आरबीसीच्या संघाने आजच्या सामन्यात केकेआरवर सहजपणे मोठा विजय मिळवला. केकेआरच्या फलंदाजांनी यावेळी आरसीबीच्या गोलंदाजीपुढे लोटांगण घातल्याचे पाहायला मिळाले होते....

Recent Comments