Home देश Indian railways latest news: १२ ऑगस्टपर्यंत रेग्युलर ट्रेन धावणार नाहीत, १०० टक्के...

Indian railways latest news: १२ ऑगस्टपर्यंत रेग्युलर ट्रेन धावणार नाहीत, १०० टक्के रिफंड मिळणार – Regular Passenger Train Services Cancelled Till 12 August 2020


नवी दिल्लीः देशातील करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे रेल्वे बोर्डाने आज महत्त्वाचा निर्णय घेतला. १२ ऑगस्टपर्यंत मेल, एक्स्प्रेस, पॅसेंजर ट्रेन, मेट्रो, लोकल ट्रेन आणि EMU ची वाहतूत बंदच राहील. तसंच १२ ऑगस्टपर्यंत रेग्युलर ट्रेनच्या बुकींग केलेल्या प्रवाशांना तिकीटाचा १०० टक्के रिफंड दिला जाईल, असं रेल्वे बोर्डाने स्पष्ट केलं आहे. रेल्वे बोर्डाच्या या निर्णयामुळे मुंबईतील लोकल रेल्वेची वाहतूकही बंद राहणार आहे. यामुळे आत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना ऑगस्टपर्यंत अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

विशेष ट्रेन सुरूच राहणार

१३ मे रोजीच्या आपल्या आदेशात रेल्वे बोर्डाने ३० जूनपर्यंत सर्व रेल्वे गाड्यांचे बुकींग रद्द केले होते. तिकीटाचे सर्व पैसे प्रवशांना दिले जातील, असंही सांगितलं होतं. आता रेल्वेची वाहतूक १२ ऑगस्टपर्यंत बंद राहणार असल्याने १२ ऑगस्टपर्यंतच्या सर्व तिकीटांचे पैसे प्रवाशांना पूर्णपणे रिफंड केले जाणार आहेत. पण यादरम्यान १२ मेपासून सुरू असलेल्या राजधानी विशेष ट्रेन आणि १ जूनपासून सुरू असलेल्या मेल, एक्स्प्रेस या विशेष ट्रेन सुरूच राहतील, असं रेल्वे बोर्डाने स्पष्ट केलं आहे.

पतंजलीने ‘असं’ करायला नको होतं, सरकारने सुनावलं

करोनावरील औषधाची पहिली खेप महाराष्ट्रासह ५ राज्यांना रवाना

३० जूनपर्यंत रेल्वे वाहतूक बंद होती

यापूर्वी रेल्वे मंत्रालयाने सोमवारी एक सर्क्युलर जारी केलं होतं. त्यात १४ एप्रिल किंवा त्यापूर्वी बुक केलेल्या तिकीटांचे पैसे प्रवाशांना पूर्णपणे रिफंड केले जातील, असं या सर्क्युलरमध्ये म्हटलं होतं. रेल्वेने ३० वाहतूक जूनपर्यंत बंद होती. आता नव्या आदेशानुसार रेल्वे वाहतूक १२ ऑगस्टपर्यंत बंद राहणार आहे.

१५ ऑगस्टनंतरच रेल्वे वाहतूक सुरू होणार?

रेल्वेच्या नियमानुसार १२० दिवस आधी तिकीटाचे बुकींग करता येते. आता रेल्वेने १४ एप्रिल आणि त्या पूर्वीच्या तिकीटाचे बुकींग रद्द करून पैसे रिफंड करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच १५ ऑगस्ट पूर्वीच्या तिकीटाचे पैसे रिफंड होतील. यामुळे रेल्वेची वाहतूक १५ ऑगस्टनंतर सुरू होईल, असा अंदाज व्यक्त केला जातोय.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

LIVE : मुंबईसाठी आरोग्य विभागाचं मोठं पाऊल, आता 3 ऐवजी 29 रुग्णालयांमध्ये लसीकरण | News

7:04 am (IST) विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस राज्यपालांच्या अभिभाषणावर होणार चर्चा चर्चेचा दुसरा आणि अंतिम दिवस चर्चेला मुख्यमंत्री उद्धव...

illegal parking in mumbai: अवैध पार्किंग जोरात – mumbai traffic police not strict action against illegal road parking in mumbai

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमहापालिकेने आपल्या वाहनतळांच्या परिसरातील अवैध पार्किंगवर कारवाईचे अधिकार वाहतूक पोलिसांना दिले. मात्र पोलिसांनी अद्याप ही कारवाई सुरू केलेली नाही....

Recent Comments