Home देश indian railways news: आत्मनिर्भर भारत; रेल्वेचे रुळही आता भारतातच तयार - Still...

indian railways news: आत्मनिर्भर भारत; रेल्वेचे रुळही आता भारतातच तयार – Still Authority Of India Making Railway Tracks


नवी दिल्ली : भारताने स्वदेशीचा नारा दिल्यानंतर रेल्वेचे गुणवत्तापूर्ण रेल्वे रुळही देशातच मिळणार आहेत. भारताला सध्या या रेल्वे रुळांसाठी परदेशात, विशेषतः युरोपियन बाजारपेठेवर अवलंबून रहावं लागतं. आता स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच सेलने भिलाई स्टील प्लांटमध्ये रेल्वे रुळांची निर्मिती सुरू केली आहे. या प्रकारच्या रुळांची पहिली खेप ३० जून २०२० रोजी भिलाईमधून रवाना करण्यात आली.

आमचं सैन्य कधीही भारतासोबत; हा बलाढ्य देश समर्थनार्थ मैदानात

सेलचे संचालक (व्यापार योजना) आणि भिलाई संयंत्राचे सीईओ (अतिरिक्त प्रभार) अनिर्बान दासगुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, आर २६० ग्रेडच्या व्हॅनेडियम अलॉयड स्पेशल ग्रेड प्राईम रेल्वेची निर्मिती भिलाईमध्येच सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत हे रेल्वे रुळ भारतात तयार होत नव्हते. या गुणवत्तापूर्ण रुळांसाठी युरोपमध्ये जावं लागत होतं. भिलाई प्लांटमध्ये तयार झालेला रोल युरोपियन मानकांपेक्षाही चांगला असल्याचा सेलचा दावा आहे. युरोपियन स्पेसिफिकेशन २.५ पीपीएम (कमाल) हायड्रोजन कंटेंटच्या तुलनेत भिलाईमध्ये १.६ पीपीएम (कमाल) हायड्रोजन कंटेंट आहे, जो युरोपियन क्षमतेपेक्षा जास्त मजबूत आहे. यासाठी आरडीएसओकडूनही हिरवा झेंडा मिळाला आहे.

आजपासून देशात अनलॉक २.० सुरू; पाहा, काय आहे नवी नियमावली?

भारतीय रेल्वे आता आपल्या गाड्या वेगाने चालवण्याचा विचार करत आहे. सोबतच मालगाड्यांमध्ये अगोदरच्या तुलनेत आता जास्त सामान नेलं जातं. त्यामुळे रेल्वेला गुणवत्तापूर्ण रुळांची गरज आहे. सेलने हीच गरज लक्षात घेत आर २६० ग्रेड विकसित केला आणि यशस्वीपणे निर्मितीही सुरू केली. भारतीय रेल्वेला सेलकडून २६० मीटर लांबीचे वेल्डेड पॅनल दिले जात आहेत.

पाठदुखी, अतिसार आणि उलट्याही, करोनाची नवीन लक्षणं

संपूर्ण देशाचं ओझं वाहणाऱ्या आणि आर्थिक प्रगतीचा मार्ग असलेल्या रेल्वेचा आधार हा सेल आहे. सेल आणि रेल यांचं एकमेकांसोबत निर्मितीचं नातं आहे. रेल्वेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सेलने वर्षानुवर्षे अत्याधुनिक बदल केले आहेत. भारतीय रेल्वेकडून सूचवण्यात आलेल्या मानकांची अट पूर्ण करण्यासाठी सेलने सर्व आवश्यक ते बदल केले आणि रेल्वेला आवश्यक असलेल्या रुळांची निर्मिती केली. महारत्न दर्जा असलेल्या सेलच्या भिलाई प्लांटला रेल्वेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खास पद्धतीने तयार करण्यात आलेलं आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

festival special trains: Special Trains 2020: पाहा, सणासुदीसाठी नव्या स्पेशल ट्रेन कधी धावणार? – irctc see festival special trains full list 2020 by indian...

नवी दिल्ली: रेल्वेने सणासुदीचे दिवस पाहता काही विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यांमध्ये काही दररोज चालणाऱ्या ट्रेन असून काही साप्ताहिक ट्रेन आहेत....

Aaditya Thackeray visits City Centre Mall: सिटी सेंटर मॉल आग: आदित्य ठाकरेंनी केले अग्निशमन जवानांच्या प्रयत्नांचे कौतुक – city centre mall fire: environment minister...

मुंबई: दक्षिण मुंबईतील सिटी सेंटर मॉलला गुरुवारी रात्री लागलेली आग अजूनही धुमसत असून आगीत मोबाइलच्या सुट्या भागांचा सर्वात मोठा बाजार भस्मसात झाला आहे....

Recent Comments