Home क्रीडा INDvSL: करोनाचा भारतीय क्रिकेटला मोठा धक्का, रद्द करावा लागला दौरा - india's...

INDvSL: करोनाचा भारतीय क्रिकेटला मोठा धक्का, रद्द करावा लागला दौरा – india’s tour of sri lanka called off due to covid-19 pandemic


करोनामुळे भारतीय क्रिकेट संघाला आता एक मोठा धक्का बसला आहे. कारण करोनामुळे भारताला एक सुनिश्चित दौरा रद्द करावा लागणार आहे. हा दौरा रद्द झाल्याचा विपरीत परीणाम आयपीएलवरही होऊ शकतो, असे म्हटले जाऊ लागले आहे.

या महिन्याच्या अखेरीस भारतीय संघ एका दौऱ्यावर जाणार होता. काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने या दौऱ्याला मान्यताही दिली होती. पण आता भारताला करोनामुळे हा दौरा रद्द करावा लागणार आहे. भारतीय संघ आता कधी मैदानात उतरणार, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.

भारतीय संघ श्रीलंकेमध्ये जाऊन तीन ट्वेन्टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआय आणि श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळात चर्चा झाली होती. या दोन्ही मालिका जून-जुलै महिन्यांत खेळवण्यात येणार होत्या. सरकारच्या परवानगीनंतर या दोन्ही मालिका कधी खेळवायच्या, हे ठरवण्यात येणार होते. पण बीसीसीआयने हा दौराच रद्द करण्याचे आता ठरवले आहे.

याबाबत बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धुमल यांनी सांगितले की, ” जून आणि जुलै महिन्यात तरी हा दौरा करणे शक्य होईल असे आम्हाला वाटत नाही. याबाबतची माहिती आम्ही श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाला दिली आहे. आता हा दौरा पुढे कधी करायचा, याचा विचार आम्हाला करावा लागेल.”
बीसीसीआयने श्रीलंकेचा दौरा रद्द केला आहे. पण जर भारतात आयपीएल होऊ शकली नाही तर ती श्रीलंकेमध्ये खेळण्याचा बीसीसीआय विचार करत होती. जर श्रीलंकेचा दौरा रद्द केला जात असेल तर तिथे आयपीएल खेळवायचे की नाही, याचा विचारही बीसीसीआयला करावा लागणार आहे. दुसरीकडे दौरा रद्द केल्यामुळे श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाला मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे हे नुकसान श्रीलंकेचे क्रिकेट मंडळ मागू शकते. दौरा रद्द होत असेल तर आयपीएल आमच्याकडेच खेळवा, अशी अटही श्रीलंकेचे क्रिकेट मंडळ बीसीसीआयपुढे ठेवू शकते. त्यामुळे हा दौरा रद्द करण्याचे काही परीणाम बीसीसीआयला भोगावे लागणार का, हे पाहावे लागेल.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

petrol diesel rate today: इंधन दर ; जाणून घ्या आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव – petrol diesel rate stable today

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज शनिवारी सलग २२ व्या दिवशी इंधन दर स्थिर ठेवले आहेत. आज मुंबईत पेट्रोल ८७.७४ रुपये आणि डिझेल ७६.८६...

Digital India: मोबाइल नेटवर्क नसल्याने गाव विक्रीला – khultabad bhadaji village resident decided to sale village due to lack of mobile network

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद२१व्या शतकात भारत डिजिटल इंडियाच्या दिशेने वाटचाल करीत असताना तालुक्यातील भडजी गावात कोणत्याही मोबाइल कंपनीचे नेटवर्क नाही. करोनाकाळात ऑनलाइन शिक्षणापासून...

career news News : दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ज्ञानगंगा’ – 10th 12th class students online education series dnyanganga on jio channel

म. टा. प्रतिनिधी, पुणेशालेय शिक्षण विभागातर्फे राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानगंगा हा शैक्षणिक कार्यक्रम येत्या सोमवारी २६ ऑक्टोबरपासून सकाळी साडेसात ते साडेबारा...

Recent Comments