Home देश पैसा पैसा infosys crorepati employees: ७४ कर्मचारी झाले करोडपती; CEOचे पॅकेज ३९ टक्क्यांनी वाढले!...

infosys crorepati employees: ७४ कर्मचारी झाले करोडपती; CEOचे पॅकेज ३९ टक्क्यांनी वाढले! – infosys had 74 employees in its crorepati club in 2019-20


नवी दिल्ली: देशातील दुसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसमधील करोडपती कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये कंपनीमधील करोडपती कल्बमधील कर्मचाऱ्यांची संख्या ७४ हजारवर गेली. एका वर्षापूर्वी ही संख्या ६४ इतकी होती.

वाचा- EMI पुढे ढकलताय, फायद्या ऐवजी होऊ शकते नुकसान; जाणून घ्या ३ पर्याय!

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलिल पारेख यांच्या पॅकेजमध्ये २०१९-२० या आर्थिक वर्षात ३९ टक्क्यांनी वाढ होत ते ३४.२७ कोटींवर पोहचली आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षात पारेख यांचे पॅकेज २४.६७ कोटी इतके होते. इन्फोसिसने दिलेल्या माहितीनुसार कंपनीच्या कर्मचाऱ्यांना स्टॉक इसेंटिव्ह (शेअर प्रोत्साहन भत्ता) मिळाल्यामुळे करोडपतींची संख्या वाढली आहे. कंपनीमधील व्हाइस प्रेसिडेंट आणि सिनिअर व्हाइस प्रेसिडेंट स्तरावरील ७४ जण करोडपती लिस्ट मध्ये आहेत.

वाचा- करोनाची जखम; हे आहे अर्थव्यवस्थेसाठीचे औषध!

इन्फोसिसच्या वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या पॅकेजमध्ये फिक्स पे, व्हेरिएबल पे, रिटायरमेंटवर मिळणाऱ्या सुविधा आणि स्टॉक आदीचा समावेश असतो. पण कंपनीतील लिडरशिप स्तरावरील कर्मचाऱ्यांचे पॅकेज समान आहेत. त्यापैकी कोणाला २०१९ मध्ये प्रमोशन मिळाले नाही.

वाचा- झटका; या कंपनीच्या विक्रीत ८३ टक्के घट!

असे आहे पारेख याचे वेतन

इन्फोसिसच्या वार्षिक रिपोर्टनुसार सीईओ पारेख यांचे एकूण वेतन १६.८५ कोटी आहे. यात स्टॉकच्या माध्यमातून १७.०४ कोटी तर ३८ लाख रुपये इतर गोष्टीतून दिले आहेत. कंपनीचे चेअरमन नंदन निलेकणी यांनी स्वच्छेने कोणतेही वेतन न घेण्याचा निर्णय घेतला आहे. पारेख यांच्या बरोबरच कंपनीचे सीओओ युबी प्रवीण राव यांचे वेतन गेल्या वर्षाहून १७.१ टक्क्यांनी वाढून ते १०.६ कोटी इतके झाले आहे. विशेष म्हणजे देशातील क्रमांक एकची आयटी कंपनी असेलल्या टीसीएसचे एमडी राजेश गोपीनाथन यांची पॅकेज गेल्या वर्षाच्या तुलनेत २०१९-२० मध्ये १६ टक्क्यांनी घसरून १३.३ कोटी इतक झाले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

BJP government in Maharashtra: त्यांचे ‘हे’ कौशल्य आज कळाले; शरद पवारांचा दानवेंना चिमटा – raosaheb danve was never known as a ‘jyotishi’ but now...

मुंबई: पुढच्या दोन ते तीन महिन्यात भाजपचं सरकार येईल, असा दावा करणाऱ्या भाजप नेते रावसाहेब दानवे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी...

Sanjay Nirupam: काँग्रेसचा हा नेता म्हणतो, ‘शिवसेना नेत्यांची चौकशी व्हायलाच हवी’ – Shivsena Leaders Are Involved In Corruption, Must Probe, Says Congress Leader Sanjay...

मुंबई: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचं घर व कार्यालयावर ईडीनं टाकलेल्या छाप्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एका सुरात भाजपला घेरलं असताना काँग्रेसचे माजी खासदार...

Aditya Roy Kapur: एका कॉलवर आदित्य रॉय कपूरच्या मदतीला धावून आले रामदास आणि सत्यजित पाध्ये – Aditya Roy Kapur Becomes Bollywoods First Actor Get...

मुंबई- अनुराग बसू यांनी दिग्दर्शित केलेला 'लुडो' हा चित्रपट एका ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. अभिनेता आदित्य रॉय-कपूरनं या चित्रपटात एका शब्दभ्रमकाराची भूमिका...

Recent Comments