Home शहरं जळगाव institutional quarantine: institutional quarantine: क्वॉरंटाइन होण्यास नकार; १८ जणांविरोधात पोलिसांत गुन्हा -...

institutional quarantine: institutional quarantine: क्वॉरंटाइन होण्यास नकार; १८ जणांविरोधात पोलिसांत गुन्हा – fir registered against 18 people for refusing to institutional quarantine


जळगाव:जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात करोना रुग्णाच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आलेल्या अति जोखमीतील १८ जणांनी क्वारांटाइन होण्यास नकार दिल्याने त्यांच्यावर काल शुक्रवारी सायंकाळी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारे क्वारांटाइन न होणाऱ्यांवर गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ( fir registered against 18 people )

अमळनेर शहरातील वाडी चौकाजवळ असलेल्या गुरव गल्लीमधील एक कुटुंबांला करोनाचे लक्षणे दिसत असल्याने त्यांच्या स्वॅबचे नमूने घेण्यात आले होते. त्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानतंर हे कुटुंब करोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. त्यांच्या संपर्कात आलेले गुरव गल्लीमधील १८ जणांना सुरक्षिततेचे उपाय म्हणून क्वारंटाइन करण्यासाठी नगर पालिकेचे कर्मचारी गेले होते. या तीन कुटुंबातील १८ जणांनी प्रताप महाविद्यालय परिसरातील कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाइन होण्यास नकार दिला. क्वारंटाइन होण्यास नकार देत असल्याने मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांच्या आदेशान्वये अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, जळगावमधील करोनाबाधितांची संख्या २७०६ झाली आहे. तर आतापर्यंत १ हजार ४९६ रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात करोनाने आतापर्यंत २०४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात १ हजार १०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ayush doctors: धक्कादायक; करोना निवारण्याचं ट्रेनिंग घेऊन ९८ हजार डॉक्टर गायब!

बेसुमार बिल आकारणाऱ्या सोमय्या रुग्णालयाला कोर्टाचा ‘असा’ दणका

राज्यात काल करोनाच्या ५०२४ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ६५ हजार ८२९ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. काल २३६२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ७९ हजार ८१५ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५२.२५ टक्के एवढे झाले आहे. कालपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८ लाख ७१ हजार ८७५ नमुन्यांपैकी १ लाख ५२ हजार ७६५ नमुने पॉझिटिव्ह (१७.५२ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ५८ हजार ४८८ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ९०३ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात काल १७५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. यापैकी ९१ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित ८४ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.६५ टक्के एवढा आहे.

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या घरी काम करणाऱ्या दोघांना करोनाची लागणSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Maharashtra cabinet: केंद्राच्या ‘दूजाभावा’वर मंत्रिमंडळाची नाराजी – maharashtra cabinet upset on central government’s financial helps

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकेंद्र सरकार आर्थिक मदत करीत नसल्यामुळे राज्य सरकारची कोंडी होत असल्याची तक्रार करीत, मंगळवारच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा...

Fake SMS वरून ट्रायचा BSNL, Airtel, Jio, Vi सह कंपन्यांवर कोट्यवधींचा दंड

नवी दिल्लीः टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने ग्राहकांना फेक एसएमएस पाठवल्याप्रकरणी भारतातील ८ टेलिकॉम कंपन्यांवर संयुक्तपणे ३५ कोटींचा दंड ठोठावला आहे....

Recent Comments