Home देश पैसा पैसा Insurance Policy for Infectious Diseases: ग्राहकांना दिलासा; आता संक्रमित आजारांसाठी सामायिक पॉलिसी...

Insurance Policy for Infectious Diseases: ग्राहकांना दिलासा; आता संक्रमित आजारांसाठी सामायिक पॉलिसी मिळणार – irda issue guideline on common policy for infectious diseases


म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया आदी प्राण्यांकडून संक्रमित होणाऱ्या (व्हेक्टर बॉर्न) आजारांसाठी एकच प्रमाणित पॉलिसी तयार करण्याविषयीची मार्गदर्शक तत्त्वे विमा नियामक व विकास प्राधिकरणाने (इर्डा) जारी केली आहेत. (IRDA Issue Guidelines for Infectious Diseases) विशिष्ट आजारांसाठी सर्व विमा कंपन्यांकडून एकाच प्रकारची पॉलिसी दिली जाऊन आरोग्यविमा पॉलिसीधारकांच्या मनातील संभ्रम दूर होण्यास त्यामुळे मदत मिळणार आहे. या प्रकारच्या पॉलिसीसाठी आरोग्य व आयुर्विमा कंपन्यांसाठी ही तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. या प्रस्तावित पॉलिसीबाबत इर्डाने २७ नोव्हेंबरपर्यंत सूचना व प्रस्ताव मागवले आहेत.

‘अॅपल’चा चीनला झटका ; तब्बल नऊ युनिट भारतात हलवले
नवी प्रस्तावित प्रमाणित आरोग्यविमा पॉलिसी समजण्यास सोपी असणार आहे. त्याचप्रमाणे यामध्ये अन्य आरोग्यविमा पॉलिसींच्या काही नियम व अटी समान राहणार आहेत. डेंग्यू, मलेरिया व चिकुनगुनिया या आजारांसाठी रुग्णालयात भरती व्हावे लागल्यास तो खर्च या प्रमाणित पॉलिसीअंतर्गत मिळणार आहे. यासंदर्भातील आराखडा इर्डाने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे.

इंधन दरवाढ ; आज पुन्हा महागले पेट्रोल-डिझेल
सध्याची स्थिती काय?
सध्या काही विमा कंपन्या डास, माशा, परजीवी यांच्याकडून पसरणाऱ्या आजारांसाठी पॉलिसी देत आहेत. परंतु, या पॉलिसींचे लाभ, अटी, कालावधी विमा कंपनीनुसार बदलता आहे. इर्डाने प्रमाणित केलेली पॉलिसी आयुर्विमा तसेच सर्वसाधारण विमा कंपन्यांकडून एकाच प्रकारची दिली जाईल. अर्थात, यामुळे या कंपन्या सध्या विकत असलेल्या पॉलिसींवर कोणतीही गदा येणार नाही. प्रमाणित पॉलिसींची वैशिष्ट्ये एकसमान असतील. मात्र, त्ंयाचा प्रीमियम ठरवण्याचा अधिकार प्रत्येक जीवन आणि सर्वसाधारण विमा कंपनीला असेल. इर्डाच्या या प्रस्तावात स्थानपरत्वे प्रीमियम बदलण्याची विमा कंपन्यांना परवानगी नसेल.

महागाईची फोडणी ; पामतेलाने ओलांडली शंभरी, सोयाबीन तेल सव्वाशेच्या घरात
हे आजार समाविष्ट
इर्डाने प्रसिद्ध केलेल्या आराखड्यानुसार, ही प्रमाणित पॉलिसी आठ प्रकारच्या संक्रमणशील आजारांसाठी विमा कवच देईल. त्यामध्ये डेंग्यू ताप, मलेरिया, फायलेरिया (लिम्फॅटिक फायलेरियासिस), काला आजार, चिकुनगुनिया, जपानी एन्सिफॅलायटिस आणि झिका विषाणूजन्य आजार यांचा समावेश आहे. या पॉलिसीचे नाव ‘व्हेक्टर बॉर्न डिसिझ हेल्थ पॉलिसी’ असे असेल. या मूळ नावापुढे संबंधित विमा कंपनीचे नाव येईल. या पॉलिसीअंतर्गत वरील आजारांपैकी कोणताही एक किंवा यापैकी काही आजारांसाठी विमा कवच दिले जाईल.

पॉलिसीअंतर्गत काय मिळणार?
या पॉलिसीअंतर्गत रुग्णालयात भरती झाल्याचा खर्च वरील संक्रमणशील (व्हेक्टर बॉर्न) आजारांसाठी दिला जाईल. असा आजार नोंदणीकृत डॉक्टरकडून किंवा प्रयोगशाळेतील चाचण्यांद्वारे निदान झालेला असावा. डे-केअर खर्चही दिला जाणार आहे. वर दिलेल्या आठ व्हेक्टर बॉर्न आजारांपैकी एखाद्या आजारासाठी ही पॉलिसी घेतली असेल आणि हा आजार एकदा बरे झाल्यावर ४५ दिवसांत उलटल्यास त्यासाठीही विमा संरक्षण मिळणार आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

proposal to allow corporate house to set up banks: कॉर्पोरेट्सचा बँकिंग प्रवेश – rajiv madhav joshi article on proposal to allow corporate houses to...

राजीव माधव जोशी आपली बँकिंग सिस्टीम सक्षम व्हावी म्हणून अलीकडेच सादर केलेल्या अहवालानुसार पतसंस्था व बिगर बँकिंग कंपन्यांना नवीन बँक स्थापन करण्याची मुभा...

trp case: टीआरपीप्रकरणी मीडिया ट्रायल नको – bombay high court has directed news channel should not media trial in trp case

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई'टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केलेले असताना, या खटल्यावर प्रभाव टाकणारे मीडिया ट्रायल वाहिन्यांकडून होऊ नये. त्यादृष्टीने...

Sourav Ganguly Announced 5 T 20 Match – करोना काळात हा संघ येणार भारत दौऱ्यावर; BCCIकडून घोषणा

नवी दिल्ली: भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परतल्यानंतर इंग्लंडविरुद्ध कसोटी,वनडे आणि टी-२० मालिका खेळणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने...

Recent Comments