Home देश international flight services: आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंदीबाबत केंद्र सरकारची मोठी घोषणा -...

international flight services: आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंदीबाबत केंद्र सरकारची मोठी घोषणा – centers says that international flight services shall remain suspended till 15th july


नवी दिल्ली: रेल्वेनंतर आता आंतरराष्ट्रीय विमानसेवेबाबत केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीबाबत आज घेतलेल्या निर्णयानुसार, येत्या १५ जुलैपर्यंत देशातून परदेशात जाणारी तसेच परदेशातून देशात होणारी आंतरराष्ट्रीय कमर्शियल विमान वाहतूक सेवेवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, दरम्यानच्या काळात देशांतर्गत विमानसेवा मात्र सुरू राहणार आहे. आजचा केंद्र सरकारचा

२३ मार्चपासून सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद

करोनामुळे संपूर्ण देशात २५ मार्चपासून लॉकडाउन घोषित करण्यात आला होता. त्या पूर्वी २३ मार्च पासून आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद करण्यात आली. सुरुवातीला ही बंदी एक आठवड्यासाठी म्हणजेच २९ मार्चपर्यंत होती. त्यानंतर पुढे जसजसा लॉकडाउन वाढत गेला तसतशी आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर देखील बंदी वेळोवेळी वाढवण्यात आली.

ट्रेन वाहतुकीवरही १२ ऑगस्टपर्यंत बंदी

देशातील रेल्वे वाहतूक १२ ऑगस्टपर्यंत बंदच राहील असे रेल्वेने २५ जूनला जाहीर केले होते. या काळात केवळ विशेष गाड्याच तेवढ्या चालवल्या जातील, असे रेल्वेने स्पष्ट केले होते. रेल्वेच्या जुन्या आदेशानुसार, ३० जून पर्यंत ट्रेनची वाहतूक रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला होता. अशा परिस्थितीत जर कोणी १ जुलै ते १२ ऑगस्ट या काळात तिकिट बुक केले असले तर अशा प्रवाशांना रिफंड मिळणार आहे.

देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या ५ लाखांच्या आसपास

संपूर्ण देशभरात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संपूर्ण देशात आतापर्यंत करोनाची लागण झाल्यानंतर १५ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत देशात जवळपास ५ लाख लोकांना करोनाची लागण झाली आहे. देशभरात दररोज १६ हजार ते १७ हजार नव्या करोनाबाधित रुग्णांची भर पडत आहे. देशातील दिल्ली, मुंबई, तामिळनाडू आणि गुजरातसारख्या शहरे आणि राज्यांमध्ये करोनाचा संसर्ग नियंत्रणाच्या बाहेर गेला आहे. अशा परिस्थितीत सरकारला वाटले तरी ट्रेन, विमान वाहतूक आणि बस वाहतुकीला खुली सूट मिळेल असे वाटत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Jacinda Ardern: न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा अर्डर्न : सहृदय आणि कणखर – pragati bankhele article on new zealand prime minister jacinda ardern

प्रगती बाणखेलेYou can carve your own path, be your own kind of leader.We do need to create a new generation of leadership.नव्या पिढीतलं...

Recent Comments