Home विदेश international news News : मृत्यूचीही तयारी झाली होती: बोरिस जॉन्सन - boris...

international news News : मृत्यूचीही तयारी झाली होती: बोरिस जॉन्सन – boris johnson it was 50 50 whether to put me on ventilator


लंडन :

‘करोनाचे उपचार सुरू असताना माझा मृत्यू ओढवू शकेल याचाही तयारी डॉक्टरांनी ठेवली होती. इतकी माझी अवस्था विकट झाली होती. पण, डॉक्टरांनी मला मृत्यूच्या दाढेतून अक्षरक्ष: खेचून बाहेर काढले. मी त्यांचा शतश: ऋणी आहे’, अशा भावूक शब्दांत ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

जवळपास महिनाभर उपचार घेतल्यानंतर ब्रिटनचे ५५ वर्षीय पंतप्रधान गेल्या आठवड्यात घरी परतले. त्यानंतर ‘द सन ऑन संडे’ला दिलेल्या मुलाखतीत बोरिस जॉन्सन यांनी आपल्या करोनालढ्याविषयीची माहिती दिली आहे. ‘७ एप्रिलला मी सेंट थॉमस हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल झालो आणि डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. ऑक्सिजनचा पुरवठा तर अव्याहत सुरू होता. कठीण काळ होता तो. मी नाकारत नाही. माझी प्रकृतीचं काही खरं वाटत नव्हतं आणि डॉक्टरही काही वाईट घटना घडण्याच्या दृष्टीने तयारीत होते. मला ते जाणवत होतं’, असे जॉन्सन मुलाखतीत सुरुवातीलाच म्हणाले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

करोनाने पुन्हा घेतली उसळी

म. टा. खास प्रतिनिधी, जिल्ह्यात करोनाने पुन्हा उसळी घेतली असून, मंगळवारी ४२४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे काही दिवसांपासून दोनशे ते तीनशेपर्यंतच सीमित...

virat kohli: IND vs ENG : सामन्यानंतर विराट कोहलीने सांगितली कोणाकडून झाली मोठी चुक… – ind vs eng : after winning 3rd test match...

अहमदाबाद, IND vs ENG : तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने १० विकेट्स राखून विजय मिळवला. पण या सामन्यानंतर या लढतीत कोणाकडून मोठी चुक झाली,...

Recent Comments