Home आपलं जग करियर internship opportunities: विद्यार्थ्यांना स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत इंटर्नशिपची संधी - students will get...

internship opportunities: विद्यार्थ्यांना स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत इंटर्नशिपची संधी – students will get internship opportunities in smart city project says hrd minister


शैक्षणिक संस्थांच्या विद्यार्थ्यांना देशभरातील विविध शहरांमध्ये पसरलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत इंटर्नशिपची संधी दिली जाईल. केंद्र सरकारच्या योजनेला ‘ट्यूलिप’ असे नाव देण्यात आले आहे. यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय केंद्रीय नगरविकास व गृहनिर्माण मंत्रालयासोबत या योजनेवर काम करत आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयल निशंक म्हणाले, ‘नगरविकास मंत्रालयाच्या सहकार्याने इंटर्नशिप कार्यक्रम आणला जात आहे. या इंटर्नशिप योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शहरी प्रशासनाबरोबर काम करण्याचा अनुभव मिळू शकतो. तसेच इंटर्नशिप करण्यासाठी या कालावधीत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिकण्याचा अनुभव देखील मिळेल.’

केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीप पुरी आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी गुरुवारी संयुक्तपणे या इंटर्नशिप कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात केली. केंद्र सरकारच्या दोन प्रमुख मंत्रालयांनी तयार केलेल्या या उपक्रमांतर्गत विद्यार्थी स्मार्ट सिटी प्रकल्पांशी संपर्क साधून आपले व्यावसायिक क्षेत्र विकसित करू शकतात. या इंटर्नशिप योजनेत विद्यार्थ्यांना शिकण्याची, क्षमता विकसित करण्याच्या आणि बदल घडवून आणण्याच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येतील.

eRaksha 2020: एनसीईआरटी देतेय इनाम जिंकण्याची संधी

इंग्रजीची भीती? ‘ही’ ५ पुस्तके वाचा आणि फाडफाड बोला

ही इंटर्नशिप सर्व पात्र भारतीय नागरिकांसाठी आहे. या इंटर्नशिप दरम्यान विद्यार्थ्यांना स्मार्ट सिटी संबंधित विविध प्रोजेक्टवर रिअल टाईम प्रशिक्षणही दिले जाईल. यापूर्वी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (जीएससीडीसीएल) ने अभियांत्रिकी व आर्किटेक्टच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिपची संधी दिली आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत इंटर्नशिप करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी यापूर्वीही स्टायपेंडची घोषणा केली गेली होती.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Pune: बॉयफ्रेंडच्या मदतीने पतीला नपुसंक करायचं होतं; ‘असा’ उघड झाला पत्नीचा कट – pune plot to make the husband impotent with the help of...

म. टा. प्रतिनिधी, पुणे: प्रियकराच्या मदतीने पतीला नपुसंक बनवायचा कट 'ती'ने आखला. मात्र, याचा सुगावा लागताच पतीने पोलिसात धाव घेतली. वारजे माळवाडी येथे...

five trillion economy dream: ‘करोना’चा आघात; ‘पाच ट्रिलियन डॉलर’चे स्वप्न बिकटच – the dream of five trillion dollars economy having major challenges ahead

वृत्तसंस्था, मुंबई : देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरवर (५०० लाख कोटी रुपये) पोहोचवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी आणखी काही वर्षे...

KEM Hospital: नायरमध्ये आणखी २५ जणांवर चाचणी – another 25 people will be tested at nair hospital mumbai

म. टा. प्रतिनिधी, मुंबईकरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीवर मुंबईतील केईएम आणि नायर रुग्णालयात चाचणी करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात दोन्ही रुग्णालयांमध्ये प्रत्येकी १०० जणांना...

Recent Comments