Home देश INX Media Case : पी. चिदंबरम, कार्तींच्या अडचणीत वाढ, ईडीने दाखल केले...

INX Media Case : पी. चिदंबरम, कार्तींच्या अडचणीत वाढ, ईडीने दाखल केले आरोपपत्र


नवी दिल्ली: आयएनएक्स मीडिया प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम आणि त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दोघांविरोधात दिल्लीच्या कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे.

ईडीने दाखल केले आरोपपत्र

सक्तवसुली संचालनालयाने माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्याविरोधात आयएनएक्स मीडियामध्ये दोषारोपपत्र दाखल केले आहे. ईडीने सोमवारी विशेष न्यायाधीश अजय कुमार कुहार यांच्या न्यायालयात पासवर्डचे संरक्षण असलेले ई-आरोपपत्र दाखल केले. जर परिस्थिती योग्य असेल तर आरोपपत्राची हार्ड कॉपी दाखल करा, असेही कोर्टाने निर्देश दिले आहेत.

पी. चिदंबरम, कार्तींव्यतिरिक्त इतरही नावे

चिदंबरम यांच्या व्यतिरिक्त त्यांचा पुत्र कार्ती यांचा चार्टर्ड अकाउंटंट एस. भास्करमन आणि इतरांचीही नावे या आरोपपत्रात आहेत. गेल्या वर्षी २१ ऑगस्ट रोजी चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सीबीआयने अटक केली होती. गेल्या वर्षी १६ ऑक्टोबर रोजी ईडीने त्याला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती.

सहा दिवसांनंतर, २२ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयने दाखल केलेल्या खटल्यात ज्येष्ठ काँग्रेस नेते चिदंबरम यांना जामीन मंजूर केला. परंतु, ईडी प्रकरणात गेल्या वर्षी डिसेंबरला त्याला जामीन मंजूर झाला. चिदंबरम यांच्या अर्थमंत्रिपदाच्या कार्यकाळात, सन २००७मध्ये आयएनएक्स मीडिया ग्रुपला परकीय गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने (एफआयपीबी) मंजूर केलेल्या अनियमिततेचा आरोप करीत सीबीआयने आपला खटला १५ मे २०१७ रोजी दाखल केला. यानंतर ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Aurangabad Municipal Corporation: ‘करोना’शी लढताना पालिकांना आर्थिक चिंता – municipal corporation has need government fund to fight with coronavirus

औरंगाबाद: करोना संसर्गाशी दोन हात करताना महापालिकांना शासनाच्या निधीची गरज आहे, पण राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने निधी देताना हात आखडता घेतला आहे....

Maharashtra cabinet: केंद्राच्या ‘दूजाभावा’वर मंत्रिमंडळाची नाराजी – maharashtra cabinet upset on central government’s financial helps

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकेंद्र सरकार आर्थिक मदत करीत नसल्यामुळे राज्य सरकारची कोंडी होत असल्याची तक्रार करीत, मंगळवारच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा...

Recent Comments