आयपीएल २०२०
बीसीसीआयला काहीही करून आयपीएल खेळवायची आहे. त्यासाठी पाकिस्तान विरोध करताना पाहायला मिळत आहे. पण आता आयपीएलच्या मार्गात अडचण निर्माण करणाऱ्या पाकिस्तानला आता बीसीसआयने काही गोष्टींचे पालन करायला सांगितले आहे. जर पाकिस्तानने बीसीसीआयचे ऐकले तर आयपीएल आणि आशिया चषकही खेळवला जाऊ शकतो, असे म्हटले जात आहे.
बीसीसीआयने पाकिस्तानला नेमके काय सांगितले…
सप्टेंबर-ऑक्टोबर या महिन्यात आशिया चषक खेळवण्यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर नोव्हेंबरमध्ये त्यांनी पाकिस्तान सुपर लीगचेही आयोजन केले आहे. त्यामुळे या दोन्ही स्पर्धांच्या तारखा पाहिल्या तर आयपीएल होणे कठीण असल्याचेच पाहायला मिळत आहे. पण यासाठी आता बीसीसीआयने एक उपाय काढला आहे.

आयपीएल २०२०
बीसीसीआयने पाकिस्तानला एक विनंती केली आहे. पाकिस्तानने या वर्षी क्रिकेट लीग रद्द करावी आणि त्या महिन्यामध्ये आशिया चषक खेळवावा, असे बीसीसीआयने सांगितले आहे. जर असे झाले तरच बीसीसीआय आयपीएल खेळवू शकते, नाही तर या वर्षी आयपीएलचे आयोजन कठीण दिसत आहे.