Home ताज्या बातम्या IPL 2020 : मुंबईविरुद्ध 50 रन करताच चेन्नईचा बँगलोरवर निशाणा cricket ipl...

IPL 2020 : मुंबईविरुद्ध 50 रन करताच चेन्नईचा बँगलोरवर निशाणा cricket ipl 2020 CSK troll RCB after match against Mumbai Indians mhsd | News


आयपीएल (IPL 2020)च्या शुक्रवारच्या मॅचमध्ये मुंबई (Mumbai Indians)ने चेन्नई (CSK)चा 10 विकेटने दारुण पराभव केला. पण या मॅचदरम्यान चेन्नईने बँगलोर (RCB)ला ट्रोल केलं.

शारजाह, 24 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या शुक्रवारच्या मॅचमध्ये मुंबई (Mumbai Indians)ने चेन्नई (CSK)चा 10 विकेटने दारुण पराभव केला. टॉस हरल्यानंतर बॅटिंगला उतरलेल्या चेन्नईची सुरुवात अत्यंत खराब झाली. 3 रनवरच त्यांच्या 4 विकेट गेल्या, यानंतर चेन्नई सावरू शकली नाही. या मॅचमध्ये चेन्नईने एन जगदीसन आणि ऋतुराज गायकवाड या युवा खेळाडूंना संधी दिली, पण दोघंही शून्य रनवर आऊट झाले.

चेन्नईने आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच पावरप्लेमध्ये 5 विकेट गमावल्या. पावरप्ले संपला तेव्हा चेन्नईचा स्कोअर 6 ओव्हरमध्ये 47-7 एवढा होता. पण जसा चेन्नईने 50 रनचा आकडा पार केला, तसं त्यांनी ट्विटरवर विराटच्या बँगलोर (RCB)ला ट्रोल केलं.

बँगलोरने आयपीएल इतिहासातला सगळ्यात कमी स्कोअर केला होता. 2017 साली कोलकाता (KKR)विरुद्धच्या मॅचमध्ये बँगलोरचा 49 रनवर ऑलआऊट झाला होता. ईडन गार्डनच्या मैदानात झालेल्या या मॅचमध्ये कोलकात्याने 134 रन केले होते. या आव्हानाचा पाठलाग करायला आलेली बँगलोर 49 रनवर ऑलआऊट झाली आणि कोलकात्याने ती मॅच 82 रननी जिंकली. चेन्नईने बँगलोरच्या या स्कोअरचा दाखला देत त्यांना ट्रोल केलं. चेन्नईने 50 रन केल्यानंतर ‘कमीत कमी 49 रन टाळल्या’, असं ट्विट केलं.

ट्रेन्ट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह यांनी सुरुवातीपासून चेन्नईला धक्के दिले. बोल्टने या मॅचमध्ये 4 विकेट घेतल्या, तर बुमराह आणि राहुल चहरला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. नॅथन कुल्टर नाईलला एक विकेट घेण्यात यश आलं. चेन्नईने ठेवलेल्या आव्हानाचा पाठलाग मुंबईने अगदी सहज 12.2 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता केला. इशान किशनने 37 बॉलमध्ये 68 नाबाद रन आणि क्विंटन डिकॉकने 37 बॉलमध्ये नाबाद 46 रन केले. रोहित शर्माला दुखापत झाल्यामुळे कायरन पोलार्डने या मॅचमध्ये मुंबईचं नेतृत्व केलं होतं. या विजयासोबतच मुंबई पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. 10 पैकी 7 मॅचमध्ये मुंबईचा विजय झाला असून 3 मॅच त्यांना गमवाव्या लागल्या आहेत. त्यांच्या खात्यात सध्या 14 पॉईंट्स आहेत.


Published by:
Shreyas


First published:
October 24, 2020, 5:00 PM IST

Tags:







Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

adult woman free to live with anyone anywhere: ‘प्रौढ तरुणी आपल्या मर्जीने कुठेही आणि कोणाबरोबरही राहण्यास स्वतंत्र’ – adult woman free to live with...

नवी दिल्लीः दिल्ली उच्च न्यायालयाने ( delhi high court ) बुधवारी एक महत्त्वपूर्ण निकाल दिला. प्रौढ महिला आपल्या मर्जीने कोणाबरोबरही आणि कुठेही राहण्यास...

‘त्या’ प्रसूतीबाबत पोलिसांनी मागविली कागदपत्रे

म. टा. खास प्रतिनिधी, अल्पवयीन मुलगी प्रसूतीसाठी दाखल होऊनही याबाबत पोलिसांना न कळविल्याने सिव्हिल हॉस्पिटल प्रशासन अडचणीत आले आहे. या मुलीवर सामूहिक...

aurangabad News : अन्नातून करोना संसर्ग? ठोस पुराव्यांचा अभाव – corona infection from food; lack of concrete evidence

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद: करोनाचा संसर्ग अन्नातून किंवा खाद्य पदार्थातून होण्याविषयी आतापर्यंत कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही. गरम पाणी पिणे किंवा बाहेरून...

Recent Comments