Home क्रीडा ipl 2020: IPLबाबत नवी अपडेट; बीसीसीआय घेणार 'हा' मोठा निर्णय! - bcci...

ipl 2020: IPLबाबत नवी अपडेट; बीसीसीआय घेणार ‘हा’ मोठा निर्णय! – bcci source says ipl this year might be held in sri lanka or uae


मुंबई: आयपीएलच्या १३व्या हंगामाबाबत काल एक मोठी अपडेट आली होती. त्यात बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही स्पर्धा मुंबईत आयोजित करण्याचा विचार सुरू असल्याचे म्हटले गेले होते. आता याबाबत एक नवी माहिती मिळाली आहे. येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आयपीएलचे आयोजन होऊ शकते.

वाचा- द्रविडच्या चार शतकानंतर ‘त्या’ विक्रमाच्या जवळ कोणी पोहोचू शकलं नाही!

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने आयपीएलच्या आयोजनाबाबत एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार ही स्पर्धा भारताबाहेर आयोजित करण्यावर गंभीरपणे विचार सुरू आहे. आयपीएल युएई किंवा श्रीलंकेत होऊ शकते. यासंदर्भात अधिकृत घोषणासाठी बीसीसीआय टी-२० वर्ल्ड कप बाबतच्या आयसीसीच्या निर्णयाची वाट पाहत आहे.

वाचा- सर, तुमच्याबद्दल खूप काही ऐकले होते; सचिन झाला भावूक!

बीसीसीआयला ही स्पर्धा भारतात घेण्याची इच्छा आहे. पण करोना व्हायरसची परिस्थिती पाहता बोर्ड आयपीएलचा १३वा हंगाम युएई किंवा श्रीलंकेत आयोजित करू शकते, असे अधिकाऱ्याने म्हटले.

वाचा- जेव्हा रोहितने बांगलादेशला पळवून पळवून मारले; पाहा व्हिडिओ!

आम्ही अद्याप याचा निर्णय घेतलेला नाही. पण ही शक्यता मात्र अधिक आहे की यावर्षी आयपीएल विदेशातच होईल. भारतात ही स्पर्धा होईल अशी शक्यता वाटत नाही. एक किंवा दोन ठिकाणी सामने आयोजित करून खेळाडू आणि प्रेक्षकांसाठी सुरक्षित वातावरणात रिकाम्या स्टेडियममध्ये स्पर्धा होणे कठिण वाटते.

आयपीएलच्या आयोजनात युएई आणि श्रीलंका सर्वात आघाडीवर आहेत. स्पर्धेचे आयोजन कुठे करावे याबाबतचा निर्णय करोनाच्या स्थितीवर असेल. जो काही निर्णय घ्यायचा असेल तो लवकरात लवकर घ्यावा लागेल, असे अधिकाऱ्याने म्हटले आहे. श्रीलंका आणि युएई या दोन्ही देशांनी बीसीसीआयला आयपीएलच्या आयोजनाचा प्रस्ताव दिला आहे. याबाबत आता बीसीसीआय काय निर्णय घेते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

वाचा- क्रिकेटचा कोच गेला सासऱ्याच्या अंत्यसंस्काराला, आता स्वतःवरच येणार ‘ही’ वेळ

करोनामुळे मार्च महिन्यापासून क्रिकेट स्पर्धा बंद आहे. सध्या वेस्ट इंडिजचा संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दोन्ही देशांतील कसोटी मालिकेमुळे क्रिकेटच्या आयोजनाला बळ मिळेल. अशाच पद्धतीने मुंबईत सुरक्षित झोन करून आयपीएल स्पर्धा होऊ शकेत, असा बीसीसीआयचा विचार असल्याचे वृत्त बुधवारी आले होते.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments