Home क्रीडा Irfan Pathan : जेव्हा इरफानच्या वडिलांना मियाँदाद घाबरले होते... - when irfan...

Irfan Pathan : जेव्हा इरफानच्या वडिलांना मियाँदाद घाबरले होते… – when irfan pathan’s father hurt on javed miandad comment


पाकिस्तानचे माजी धडाकेबाज क्रिकेटपटू जावेद मियाँदाद हे जिद्दी आणि जिगरबाज होते, हे साऱ्यांनीच ऐकले असेल. चेतन शर्माला अखेरच्या चेंडूवर षटकार मारणारे जावेद भारतीयांच्या नेहमीच लक्षात राहीले आहेत. पण जावेद हे एकदा भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणच्या वडिलांना चांगलेच घाबरले होते. हा किस्सा स्वत: इरफाननेच सांगितला आहे…

नेमके घडले तरी काय…
भारताचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यात भारतीय संघात इरफान पठाणही होता. या दौऱ्यात इरफानची चांगली कामगिरी होत होती. त्यावेळी जावेद यांनी इरफानवर टीका केली होती. पाकिस्तानच्या प्रत्येक गल्लीमध्ये इरफानसारखे गोलंदाज पाहायला मिळतील, अशी खोचक टीका जावेद यांनी त्यावेळी केली होती. या त्यांच्या टीकेवर मी कोणतेच वक्तव्य केलेले नव्हते.

याबात इरफान म्हणाला की, ” मी भारतीय संघाकडून पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेलो होतो. त्यावेळी जावेद यांनी माझ्यावर टीका केली होती. माझ्यासारखे गोलंदाज पाकिस्तानच्या प्रत्येक गल्लीमध्ये आहेत, असे त्यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले होते. ही मुलाखत मी आणि माझ्या वडिलांनी वाटली होती, पण वडिल तेव्हा भारतात होते. या दौऱ्यातील अखेरच्या सामन्याच्यावेळी माझे वडिल पाकिस्तानला येणार होते. या सामन्याच्या वेळी वडिल ड्रेसिंग रुममध्ये आले होते. त्यांनी मला सांगितले की, मला जावेद यांना भेटायचे आहे. त्यावेळी मी त्यांना सांगितले की, मला त्यांना भेटायचे नाही. तुम्हाला भेटायचे असेल तर तुम्ही पाकिस्तानच्या ड्रेसिंगरुममध्ये जाऊन त्यांची भेट घेऊ शकता.”

इरफान पुढे म्हणाला की, ” माझे वडिल पाकिस्तानच्या ड्रेसिंगरुममध्ये गेले. त्यांना पाहून जावेद चक्क उभे राहिले. माझ्या वडिलांना ते भेटले आणि म्हणाले की, मी तुमच्या मुलाबद्दल असे कोणतेच वक्तव्य केलेले नाही. हे ऐकून इरफानचे वडिल हसले. ते जावेद यांना म्हणाले की, मी त्याबद्दल तुम्हाला विचारणा करायला आलेलोच नाही. तुम्ही एक चांगले खेळाडू होता, म्हणून फक्त तुमची भेट घेण्यासाठी मी येथे आलेलो आहे.”

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

young woman murder in mhasrul nashik: म्हसरूळ शिवारात महिलेचा खून – 23 years old young woman murdered by unknown person in nashik

म. टा. वृत्तसेवा, पंचवटीम्हसरूळ शिवारातील पेठरोड परिसरातील पवार मळ्यानजिकच्या नाल्याजवळ महिलेचा धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून खून केल्याची घटना मंगळवारी (दि. १९) रात्री...

cold storage project in aurangabad: ‘कोल्ड स्टोअरेज’ला मुहूर्त मिळेना – work on the aurangabad cold storage proposal has not started even after 8 months

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादजाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील प्रस्तावित 'कोल्ड स्टोअरेज'च्या कामास आठ महिन्यांनंतरही मुहूर्त लागला नाही. संबंधित कंपनीने 'लिज प्रीमियम'पोटी...

Recent Comments