महाराष्ट्र के पालघर मे @DGPMaharashtra पुलिस की उपस्थिति मे जूना अखाड़ा के 2 वृद्घ संत जिनका नाम कल्पवृक्ष गिरि ,सु… https://t.co/kJFgnRiq5b
— Yogeshwar Dutt (@DuttYogi) 1587298125000
योगेश्वरला या प्रकरणाचा एक व्हिडीओ मिळाला आहे. हा व्हिडीओ भयंकर गोष्टी दाखवत असल्याचे दिसत आहे. काही लोकं मिळून एका वृद्ध व्यक्तीवर हल्ला करत असल्याचे यामध्ये दिसत आहे. हे ७० वर्षीय चिकने महाराज कल्पवृक्षगिरी असल्याचे म्हटले जात आहे. त्यांच्याबरोबर सुशीलगिरी महाराज आणि चालक निलेश तेलगडे होते. या तिघांना या जमावाने मारहाण केली आणि या तिघांचा जागीच मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे.
हा व्हिडीओ पोस्ट करताना योगेश्वर म्हणाला की, ” महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यामध्ये पोलिसांच्या डोळ्यादेखलत दोन संतांची हत्या करण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्रात संताची हत्या घडली, ही कल्पनाही करवत नाही.”
या प्रकरणाबद्दल इरफान म्हणाला की, ” पालघरमधील प्रकरणात लोकांचा क्रुरपणा पाहून मन हेलावले. हा एक रानटी हल्ला असून मला या गोष्टीमुळे वेदना झाल्या आहेत. हे मारहाण प्रकरण लज्जास्पद आहे.”
So hurtful to see the images of #PalgharMobLynching terrible and barbaric act. #Shame
— Irfan Pathan (@IrfanPathan) 1587324593000
पालघर येथील मॉब लिंचिंगची घटनेबाबत बबीताने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये बबीताने म्हटले आहे की, ” महाराष्ट्रातील पालघर येथे पोलिसांसमोर तीन संतांची हत्या करण्यात आली. ठाकरे सरकार झोपा काढतंय का? त्यांना लाज वाटली पाहिले. सर्व दोषी कॅमेरामध्ये स्पष्टपणे दिसत आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई केली गेली पाहिजे.”
पालघरच्या प्रकरणाचा निषेध गौतम गंभीरने केला आहे. या प्रकरणाबाबत गंभीरने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये गंभीरेने लिहीले आहे की, ” सध्याच्या घडीला माणसामध्ये प्राणी पाहायला मिळत आहे. माणसाची कातडी वावरून प्राणी वावरत असल्याचे दिसत आहे. पालघर येथे अमानुष प्रकार घडला. हा प्रकार निंदनीय होता. पालघर येथील लोकांनी तीन जणांचा जीव घेतला आणि त्यांनी ७० वर्षांच्या व्यक्तीची विनवणीही ऐकली नाही, अशा लोकांची मला लाज वाटते.”