Home आपलं जग करियर iti exams 2020 : आयटीआयची सोमवारपासून परीक्षा; पण परीक्षार्थींना अद्याप लोकलमुभा नाही...

iti exams 2020 : आयटीआयची सोमवारपासून परीक्षा; पण परीक्षार्थींना अद्याप लोकलमुभा नाही – iti candidates, teachers demands permission to travel by train for exam


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

दहावी-बारावी फेरपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची मुभा मिळाली, मात्र खासगी आयटीआयचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना लोकल प्रवास करण्यास अद्याप परवानगी मिळालेली नाही. यासाठी वारंवार अर्ज करूनही दखल घेण्यात आलेली नाही. यामुळे सोमवारपासून आयटीआयच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला कसे पोहचायचे, यासाठी मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

राज्यातील आयटीआय १५ ऑक्टोबरपासून सुरू झाली. त्यानुसार राज्य सरकारने शिक्षक आणि विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची परवानगी दिली. मात्र अद्यापही रेल्वेने आयटीआयचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाला मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांचे प्रवासादरम्यान हाल होत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक होऊ शकलेले नाही. यातच २०१८-१९ मध्ये प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा सोमवारपासून सुरू होत आहे. या परीक्षेचे हॉलतिकीटही शनिवारी उशिरा मिळाले. यामुळे विद्यार्थी गोंधळात असतानाच आता विद्यार्थी आणि शिक्षकांना परीक्षा केंद्रांवर कसे पोहचायचे, असा प्रश्न पडला आहे.

आयटीआयचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना लोकल प्रवासाची मुभा मिळावी, यासाठी असोसिएशन ऑफ नॉन गव्हर्नमेंट आयटीआय या संघटनेने पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहून कळवले असता, त्यांनी मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांनी विनंती केल्यास त्यावर विचार केला जाईल, असे कळवले होते. त्या संदर्भात असोसिएशनने मुख्य सचिव यांना ईमेल द्वारा कळवले. परंतु अद्याप यावर तोडगा निघाला नाही. यामुळे विद्यार्थी, शिक्षकांना लोकल प्रवासाची मुभा नसल्याने शिक्षकांची गैरसोय होत आहे.

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा काळात रेल्वे प्रवासाची मुभा

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

vegetable sellers in mumbai: २० लाख कुटुंबे संकटात – 20 lakh families vegetable seller and workers in crisis due to discussion among people over...

म. टा. प्रतिनिधी, मुंबईमुंबई नगरीला धान्य व भाजीचा पुरवठा करण्यासाठी २० लाखांहून अधिक विक्रेते, कामगार मेहनत घेतात. आता पुन्हा लॉकडाउनची चर्चा सुरू झाल्याने...

proposal to allow corporate house to set up banks: कॉर्पोरेट्सचा बँकिंग प्रवेश – rajiv madhav joshi article on proposal to allow corporate houses to...

राजीव माधव जोशी आपली बँकिंग सिस्टीम सक्षम व्हावी म्हणून अलीकडेच सादर केलेल्या अहवालानुसार पतसंस्था व बिगर बँकिंग कंपन्यांना नवीन बँक स्थापन करण्याची मुभा...

Recent Comments