हायलाइट्स:
- कोल्हापुरातील शिवप्रेमी संघटना करणार भारत-इंग्लंड क्रिकेट सामन्यांना विरोध
- शिवरायांची जगदंबा तलवार इंग्लंडच्या राजघराण्यानं परत करण्याची मागणी
- ‘शिवदुर्ग संवर्धन आंदोलन’ संघटनेचा पुढाकार
कोल्हापूर: शककर्ते शिवछत्रपती महाराजांनी वापरलेली जगदंबा तलवार सध्या इंग्लंडच्या राणीच्या व्यक्तिगत संग्रहात आहे , ती तलवार परत द्यावी, या मागणीसाठी इंग्लंड आणि भारत क्रिकेट सामन्याला गनिमी काव्याने विरोध करणार असल्याची माहिती ‘शिवदुर्ग संवर्धन आंदोलन’च्या वतीने देण्यात आली.
वाचा: सांगलीत राष्ट्रवादीनं केला भाजपचा ‘कार्यक्रम’; महापालिकेची सत्ता केली काबीज
याबाबत अधिक माहिती देताना हर्षल सुर्वे म्हणाले, शिवाजी महाराजांची ही जगदंबा तलवार कोल्हापूर छत्रपतींच्या गादीवर छत्रपती महाराज चौथे असताना १९७५ मध्ये भारत भेटीवर आलेल्या तत्कालीन प्रिन्स ऑफ वेल्स यांना भेट म्हणून देण्यात आली. ही तलवार परत मिळावी म्हणून गेली अनेक वर्षे पाठपुरावा सुरू आहे . लोकमान्य टिळकांपासून ते यशवंतराव चव्हाण व माजी मुख्यमंत्री ए. आर . अंतुले यांनीही काही प्रमाणात पाठपुरावा केला. सहा वर्षांपूर्वी नरेंद्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही तलवार परत आणण्याची घोषणा केली. पण, अजूनही त्या दृष्टीने काहीही कार्यवाही झाली नाही. यामुळे हे आंदोलन करावे लागत आहे.
Live: पूजा चव्हाण प्रकरणावर संजय राठोड अखेर बोलले, म्हणाले…
या संदर्भात इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत म्हणाले, लंडनमध्ये भवानी तलवार असल्याचे बोलले जात होते. पण, प्रत्यक्षात ही तलवार सातारा छत्रपती घराण्यात असल्याचे कळविण्यात आले आहे. यामुळे इंग्लंडच्या रॉयल कलेक्शन ट्रस्टमध्ये सध्या जगदंबा तलवार आहे. ती तलवार भारतात आणणे आवश्यक आहे. आंदोलनाबाबत अधिक माहिती देताना सुर्वे म्हणाले, ‘आमचा क्रिकेटला किंवा सामन्यांना विरोध नाही. फक्त आमच्या भावना इंग्लंडच्या राणीपर्यंत पोहोचाव्यात म्हणून आम्ही क्रिकेट स्पर्धेला विरोध करत आहोत. महाराष्ट्रात पुढील महिन्यात पुण्यात सामने होणार आहेत. या सामन्याला गनिमी काव्याने विरोध केला जाईल.’
वाचा: रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मिळणार ‘ही’ खास सेवा