Home मनोरंजन jaisi ho waisi raho: सुशांत आणि अंकिताचं पवित्र रिश्ता मालिकेतील रोमॅण्टीक गाणं...

jaisi ho waisi raho: सुशांत आणि अंकिताचं पवित्र रिश्ता मालिकेतील रोमॅण्टीक गाणं व्हायरल – song jaisi ho waisi raho of sushant singh rajput ankita lokhande from pavitra rishta release


मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर पुन्हा एकदा अंकिता लोखंडे आणि त्या नात्याची चर्चा सुरू आहे. सुशांत आणि अंकिता यांचा ब्रेकअप हा चाहत्यांसाठी खूप मोठा धक्का होता. ते पुन्हा एकत्र येईल असं त्यांच्या चाहत्यांना नेहमीच वाटतं होतं. परंतु सुशांच्या अशा अकाली एक्झिटमुळं त्याहत्यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पवित्र रिश्ता मालिकेदरम्यान सुशातं आणि अंकिता एकमेकांच्या प्रेमात पडले. तब्बल सहा वर्ष एकत्र राहिल्यानंतर त्या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. आता त्या दोघांचे जूने फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

पवित्र रिश्ता या मालिकेदरम्यानचा एक अल्बम देखील आता प्रदर्शित करण्यात आला आहे. या गाण्याची सोशल मीडियावर चर्चा असून ‘जैसी हो वैसी रहो’असं या गाण्याचं नाव आहे. या गाण्यात मानव आणि अर्चना म्हणजेच सुशांत आणि अंकिता यांचा रोमॅण्टीक अंदाज पाहायला मिळक आहे. मालिका सुरू असताना हे गाणं चित्रित करण्यात आलं होतं. मात्र काही कारणांमुळं हे प्रदर्शित होऊ शकलं नव्हतं. त्यामुळं सुशांतच्या आणि पवित्र रिश्ताच्या प्रेक्षकांसाठी हे गाणं आता प्रदर्शित करण्यात आलं आहे.

‘पवित्र रिश्ता’
‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत सुशांत आणि अंकिता एकत्र काम करत होते. त्यानंतर सुशांतनं मालिका सोडली आणि तो बॉलिवूडमध्ये गेला. तिथं स्थिरावण्यासाठी त्यानं जोरदार प्रयत्न सुरू केले. या दरम्यानच दोघांनी प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर २०११मध्ये एका डान्सरिअॅलिटी शोमध्ये सुशांतनं अंकिताला मागणी घातली होती. तिनंही त्याला होकार दिला. आपण लवकरच लग्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. पण काही दिवसानंतर एका पार्टीमध्ये अंकितानं सुशांतला एक सणसणीत थोबाडीत दिल्याच्या बातम्यांनी मध्ये खळबळ उडवून दिली होती. पण त्यानंतर दोघांनीही या घटनेचा इन्कार केला होता‘आमच्यात असं काही झालेलंच नाही. आम्ही पूर्वीसारखेच एकमेकांच्या गाढ प्रेमात आहोत. आमच्याविषयी असं काहीतरी छापणाऱ्या लोकांची तर आम्हाला कीवच येते.’असं या दोघांचं म्हणणं होतं. पण काही दिवसांतच त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, सुशांत ज्या मनोचिकित्सक डॉक्टरांकडे उपचार घेत होता त्या केरसी चावडा यांनी त्याच्या आयुष्यातील काही गोष्टीचा खुलासा केलाय. सुशांतनं त्यांच्याशी सहा महिन्यापूर्वी संपर्क केला होता. तेव्हा एका वर्षापासून डिप्रेशनमध्ये असल्याचं सांगितलं होतं. अंकिता लोखंड सोबत ब्रेकअप झाल्यानंतर काही दिवस सर्व ठिक होतं. पण त्यानंतर आयुष्यात आणि त्याच्या नात्यांमध्ये स्थिरपणा आला नाही. व्यावसायीक ताण आणि नात्यांमधली अस्थिरतायांनी तो काहीसा खचला होता. असं ते म्हणाले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Mumbai High Alert Get Input Of Terrorist Attack – मुंबईत हायअलर्ट; दहशतवादी हल्ल्याची शक्यता

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी मुंबईत मोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता आहे. गुप्तचर विभागाकडून याबाबतची माहिती राज्य सरकारला पत्राद्वारे देण्यात आली आहे. गुप्तचर विभागाने माहिती...

Sambhaji Raje Slams Maha Vikas Aghadi Government Over Maratha Reservation – का खेळखंडोबा करता?; मराठा आरक्षणावरून संभाजीराजेंचा सरकारला सवाल

मुंबई: 'मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकार समन्वयानं काहीही करताना दिसत नाही. मी अनेकदा सरकारला सूचना केल्यात. अशोक चव्हाण यांच्याशी बोलणं झालं आहे. पण...

rain in Nashik: ऑक्टोबर महिना ठरतोय दमदार – nashik also received heavy rains in october month

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकजिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यातही परतीच्या पावसाचा जोर कायम असून, आतापर्यंत १४५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. बागलाण तालुक्यात २८१ तर...

Recent Comments