Home शहरं जळगाव Jalgaon murder: कौटुंबिक वादातून लहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या - jalgaon...

Jalgaon murder: कौटुंबिक वादातून लहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या – jalgaon murder man killed by brother over family dispute


म. टा. प्रतिनिधी, जळगाव: कौटुंबिक वादातून लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात लाकडी दांड्याने वार करत त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे घडली आहे. या प्रकरणी आज शुक्रवारी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जितेंद्र प्रकाश इंगळे-कोळी (वय ३०, रा. खडसेनगर म्हसावद, ता. जळगाव) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी जितेंद्रचा लहान भाऊ संदीप प्रकाश इंगळे-कोळी (वय २५), समीर मंजूर पठाण व सद्दाम कालू मनियार (तिघे रा. म्हसावद, ता. जळगाव) या तिघांना संशयित म्हणून अटक केली आहे. या घटनेसंदर्भात दशरथ धरमसिंग वाघेले (रा. खडसेनगर, म्हसावद, ता. जळगाव) यांनी फिर्याद दाखल केली आहे. काल (गुरुवारी) सायंकाळी जितेंद्र आणि संदीप यांच्यात कौटुंबिक वादातून भांडण झाले होते. जितेंद्रला दारूचे व्यसन असल्याने याच कारणावरून वाद झाल्याचे सांगितले जात आहे. भांडणात संदीप हा जितेंद्रला शिवीगाळ करत लाकडी दांड्याने बेदम मारहाण करत होता. हे भांडण सोडवण्यासाठी फिर्यादी दशरथ वाघेले गेले असता त्यांनाही संदीपने मारहाण केली होती. त्यात दशरथ यांच्या हाताच्या पंजाला तसेच डोक्याला दुखापत झाली होती. म्हणून ते तेथून निघून गेले होते. काही वेळाने जितेंद्रचा मामा दशरथ गंगाराम कोळी हे तेथे आले. त्यांनी मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या जितेंद्रला जखमी अवस्थेत रात्री नऊ ते साडेनऊच्या सुमारास डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय येथे नेले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.

धाब्यावरून पडल्याचा केला बनाव

या घटनेनंतर आपला मोठा जितेंद्र इंगळे हा घराच्या धाब्यावरून पडल्याने जबर जखमी झाला होता. त्यात त्याचा मृत्यू झाल्याचा बनाव संशयित आरोपी संदीप इंगळे याने केला. एवढंच नाही तर त्याने जितेंद्रचा मृतदेह ताब्यात घेऊन सकाळी ६ वाजताच्या सुमारास घरी आणला. त्यानंतर हा प्रकार उजेडात येऊ नये म्हणून ८ वाजता अंत्यसंस्काराची देखील तयारी केली. परंतु, गावातील कुणीतरी या प्रकाराची माहिती पोलिसांना दिल्याने हा प्रकार उघडकीस आला.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

it raid: anurag kashyap : अनुराग कश्यप, तापसी पन्नूसह इतरांनी कोट्यवधींची संपत्ती दडवली! – it raid on two production houses anurag kashyap and taapsee...

नवी दिल्लीः दिग्दर्शक अनुराग कश्यप ( anurag kashyap ), अभिनेत्री तापसी पन्नू ( taapsee pannu ) आणि इतर काही जणांच्या ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाने...

Recent Comments