Home महाराष्ट्र jameel shaikh murder: Jameel Shaikh Murder: मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येला गंभीर वळण; ठाण्यातील...

jameel shaikh murder: Jameel Shaikh Murder: मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येला गंभीर वळण; ठाण्यातील ‘तो’ नगरसेवक कोण? – jameel shaikh death complaint against thane corporator


महेश गायकवाड । ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राबोडी प्रभाग अध्यक्ष जमील शेख यांचे मारेकरी २४ तासानंतरही सापडलेले नसून मारेकऱ्यांना अटक करण्याचे पोलिसांचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, या हत्येमागे ठाण्यातील एका नगरसेवकाचे कारस्थान असल्याचा संशय शेख यांचा पुतण्या फैसल शेख याने व्यक्त केला आहे. याबाबत त्याने राबोडी पोलिस ठाण्यात केलेल्या तक्रारीमध्ये उल्लेखही केला आहे. त्या दृष्टीनेही पोलिसांकडून तपास होण्याची शक्यता आहे. ( Jameel Shaikh Murder Latest News Updates )

वाचा: मनसे पदाधिकाऱ्याची भररस्त्यात हत्या; ठाणे शहर हादरले

‘समाजसेवक तसेच मनसे पदाधिकारी असलेले जमील शेख यांना २०१४ मध्येही मारण्याचा प्रयत्न झाला होता. याबाबत राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल असून या गुन्ह्यात काकाने संबंधित नगरसेवकाला आरोपी करण्याविषयी तक्रारीमध्ये नमूद केले होते’, असेही फैसल याने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी म्हटले आहे. नगरसेवक करत असलेल्या अनधिकृत कामांची माहिती काका आरटीआयमार्फत प्राप्त करत होते. बेकायदेशीर कामात काकामुळे अडथळा निर्माण होत असल्याने काकाचा काटा काढण्याच्या हेतुने या नगरसेवकाने काकाच्या हत्येचे कारस्थान केल्याचा संशय फैसल याने व्यक्त केला आहे.

दरम्यान, शेख यांच्या मारेकऱ्यांचा २४ तासानंतरही शोध लागलेला नाही. पोलिसांची तीन पथके तसेच गुन्हे शाखाही मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. मारेकरी ३० ते ३५ वर्ष वयोगटातील होते व शेख यांच्यावर गोळी झाडणाऱ्या व्यक्तीने मास्क घातले होते, असे स्पष्ट झाले आहे.

वाचा: शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग यांना ईडीने घेतले ताब्यात

संशयाबाबत खातरजमा केली जाईल

जमील शेख यांच्या हत्येप्रकरणी तपास सुरू आहे. आरोपी अद्याप सापडलेले नाहीत. मात्र, शेख यांच्या नातेवाईकाने तक्रारीमध्ये ज्या नगरसेवकाबाबत संशय व्यक्त केला आहे. त्याबाबत योग्य ती खातरजमा केली जाईल. तसेच याबाबत काही पुरावा आहे का? हे पाहणे पोलिसांचे काम आहे, असे अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) संजय येनपुरे यांनी सांगितले.

खऱ्या सूत्रधारांना गजांआड करा

या हत्या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करावी. तसेच या प्रकरणी सखोल चौकशी करून खऱ्या सूत्रधारांना गजांआड करावे, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पोलिस आयुक्तांकडे केली आहे. याबाबत दरेकरांनी आयुक्तांशी दूरध्वनीवर संपर्क साधला.

नातेवाईकांची पोलिसांनी काढली समजूत

जोपर्यंत आरोपींना अटक होणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा जमील शेख यांच्या नातेवाइकांनी घेतला होता. मात्र याबाबत पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यास तयार झाल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.

वाचा: महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शक्यता?; आंबेडकरांचे पुन्हा मोठे विधानSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Tim Paine: IND vs AUS : भारताविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारावर आली ही वाईट वेळ, जगासमोर लाज गेली… – ind vs aus : australia captain...

नवी दिल्ली, IND vs AUS : भारताविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाच्या कर्णधार टीम पेनवर वाईट वेळ आली आहे. या एका गोष्टीमुळे संपूर्ण क्रिकेट विश्वासमोर पेनची...

Recent Comments