Home देश Jammu Kashmir News: काश्मीर: सीआरपीएफ गस्ती पथकावर मोठा दहशतवादी हल्ला, ३ जवानांसह...

Jammu Kashmir News: काश्मीर: सीआरपीएफ गस्ती पथकावर मोठा दहशतवादी हल्ला, ३ जवानांसह १ नागरिक जखमी – Encounter Broke Out Between Security Forces And Terrorists Three Soldiers And A Civilian Injured In Attack


श्रीनगर: जम्मू आणि काश्मीरमधील सोपोर येथे सुरक्षा दलाच्या गस्ती पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) ३ जवान जखमी झाले आहेत. तर या दहशतवादी हल्ल्यात सोपोरमधील एका नागरिकही जखमी झाला आहे.

सोपोरमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाचे पथक गस्तीसाठी आपल्या वाहनातून खाली उतररत असताना दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी अचानक सीआरपीएफच्या जवानांवर अंदाधुंद गोळीबार करणे सुरू केले. यात सीआरपीएफचे ३ जवान जखमी झाले.

जवानांनी परिसराला घेरले

आज बुधवारी सकाळी केंद्रीय राखीव पोलिस दलाचे पथक गस्तीसाठी निघाले होते. हे पथक रेबन येते आपल्या वाहनातून खाली उतरत होते. त्या वेळी अचानक हा हल्ला करण्यात आला. ही माहिती मिळताच सीआरपीएफची दुसरे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. लागलीच या भागाला घेराव घालण्यात आला असून या दहशतवाद्यांना हुडकून काढण्यासाठी शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे.

काल मंगळवारी अनंतनाग जिल्ह्यातील वाघमा भागात सुरक्षा दलांनी केलेल्या संयुक्त कारवाईत २ दहशतवादी ठार झाले होते. या भागात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या भागात शोधमोहीम हाती घेतली. या पूर्वी सोमवारी सुरक्षा दले आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत अनंतनागमधील खुलचोहर भागात ३ दहशतवाद्यांना ठार केले होते. त्यानंतर डोडा जिल्हा दहशतवाद मुक्त झाल्याचे घोषित करण्यात आले.

वाचा: अनंतनागमध्ये २ दहशतवादी ठार; २४ तासांत ५ दहशतवाद्यांचा खात्मा
३० दिवसांमध्ये १८ चकमकी आणि ५१ दहशतवादी ठार

गेल्या महिन्याभराच्या काळात जम्मू आणि काश्मीरमधील विविध भागांमध्ये सुरक्षादले आणि दहशतवाद्यांमध्ये १८ चकमकी झाल्या. यात एकूण ५१ दहशतवादी मारले गेले. १ जून या दिवशी नौशेरा भागात ३, २ जूनला पुलवाम्यातील त्राल भागात २, ३ जूनला पुलवाम्यातील कंगन भागात ३, ५ जूनला राजौरीच्या कालाकोट भागात १, ७ जूनला शोपियानच्या रेबन भागात ५, ८ जूनला शोपियानच्या पिंजोरा भागात ४, १० जूनला शोपियानच्या सुगू भागात ५, १३ जूनला कुलगामच्या निपोरा भागात २, १६ जूनला शोपियानच्या तुर्कवंगम भागात ३, १८ आणि १९ जूनला अवंतीपोरा आणि शोपियानमध्ये ८, २१ जूनला शोपियान येथे ३, २३ जूनला पुलवाम्याच्या बंदजू येथे २, २५ जूनला बारामुल्लाच्या सोपोर येथे २, २५ आणि २६ जूनला पुलवाम्याच्या त्राल येथे ३, २९ जूनला अनंतनागच्या खुलचोहर येथे ३ आणि आज ३० जूनला अनंतनागच्या वाघमा येथे २ दहशतवादी ठार झाले. या प्रमाणे एकूण महिन्याभराच्या काळात एकूण ५१ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

वाचा: ‘त्राल’नंतर ‘डोडा’ जिल्ह्याचीही दहशतवाद्यांच्या तावडीतून सुटका!

वाचा: काश्मीर: सोपोरमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार; इंटरनेट सेवा बंदSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

farmers protest: tractor rally : दिल्लीत हिंसक आंदोलन; केंद्राकडून गंभीर दखल, सिंघू सीमेवरून शेतकरी नेते ‘गायब’ – tractor rally violence in farmers protest signs...

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनी कृषी कायद्यांविरोधात ( farmers protest ) शेतकरी ट्रॅक्टर परेडमध्ये ( tractor rally ) मंगळवारी हिंसाचार झाला. शेतकरी आंदोलनकर्त्यांनी बॅरिकेड...

R. Ashwin: टीम इंडियामध्ये लागलं मोठं चॅलेंज, पुजाराने ‘ही’ गोष्ट केल्यावर अश्विन अर्धी मिशी ठेवणार – ind vs eng : indian cricketer r. ashwin...

नवी दिल्ली, IND vs ENG : भारतीय संघामध्ये सध्याच्या घडीला एक मोठं चॅलेंज लागलेलं आहे. हे चॅलेंज भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने भरवश्याचा फलंदाज...

Recent Comments