Home शहरं अमरावती janta curfew: अमरावतीत येत्या शनिवारी- रविवारी जनता कर्फ्यू - janta curfew announces...

janta curfew: अमरावतीत येत्या शनिवारी- रविवारी जनता कर्फ्यू – janta curfew announces on 9 to 10 may in amravati


अमरावती: करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून येत्या शनिवारी आणि रविवारी (ता. ९ आणि १० मे) ‘जनता कर्फ्यू’ पाळण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

हा जनता कर्फ्यू शनिवारी दुपारी १२ वाजल्यापासून रविवारी रात्री १२ पर्यंत असेल. या काळात रूग्णालये व मेडिकलची दुकाने सुरू राहतील. इतर सर्व सेवा बंद राहतील. शहरात करोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. सोमवारी दुपारपर्यंत करोनाबाधित रुग्णांचा आकडा हा ६० वर पोहोचला असून, खबरदारीचा उपाय म्हणून येणाऱ्या शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यूचे नियोजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. करोना प्रतिबंधासाठी व सर्वांच्या सुरक्षिततेसाठी कर्फ्यूचे नियोजन केले आहे. त्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यानंतर राज्य सरकारनं काही क्षेत्र वगळता इतर ठिकाणी विविध सवलती लागू केल्या आहेत. मात्र, अमरावती जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या पाहता येथे अद्यापपर्यंत मद्यविक्री दुकानांना परवानगी देण्यात आली नाही. त्यासाठी आधी सर्व संबंधित दुकानदारांची बैठक घेऊन त्यांना राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांचे निर्देश, नियम आणि अटी शर्ती याबाबत अवगत करून देण्यात येईल. त्यानंतर परवानगीचा विचार करण्यात येईल. अशा दुकानात काम करणाऱ्या व्यक्तींकरिता फिटनेस प्रमाणपत्र देणे आवश्यक राहील. यासोबतच सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग पालन व इतर आवश्यक नियम पालन करणे बंधनकारक असून त्यानंतरच परवानगी दिली जाईल.

कंटेन्मेंट झोनमध्ये तेथील ये-जा करण्यासाठी काही अत्यावश्यक सेवांना पास दिले आहेत. परिसरात मर्यादित वावर असावा व जीवनावश्यक वस्तूही मिळाव्यात, असा त्याचा हेतू आहे. याशिवाय, रमजान महिना लक्षात घेता मुस्लीम बांधवांसाठी फळं घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात येत आहे, असंही ते म्हणाले. दरम्यान, करोनाचा यशस्वीपणे मुकाबला करण्यासाठी सर्वांनी घरात सुरक्षित राहावे व नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

पुण्यात वारजे पुलाखाली कामगारांची गर्दी; पोलिसांचा लाठीमार

पुण्यात करोनामुळे पोलिसासह पाच जणांचा मृत्यू

रेड, ऑरेंज, ग्रीन; राज्यात कोणत्या विभागात कशाला परवानगी?Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Mumbai power outage: Nitin Raut: मुंबईतील ‘पॉवर कट’मध्ये चीनचा हात; आज कळणार नेमकं काय घडलं? – mumbai power outage was a likely chinese cyber...

हायलाइट्स:मुंबईतील 'पॉवर कट' हा चीनचा सायबर हल्लाअमेरिकेतील प्रसिद्ध दैनिकाचा एका अहवालाच्या आधारे दावामागील वर्षी १२ ऑक्टोबर रोजी झाला होता मुंबईतील वीज पुरवठा खंडितमुंबई:...

bomb blast viral video: Video दुसऱ्या महायुद्धातील बॉम्बचा ८१ वर्षांनी स्फोट; परिसर हादरला – stunning drone footage shows 907 kg german world war 2...

हायलाइट्स:ब्रिटनमध्ये दुसऱ्या महायुद्धादरम्यानच्या बॉम्बला स्फोटाद्वारे केले निकामी १० किलोमीटरपर्यंत ऐकू आले स्फोटाचे आवाजअनेक घरांच्या खिडक्या तुटल्या, भितींना तडे गेले लंडन: दुसऱ्या महायुद्धातील महाविनाशक...

aaditya thackeray: वरळीतील पब, बारवरुन राजकारण रंगलं; आदित्य ठाकरे म्हणतात… – aaditya thackeray reaction on nightlife in worli

हायलाइट्स:विरोधकांच्या निशाण्यावर आदित्य ठाकरेवरळीतील पब, बारमधील गर्दीचे व्हिडिओ व्हायरलआदित्य ठाकरेंनी दिली पहिली प्रतिक्रियामुंबईः राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदरासंघ असलेल्या वरळीत नाइट क्लबमध्ये...

Recent Comments