Home क्रीडा jasprit bumrah injury: जसप्रीत बुमराह खेळणार की नाही? या तारखेला होणार निर्णय...

jasprit bumrah injury: जसप्रीत बुमराह खेळणार की नाही? या तारखेला होणार निर्णय – australia Vs India 4th Test At Gabba Jasprit Bumrah Near 50 Percent Fitness Injury Update | Maharashtra Times


सिडनी : australia vs india 4th test भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकतील चौथा आणि अखेरचा सामना १५ जानेवारीपासून ब्रिसबन येथे होणार आहे. दोन्ही संघांसाठी ही लढत महत्त्वाची आहे. कारण मालिका सध्या १-१ अशा बरोबरीत आहे.

वाचा- तेव्हा विराटनेच मिळवून दिली होती इज्जत; स्मिथ आणि ऑस्ट्रेलियाच्या संघाला पडला

चौथ्या कसोटी सामन्याआधी भारतीय संघाला एक मोठा झटका बसला आहे. भारताचा मुख्य जलद गोलंदाज जसप्रीत बुमराहला दुखापत झाली असून तो चौथी कसोटी खेळेल की नाही याबद्दल शंका आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारत मायदेशात इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. त्याचा विचार करून भारतीय संघ व्यवस्थापन बुमराहबाबत कोणताही धोका पत्करू शकत नाही.

वाचा- ‘अश्विन समोर ऑस्ट्रेलिया हताश; टीम पेन तू मुर्ख वाटत होतास’

सिडनी कसोटीच्या चौथ्या दिवशी बुमराहच्या पोटात दुखत होते. त्यामुळे तो काही काळ मैदानाबाहेर होता. बुमराहच्या प्रकृतीसंदर्भात अद्याप बीसीसीआयने अधिकृत कोणतीही माहिती दिली नाही. पण मंगळवारी आलेल्या मीडिया रिपोर्टनुसार बुमराह चौथ्या कसोटीत खेळू शकणार नाही.

वाचा- स्टीव्ह स्मिथला बसणार मोठा झटका, कर्णधारपदासोबत संघातून मिळू शकतो डच्चू

बुमराह अद्याप १००टक्के फिट नाही. त्यामुळेच चौथ्या कसोटीत खेळणार की नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. कसोटीसाठी अद्याप ३ दिवसांचा वेळ शिल्लक आहे. तो ५० टक्के फिट आहे. येणाऱ्या ३ दिवसात त्याच्या फिटनेसमध्ये किती सुधारणा होते त्यावर संघ व्यवस्थापन निर्णय घेणार असल्याचे वृत्त द टेलिग्रामने दिले आहे.

भारत पुढील महिन्यापासून इंग्लंडविरुद्ध चार कसोटी, ५ टी-२० आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. याच कारणामुळे बुमराहबाबत भारत कोणताही थोका पत्करण्यास तयार नाही.

वाचा- भारतीय खेळाडूने २ हजार ८०४ दिवसांनी घेतली पहिली विकेट, पाहा व्हिडिओ

बुमराह जर चौथी कसोटी खेळू शकला नाही तर मोहम्मद सिराजच्या नेतृत्वाखाली भारतीय जलद गोलंदाजी मैदानात उतरतील. सिराजकडे फक्त २ कसोटी सामन्यांचा अनुभव आहे. या शिवाय संघात नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर आणि टी नटराजन हे जलद गोलंदाज आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments