Home ताज्या बातम्या Jioचा धमाका: लाँच केलं ‘JioMeet’ Conferencing App, सहभागी होऊ शकतात 100 जण...

Jioचा धमाका: लाँच केलं ‘JioMeet’ Conferencing App, सहभागी होऊ शकतात 100 जण | News


JioMeet’ वापरायला अत्यंत सोपं असून Google Play Store वरून ते डाउनलोड करता येणार आहे. याची सर्व सेवा नि:शुल्क आहे.

मुंबई 2 जुलै: देशातलं पहिल्या क्रमांकांचं डिजिटल प्लॅटफॉर्म असलेल्या Jioने आणखी एक नवं पाऊल टाकलं आहे. सगळ्या देशाला प्रतिक्षा असलेलं HD video conferencing app ‘JioMeet’ लाँच केलं आहे. कोरोना आणि लॉकडाउमुळे सध्या घरूनच काम करण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंगमुळे एकमेकांना भेटणंही जवळपास बंदच झालं आहे. त्यामुळे कार्यालयीन आणि इतर कामासांठी एका दर्जेदार Appची गरज होती. ती गरज आता पूर्ण होणार आहे.

JioMeet’ वापरायला अत्यंत सोपं असून Google Play Store वरून ते डाउनलोड करता येणार आहे. याची सर्व सेवा नि:शुल्क आहे. यात तब्बल 100 जणांना सहभागी होता येणार आहे. Google Chrome आणि Mozilla Firefoxवरून ते वापरता येणार आहे. स्क्रिन शेअर करणं, मिटिंग शेड्युल करणं अशा अनेक गोष्टी सहज करता येणार आहेत. वापरण्यास अतिशय सोपं असलेलं हे App सगळ्यांनाच वापरता येऊ शकतं.

आयटी आणि इतर कंपन्यांमधले कर्मचारी सध्या घरूनच काम करत आहेत. त्यामुळे एकमेकांशी संपर्कात राहण्यासाठी अशा माध्यमांचा उपयोग केला जातो. त्या सगळ्यांसाठी आता JioMeet ने  एक अतिशय दर्जेदार पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

कंपनीने व्हिडिओ कॉलिंग सेवा सुरू करणार असल्याची घोषणा 30 एप्रिलला केली होती. त्यानंतर मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत हे App तब्बल 100,000 जणांनी डाउनलोड केलं होतं.

Jioचं नेटवर्क देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत असल्याने त्याचा वापर ग्रामीण भागातही करता येणं सहज शक्य होणार आहे.

संपादन – अजय कौटिकवार

 

First Published: Jul 2, 2020 11:02 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments