Home देश पैसा पैसा jio platforms investments: गुंतवणूकदारांची लागली रांग; जिओमध्ये येणार आखाती पैसा! - now...

jio platforms investments: गुंतवणूकदारांची लागली रांग; जिओमध्ये येणार आखाती पैसा! – now 3 middle east companies may invest in jio platforms after 5 big investments


नवी दिल्ली: रिलायन्स इडस्ट्रिज लिमिटेडच्या जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये एका पाठोपाठ एक कंपन्या गुंतवणूक करत आहेत. आतापर्यंत जिओमध्ये पाच कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. यामुळे रिलायन्सची मोठी कामाई झाली असून कंपनीला कर्जमुक्त करण्याचे त्याचे लक्ष्य लवकर पूर्ण होईल असे दिसते. जिओमध्ये आखाती देशातील तीन मोठ्या कंपन्या गुंतवणूक करणार आहेत.

वाचा- ७४ कर्मचारी झाले करोडपती; CEOचे पॅकेज ३९ टक्क्यांनी वाढले!

करोना व्हायरसच्या काळात एका बाजूला सर्व कंपन्याना तोटा होत आहे आणि त्यामुळे पगार, कर्मचारी कपात असे निर्णय घ्यावे लागत आहेत. अशात रिलायन्सच्या जिओमध्ये मात्र गुंतवणुकदारांची रांग लागली आहे. फेसबुकसह ५ विदेशी कंपन्यांनी जिओमध्ये पैसा गुंतवला असून आता यात आणखी ३ कंपन्यांची भर पडू शकते. याचा अर्थ अंबानींच्या खिशात आणखी पैसे येतील.

वाचा- जाणून घ्या रिलायन्सवर किती कर्ज आहे?

आखाती देशातील ज्या ३ कंपन्या जिओमध्ये गुंतवणूक करण्यात उत्सुक आहेत. त्यात मुबाडाला इन्व्हेस्टमेंट जिओमध्ये १०० कोटी डॉलर म्हणजे ७ हजार ५०० कोटी रुपये इतकी गुंतवणूक करू शकते. त्यानंतर क्रमांक येतो अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटीचा आणि सैदी अरबच्या द पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंडचा या दोन्ही कंपन्या जिओत मोठी गुंतवणूक करू शकतात.

वाचा- EMI पुढे ढकलताय, फायद्या ऐवजी होऊ शकते नुकसान; जाणून घ्या ३ पर्याय!

जिओतील गुंतवणुकीची सुरुवात झाली होती फेसबुकपासून, त्यांनी जिओतील ९.९ टक्के भाग ४३ हजार ५३४ कोटी रुपयांना विकत घेतला. त्यानंतर सिल्वर लेक कंपनीने ५ हजार ६५५ कोटींना १.५५ टक्के, व्हिस्टा इक्विटी पार्टनर्सने ११ हजार ३६७ कोटी, जनरल अटलांटिकने १.३४ टक्के ५ हजार ५९८.३८ कोटींना विकत घेतले. अखेरीस केकेआरने ११ हजार ३६७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली.

या पाच कंपन्यांनी गुंतवणूक केल्यानंतर जिओची इक्विटी व्हॅल्यू ४.९१ लाख कोटी इतकी झाली आहे. आखाती देशातील कंपन्यांसह मायक्रोसॉफ्ट देखील जिओत गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचे समजते. या दोन्ही कंपन्यांमधील कराराची चर्चा सुरू असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

madhurta deshmukh: घरबसल्या गोष्टी ऐका आजी-आजोबांकडून – storyteller madhurata deshmukh is present stories for children under spin a yarn india using youtube and facebook

हर्षल मळेकर, मुंबईआजी-आजोबांच्या कुशीत शिरुन कोल्होबा, कावळा, सिंह-उंदिर यांच्या तसेच राम-कृष्णाच्या, बिरबलाच्या गोष्टी ऐकत झोपी जायचे हे भाग्य विभक्त कुटुंब पद्धतीमुळे हल्ली फार...

Nitin Bhalerao Martyr: छत्तीसगडमधील नक्षली हल्ल्यात नाशिकचे जवान नितीन भालेराव यांना वीरमरण – assistant commandant of crpf nitin bhalerao martyred, 9 injured in naxal...

नाशिक: छत्तीसगडमध्ये सुकमा येथे नक्षलवाद्यांनी घडवून आलेल्या स्फोटात सीआरपीएफचे जवान नितीन भालेराव शहीद झाले आहेत. या स्फोटात एका अधिकाऱ्यासह ९ जवान जखमी झाले...

Recent Comments