Home शहरं ठाणे Jitendra Awhad: 'दहशतवाद्यांचा अड्डा' असा आरोप झालेले जेएनयू हेच का?; आव्हाडांचा खोचक...

Jitendra Awhad: ‘दहशतवाद्यांचा अड्डा’ असा आरोप झालेले जेएनयू हेच का?; आव्हाडांचा खोचक सवाल – NIRF Ranking : Is This The Same Jnu, Asks State Housing Minister Jitendra Awhad


ठाणे: केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्यानं जाहीर केलेल्या राष्ट्रीय शिक्षण संस्थांच्या क्रमवारीत (एनआयआरएफ) दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) पहिल्या तीन संस्थांमध्ये आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याच मुद्द्यावरून भाजपला सणसणीत टोला हाणला आहे. (Jitendra Awhad taunts BJP over JNU)

Live: राज्यातील करोना रुग्णांचा आकडा लाखाच्या उंबरठ्यावर

आव्हाड यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. ‘दहशतवाद्याची निर्मिती करणाऱ्यांचा आणि कट्टरतावाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांचा अड्डा म्हणून भक्त मंडळींनी हिणवलेले जेएनयू हेच आहे का,’ असा उपरोधिक सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. नोबेलविजेते अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी ही देखील जेएनयूचीच देणगी आहे हे लक्षात घेतलं पाहिजे, असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

‘एनआयआरफ’च्या क्रमवारीत बेंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सनं (IISc) पहिला क्रमांक पटकावला आहे. जेएनयू दुसऱ्या क्रमांकावर असून बनारस हिंदू युनिव्हर्सिटी तिसऱ्या स्थानी आहे. महाराष्ट्रातील १८ हून अधिक संस्था सर्वसाधारण यादीत पहिल्या शंभरामध्ये आल्या आहेत. राज्यातील अग्रगण्य शिक्षण संस्था असलेल्या मुंबई विद्यापीठाची कामगिरी सुधारली आहे. मागील वर्षी ८१ व्या स्थानावर असलेले मुंबई विद्यापीठ यंदा ६५ व्या स्थानी आले आहे. राज्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अव्वल आले असून, सर्वसाधारण क्रमवारीत विद्यापीठाने १९वे स्थान मिळवले आहे. तर पारंपरिक विद्यापीठांच्या यादीत हे विद्यापीठ नवव्या स्थानावर आहे.

विद्यापीठ परीक्षा: भाजपच्या ‘या’ भूमिकेमुळं ठाकरे सरकारची कसोटी

जेएनयू वाद काय आहे?

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात देशातील अनेक विद्यापीठं वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आली होती. त्यात जेएनयू सर्वात आघाडीवर होते. जेएनयूमध्ये डाव्या विचारांच्या विद्यार्थ्यांचं वर्चस्व आहे. त्यामुळंच भाजपचं सरकार आल्यापासून येथील विद्यार्थी संघटनांमध्ये नेहमीच संघर्ष होत राहिला. संसदेवर हल्ला करणाऱ्या अफझल गुरूच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या गेल्याच्या आरोपांमुळं हे विद्यापीठ अधिकच चर्चेत आलं होतं. भाजपच्या अनेक नेत्यांकडून जेएनयूला लक्ष केलं गेलं होतं. काही जणांवर देशद्रोहाचे खटलेही भरले गेले होते. तो वाद आता शमला असला तरी विद्यार्थी निवडणुकांच्या निमित्तानं अधूनमधून विद्यापीठाची चर्चा होत असते.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

aurangabad News : बारामती अॅग्रोच्या गळीत हंगामास सुरुवात – baramati agro’s crushing season begins

म. टा. प्रतिनिधी, कन्नडबारामती अॅग्रो युनिट दोनच्या आठव्या ऊस गळीत हंगामाच्या गाळपास मंगळवारी सुरुवात झाली. कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिक...

valmikis adopted buddhism: हाथरस: वाल्मिकी समाजाच्या ५० कुटुंबांनी घेतली बौद्ध धर्माची दीक्षा – after hurt by hathras incidence fifty families of valmiki community adopted...

गाझियाबाद:हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी (Hathras gang rape case) उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) राजकारण तापले आहे. या पार्श्वभूमीवर वाल्मिकी समाजातील लोक या...

Pravin Darekar Reaction On Eknath Khadse Resignation – ‘एक गोष्ट मनासारखी झाली नाही म्हणून नाराज होणे योग्य नाही’

सांगलीः 'कोणताच राजकीय पक्ष शंभर टक्के तुमचे समाधान करु शकत नाही. आठ गोष्टी तुमच्या मनासारख्या झाल्या आणि एक झाली नाही म्हणून नाराज होणे...

Recent Comments