Home शहरं मुंबई Jitendra Awhad and Sharad Ponkshe: विकृत शरद पोंक्षे राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर येणे क्लेशकारक;...

Jitendra Awhad and Sharad Ponkshe: विकृत शरद पोंक्षे राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर येणे क्लेशकारक; आव्हाडांची टीका – NCP Leader Jitendra Awhad Slams Actor Sharad Ponkshe


मुंबई: राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अभिनेते शरद पोंक्षे यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत टीका केली आहे. विकृत शरद पोंक्षे राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर येणे हे क्लेशकार होते, अशा शब्दांत आव्हाड यांनी पोंक्षे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहेत.

करोनामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या बॅकस्टेज कलाकारांना राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने ३० लाखांहून अधिक रकमेची आर्थिक मदत करण्यात आली. याबद्दल आभार मानण्यासाठी नाट्य परिषदेचे पदाधिकारी शरद पोंक्षे हे मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्यासोबत राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात आले होते. त्यापार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी पोंक्षे यांच्यावर सडकून टीका केली आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या व्यासपीठावर विकृत शरद पोंक्षे येणे हे क्लेशकारक आणि दुर्देवी होते, अशी टीका करतानाच पण पुरोगामी कार्यकर्त्यांचा आक्रोश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कानी पडताच त्यांनी पक्षाची भूमिका अत्यंत तत्परतेने स्पष्ट केली, असं आव्हाड म्हणाले. आव्हाड यांनी पोंक्षे यांच्यावर अत्यंत जहरी टीका केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राष्ट्रवादीने रंगभूमीवर बॅकस्टेजला काम करणाऱ्या जवळपास दीड हजार कामगारांपैकी १२५० कामगारांच्या बँक खात्यात प्रत्येकी अडीच हजार रुपये जमा केले आहेत. ६० हजार आशा वर्कर्सना फेशशिल्ड वाटप करण्यात आली आहे. याशिवाय चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या रायगड जिल्हयात ५० लाख किंमतीचे ५ हजार घरांचे लोखंडी पत्रे व दीड हजार ढापे देण्यात आले आहेत. काल झालेल्या या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ही माहिती दिली. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनिल तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, खासदार डॉ. अमोल कोल्हे, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, माजी आमदार लक्ष्मण माने, अभिनेते शरद पोंक्षे, ट्रस्टचे विश्वस्त व माजी आमदार हेमंत टकले, मार्डचे अध्यक्ष दिपक मुंडे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. संतोष कदम आदी उपस्थित होते. शरद पोंक्षे यांनीही राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर येऊन आभार मानल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. पोंक्षे यांच्या झालेल्या एन्ट्रीमुळे राष्ट्रवादीतील एक गट दुखावला होता. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज ट्विट करून खुलासा केला.

शरद पोंक्षेंना आमचे आभार मानावे लागणे हा गांधीवादी विचारांचा विजय

राष्ट्रवादीने बॅकस्टेज कलाकारांना आर्थिक मदत केली, त्याबद्दल आभार मानण्यासाठी पोंक्षे हे कांबळी यांच्याबरोबर राष्ट्रवादीच्या कार्यालयात आले होते. यापलीकडे पोंक्षे यांचा आणि पक्षाचा कोणताही संबंध नाही व कधीच नसेल, असा खुलासाही पाटील यांनी केला होता.

रेल्वे डब्यांत ‘करोना आयसीयू’विषयी काय केले?

lalbaug masala market: ग्राहकांना ठसका! लालबागचं मसाला मार्केट पाच दिवस बंदSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

virat kohli: IND vs ENG : सामन्यानंतर विराट कोहलीने सांगितली कोणाकडून झाली मोठी चुक… – ind vs eng : after winning 3rd test match...

अहमदाबाद, IND vs ENG : तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने १० विकेट्स राखून विजय मिळवला. पण या सामन्यानंतर या लढतीत कोणाकडून मोठी चुक झाली,...

corona latest updates: coronavirus in maharashtra updates: आजही नव्या करोनारुग्णांच्या संख्येत ८ हजारांहून अधिक वाढ – coronavirus latest updates maharashtra registers 8702 new covid...

हायलाइट्स:आज दिवसभरात तब्बल ८ हजार ७०२ इतक्या नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या ८ हजार ८०७ इतकी होती. तर, आज ३...

Recent Comments