Home शहरं मुंबई Jitendra Awhad and Smriti Irani: jitendra awhad : तुम्हाला नक्कीच स्मृतीभ्रंश झालेला...

Jitendra Awhad and Smriti Irani: jitendra awhad : तुम्हाला नक्कीच स्मृतीभ्रंश झालेला नसावा; आव्हाड आता स्मृती ईराणींवर बरसले – NCP Leader Jitendra Awhad Slams Smriti Irani Over Fuel Hikes


मुंबई: इंधन दरवाढीवरून आधी अभिनेता अक्षय कुमार नंतर महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर टीका केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आता भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्यावर सडकून टीका केली आहे. तुम्ही काही वर्षांपूर्वी इंधन दरवाढीवरून अनेक ट्विट केले आहेत. आता तुमच्याच सरकारने ऐतिहासिक इंधन दरवाढ केली आहे. मला वाटतं हे तुम्हाला आठवत असेलच. तुम्हाला नक्कीच स्मृतीभ्रंश झाला नसावा, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी ईराणी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. (Jitendra Awhad Slams Smriti Irani )

संपूर्ण देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्व सामान्यांचं गणित बिघडलं आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सत्ताकाळात इंधन दरवाढीवरून ट्विटद्वारे टीका करणाऱ्यांना घेरण्यास आव्हाड यांनी सुरुवात केली आहे. या आधी त्यांनी इंधन दरवाढीवरून अक्षय कुमारला घेरले होते. त्यानंतर आज अमिताभ बच्चन यांना त्यांनी खोचक सवाल केला होता. अमिताभ यांच्यावर टीका करून काही तास होत नाही तोच त्यांनी भाजप नेत्या स्मृती ईराणी यांचे जुने ट्विट रिट्विट करून त्यांना घेरले आहे.

तुम्हाला नक्कीच स्मृतीभ्रंश झाला नसावा याची मला खात्री असून तुम्हाला काही वर्षांपूर्वी तुम्हीच केलेले ट्विटस नक्कीच आठवत असतील. आता केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने इंधनाचे दर प्रचंड वाढवले आहेत. देशात ऐतिहासिक इंधन दरवाढ झाली आहे. त्याबद्दल तुमचं अभिनंदन. पण या ऐतिहासिक इंधन दरवाढीवर आता तुम्ही काय ट्विट कराल? असा खोचक सवाल आव्हाड यांनी केला आहे.

यावेळी त्यांनी स्मृती ईराणी यांनी ३ नोव्हेंबर २०११ रोजी केलेलं ट्विटही शेअर केलं आहे. त्यात त्यांनी देशात पुन्हा इंधन दरवाढ झाली असून हे आम आदमीचं संपुआ सरकार फक्त तेल कंपन्यांसाठीच काम करत असल्याचा आरोप ईराणी यांनी या ट्विटमध्ये केला होता.

तू पेपर वाचत नाहीस का; अक्षय कुमारला आव्हाडांनी खिंडीत गाठले

दरम्यान, आज सकाळी जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून थेट अमिताभ बच्चन यांनाच घेरले होते. तुम्ही पेट्रोल पंपावर कारमध्ये इंधन भरत नाहीत का? तुमच्या हातात येणारं इंधनाचं बिलही तुम्ही पाहत नाही का? आता तुम्ही बोललंच पाहिजे. हीच ती वेळ आहे. ती निश्चितच पक्षपाती नसाल, असा चिमटाही आव्हाड यांनी बच्चन यांना काढला आहे. डिझेल आणि पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. अब मुंबईकर क्या करे कार जलाये या कार चलाये? असा अमिताभ यांच्याच स्टाइलमध्ये खोचक सवालही त्यांनी केला होता.

डोक्यावरील छताची चिंता करू नका; पोलिसांच्या कुटुंबीयांसाठी सरकारचा मोठा निर्णय

आता तुम्ही कारमध्ये पेट्रोल भरत नाही का?; बिग बी मौन सोडा: आव्हाडSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

LIVE : गडचिरोलीतील 350 ग्रामपंचायतीसाठी आज मतमोजणी | Maharashtra

सर्वसामान्य मुंबईकरांसाठी खुशखबर सर्वांसाठी लोकल प्रवासाची लवकरच मुभा? 'न्यूज18 लोकमत'ची एक्सक्लुझिव्ह माहिती लोकलसंदर्भात आज महत्वपूर्ण बैठक Source link

salon in western railway stations: रेल्वे स्थानकांमध्ये आता सलूनही – western railway has decided to start air-conditioned salon on mumbai central station with six...

म. टा. प्रतिनिधी, मुंबईघड्याळ्याच्या काट्याप्रमाणे धावणाऱ्या मुंबईकरांचा थकवा दूर करण्यासाठी रेल्वे स्थानकांतच काही आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मुंबई सेंट्रलसह सहा...

Recent Comments