Home शहरं ठाणे Jitendra awhad questions PM Modi: Jitendra Awhad: ...मग २० सैनिकांच्या बलिदानाची जबाबदारी...

Jitendra awhad questions PM Modi: Jitendra Awhad: …मग २० सैनिकांच्या बलिदानाची जबाबदारी कोणाची; विरोधकांचा सवाल – then who is responsible for the sacrifice of 20 soldiers, asks ncp leader jitendra awhad


ठाणे: भारत-चीन सीमेवरील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतरही आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. ‘भारताच्या सीमेत कोणीही घुसखोरी केलेली नाही, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केला होता. त्यावरून आता विरोधकांनी सरकारला घेरलं आहे. ‘सीमेच्या आत कुणी आलंच नसेल तर २० सैनिकांच्या हौतात्म्याची जबाबदारी कोणाची,’ असा सवाल राज्याचे गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला केला आहे. (India-China Face Off)

वाचा: नेहरूंना दोष देणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; शिवसेनेचा हल्लाबोल

भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यात काही दिवसांपूर्वी दोन्ही देशांतील सैनिकांमध्ये संघर्ष झाला होता. यात भारताचे २० जवान शहीद झाले. चीनचे किती नुकसान झाले याबाबत कुठलीही ठोस माहिती नाही. चिनी सैनिकांच्या मृत्यूबाबत त्या देशानं अद्याप कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. चीनचा एकही सैनिक मारला गेला नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळं भारतभर चीन विरोधात प्रचंड रोष आहे. विरोधी पक्षांनी याच मुद्द्यावरून सरकारला घेरलं आहे.

पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी बोलावलेल्या बैठकीत सर्व पक्षांच्या नेत्यांना आश्वस्त केले होते. ‘आपल्या हद्दीत कुणीही घुसलेलं नाही. भारताची एकही सैनिकी पोस्ट कुणी ताब्यात घेतलेली नाही. शत्रूला धडा शिकवून आपले वीर जवान शहीद झाले आहेत,’ असं मोदी यांनी म्हटलं होतं. मात्र, त्यांच्या याच वक्तव्यावरून आता विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजपवर टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या आव्हाड यांनी पुन्हा एकदा ट्विट केलं आहे. ‘जर कुणी सीमेत घुसलं नाही, कुठल्या पोस्टवर ताबा घेतला नाही मग २० सैनिकांच्या बलिदानाची जबाबदारी कोणाची,’ असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

ट्विट

वाचा: ‘सैनिकांच्या हातात काठ्या? देशाची सीमा म्हणजे RSS ची शाखा आहे का?’

maharashtra times

काँग्रेसनेही मोदींच्या या खुलाशावर टीका केली आहे. ‘आमच्या हद्दीत कुणीच घुसलेलं नाही हे पंतप्रधानांचं वक्तव्य चीनला नक्कीच फायद्याचं ठरेल,’ अशी भीती काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यक्त केली आहे.
सोनियांनी धरलं सरकारला धारेवर

सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्तीच केली. ‘देशाला अंधारात ठेवलं जातंय. सरकारला प्रत्यक्ष ताबा रेषेवरील (LAC) फोटो उपग्रहाद्वारे मिळत नाहीत का? बाहेरील गुप्तरच यंत्रणांनी LACवरील हालचालींबाबत कुठलीही माहिती दिली नाही का? लष्कराच्या गुप्तचर विभागाने काहीच माहिती कशी दिली नाही? गुप्तचर विभागाचे हे अपयश आहे का?, असे प्रश्न सोनियांनी उपस्थित केले आहेत.

maharashtra timesSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

chandrakant patil: खडसेंबद्दल विचारताच चंद्रकांत पाटील म्हणाले… रात गयी, बात गयी! – bjp leader chandrakant patil on eknath khadse

पुणे: भाजपला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज बोलणं टाळलं. 'रात गयी,...

coronavirus vaccine news: Coronavirus vaccine करोना: ऑक्सफर्डची लस चाचणी अमेरिकेत पुन्हा सुरू होणार – coronavirus vaccine news astrazeneca oxford covid-19 vaccine trial resume in...

वॉशिंग्टन: अमेरिकेत पुन्हा एकदा ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाची लस चाचणी सुरू होणार आहे. अमेरिकेत लस चाचणी सुरू करण्याबाबत नियामक मंडळाने हिरवा झेंडा दाखवला आहे. ब्रिटनमध्ये तिसऱ्या...

leopard spotted in malegaon: कळवाडी परिसरात पुन्हा बिबट्या; दोन दिवसांत २० जनावरांचा फडशा – leopards again spotted in kalwadi area malegaon

म. टा. वृत्तसेवा, मालेगावतालुक्यातील कळवाडी परिसरात जनावरांना पुन्हा एकदा बिबट्याने लक्ष्य केले आहे. गेल्या दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या तब्बल २० जनावरांचा बिबट्याने फडशा पाडला....

Recent Comments