Home शहरं ठाणे Jitendra Awhad's Tweet: Jitendra Awhad: 'सीमावादावर खरं कोण बोलतंय? भारताचे राजदूत की...

Jitendra Awhad’s Tweet: Jitendra Awhad: ‘सीमावादावर खरं कोण बोलतंय? भारताचे राजदूत की पंतप्रधान?’ – ncp leader jitendra awhad’s tweet on india-china face off


ठाणे: भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षावरून देशात राजकारण प्रचंड तापले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत यावर खुलासा केल्यानंतरही विरोधकांचे समाधान झालेले नाही. चीनच्या घुसखोरीविषयी आणि शहीद जवानांबद्दल केंद्र सरकारवर प्रश्नांची सरबत्ती सुरूच आहे.

आणखी वाचा: भाजपनं ‘यावर’ बोलणं म्हणजे चिखलात दगड मारण्यासारखं; शिवसेनेचा हल्ला

भारतीय सैन्य देशाच्या सार्वभौमत्व जपण्यास सक्षम आहे. चीननं भारताची एक इंचही जमीन बळकावलेली नाही. भारतीय भूभागावर कुणीही घुसखोर नाहीत, असं पंतप्रधान मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत स्पष्ट केलं होतं. मात्र, काँग्रेसनं पंतप्रधानांच्या या खुलाशाला आक्षेप घेतला आहे. चीननं घुसखोरी केली नसेल तर भारताचे २० जवान शहीद कसे झाले, असा प्रश्न काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना केला होता. त्यावरून भाजप-काँग्रेसमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

आणखी वाचा: ‘महार, मराठा, शीख रेजिमेंट सीमेवर तंबाखू चोळत बसल्या होत्या का?’

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही याबाबत एक ट्विट केलं आहे. भारताच्या चीनमधील राजदूतांच्या वक्तव्याचा हवाला देत आव्हाड यांनी एक प्रश्न उपस्थित केलाय. आपल्या ट्विटमध्ये आव्हाड म्हणतात, ‘नियंत्रण रेषेवरील परिस्थिती सुधारावी असं वाटत असेल तर चीनने वेळोवेळी घुसखोरी करून तेथे नवीन पायाभूत सुविधा उभारण्याचे बंद करावे, असं भारताचे चीनमधील राजदूत विक्रम मिस्री यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी सीमावादावर केलेल्या भाषणात नेमकी उलट माहिती दिली आहे. मग खरं कोण बोलतंय? राजदूत की पंतप्रधान?’

सीमावादावरून केंद्र सरकारला प्रश्न विचारणाऱ्या काँग्रेसला चीनकडून पैसे मिळत असल्याचा आरोप भाजपनं केला आहे. राजीव गांधी फाऊंडेशनला दिल्लीतील चिनी वकिलातीकडून घसघशीत देणगी मिळाल्याचं भाजपनं म्हटलं आहे. या वादात उडी घेत शिवसेनेनं भाजपवर टीका केली आहे. ‘केवळ काँग्रेसच नव्हे तर आपल्या देशातील अनेक राजकीय पक्ष व पुढारी हे परराष्ट्रांचे लाभार्थी आहेत. भाजपनं तर यावर बोलणं म्हणजे चिखलात दगड मारून स्वतःच्या अंगावर शिंतोडे उडवून घेण्यासारखे आहे. हमाम मे सब नंगेच आहेत. भाजपला काँग्रेस पक्षाशी नंतर कधीही लढता येईल. पण आज चीनशी लढायचे आहे. त्यावर काय ते बोला,’ असा खोचक टोलाही शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपला हाणला आहे.

Live: राज्यातील करोनामुक्त रुग्णांची संख्या ८० हजारच्या उंबरठ्यावरSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

sujay vikhe patil: ‘शरद पवारांवर विश्वास ठेवायचा की मोदींवर? हे जनतेनेच ठरवावे’ – bjp mp sujay vikhe clears stand on k k range issue

अहमदनगर: ‘के के रेंज प्रश्नासंदर्भात आम्ही जी भूमिका तत्कालीन दौऱ्यात मांडली त्यावर आजही ठाम आहोत. त्या भूमिकेत कोणताही बदल नाही. त्यामुळे आता शरद...

Recent Comments